Welcome You All

RSS

तणांचा प्रादुर्भाव

तूर हे जास्त कालावधीचे पीक आहे, तसेच सुरवातीला पिकाची वाढ हळू होत असते, त्यामुळे सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. तूर पिकासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणजे अशा कालावधीत जास्त तणनियं त्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. हा कालावधी सुरवातीचे 20 ते 60 दिवस असतो. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 50 ते 55 टक्के घट येऊ शकते.
तुरीतील तणनियंत्रणाकरिता पेरणी नंतर तीन, सहा व नऊ आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी. सध्या मजुरांची अनुपलब्धता व वाढते मजुरी दर यामुळे पूर्णतः कोळपणी व खुरपणीद्वारे तणनियंत्रण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे मशागतीय उपचारांच्या जोडीला तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण केल्यास ते अधिक प्रभावी व आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरेल.
तूर पिकातील तणनियंत्रण : पेरणी नंतर, परंतु उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) तणनाशक 2.5 ते 3.3 लिटर (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक) प्रति हेक्‍टरी किंवा पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी मेटोलॅक्‍लोर (50 ई.सी.) दोन किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या पीक उगवणीपूर्वी तणनाशकाच्या जोडीला पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी जेणेकरून एकात्मिकरीत्या तणनियंत्रण साधले जाईल.
सोयाबीनमधील तणनियंत्रण
पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 45 दिवस एवढा असतो. या कालावधीत पीक तणमुक्त ठेवणे आवश्‍यक असते. अनियंत्रित तणां च्या वाढीमुळे पीक उत्पादनात 40-53 टक्के एवढी घट येऊ शकते. सोयाबीन मधील तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर, परंतु पीक उगवणीपूर्वी ऍलॅक्‍लोर (50 ई.सी.) चार लि. प्रति हेक्‍टरी (दोन किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी (40 मि.लि. प्रती 10 लिटर पाणी) त्याबरोबर पीक पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.
किंवा
पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लि. प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (0.75 ते एक किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी. सोयाबीनमधील रुंद पानांच्या तणाच्या नियं त्रणाकरिता पीक पेरणीनंतर 15-20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये इमॅझीथॅपायर (10 ई.सी.) 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्‍टरी (75 ते 100 मि.लि. क्रियाशील घटक प्र ति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुईमुगातील तणनियंत्रण
भुईमुगासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरचे 15-45 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 4045 टक्के एवढी घट येते. भुईमुगातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (0.75 ते 1.00 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी. भुईमुगा मधील रुंद पानांच्या तणाच्या नियंत्रणाकरिता पीक पेरणीनंतर 15-20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये इमॅझीथॅपायर (10 ई.सी.) 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

सूर्यफुलातील तणनियंत्रण
या पिकासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पीक पेरणीनंतर 15-45 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणामुळे उत्पादनात 30-33 टक्के एवढी घट येऊ शकते. सूर्यफुलातील तणनियंत्रणाकरिता पीक उगवणीपूर्वी ऑक्‍सिफ्लोरफेन (23.5 ई.सी.) 425 मि.लि. प्रति हेक्‍टरी (दहा मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (4.25 मि.लि. प्रति दहा लिटर पाणी) व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.
किंवा
पीक उगवणीपूर्वी पॅन्डीमिथॅलीन (30 ई.सी. )2.5 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (0.75 लिटर क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व पेरणीनंतर सहा आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

तीळ पिकातील तणनियंत्रण
तिळातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी ऍलॅक्‍लोर (50 ई.सी.) चार लिटर प्रति हेक्‍टरी (दोन लिटर क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.

उडदामधील तणनियंत्रण
या पिकाचा पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 30 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 25-30 टक्के घट येऊ शकते. पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी ऑक्‍सिप्लोरफेन (23.5 ई.सी.) 425 मि. लि. प्रति हेक्‍टरी 450 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच पाच आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

मुगातील तणनियंत्रण
मुगासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 30 दिवस एवढा असून, अनियंत्रित तणाच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 25-30 टक्के घट येऊ शकते. मुगातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll