Welcome You All

RSS

मत्स्यसंवर्धन

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान-मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जमिनीची निवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते.
जर सपाट जमिनीवर मत्स्यतळे बांधले, तर तळाच्या बुडामध्ये उतार देणे महत्त्वाचे असते. या उतारामध्ये पाणी बाहेर काढता येते. तळ्याचा विस्तार 0.1 हेक्‍टर ते एक हेक्‍टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते. सुरवातीला 0.1 हेक्‍टर जलक्षेत्र तयार करून मत्स्यपालन सुरू करावे.
संवर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील परिवर्तनास तोंड देऊन प्रमाणित वनस्पतिजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी माशांच्या जातींची निवड फायदेशीर ठरते. तसेच पाण्यातील विविध थरांत उपलब्ध नैसर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कार्प जातीच्या माशाची एकत्रित किंवा मिश्रशेती करता येते. भारतीय प्रमुख कार्प जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामधील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कार्प वाढविल्यास या अन्नावर उपजीविका करून भारतीय प्रमुख कार्पबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्‍य होते. या माशांना चांगली मागणी आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll