Welcome You All

RSS

ठिबक सिंचनाचा वापर

जमीन वाफसा स्थितीत असतानाच झाडांची मुळे पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण अधिक कार्यक्षमतेने करू शकतात, त्यामुळे पाण्याच्या ताणाचा काळ वगळता जमीन वाफसा परिस्थितीत अधिक काळ राहील, अशाप्रकारे पाणी देणे आवश्‍यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमुळे पाण्याचे अनियमित वितरण होते, अन्नद्रव्यांचा जास्त प्रमाणात निचरा होतो. लोहासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडणे, बुरशीजन्य रोगांचा (डिंक्‍या, मूळकूज इ.) प्रसार होतो. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
जा स्तीचे पाणी किंवा पाण्याचा जास्त ताण या दोन्ही बाबींसाठी फळझाडे संवेदनशील असतात. यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते व झाडाचे आयुष्य कमी होते. भरपूर पाणी आहे म्हणून झाडांना जास्त पाणी द्यायचे, पर्यायाने झाडांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादन मिळेल, असा गैरसमज अजूनही काही शेतकऱ्यांचा आहे. जास्त पाण्यामुळे झाडाच्या मुळांना प्राणवायूचा पुरवठा होत नाही, झाडाची मुळे कुजतात व सडतात आणि अन्नद्रव्यांचा झाडास पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडतात. याउलट पाण्याचा जास्त ताण पडल्यास लहान फळांची गळ जास्त प्रमाणात होते,फळांची प्रत बिघडते, पाने कोमेजून हळूहळू वाळतात. नंतर झाडांची वाढ खुंटून त्यांचा ऱ्हास होतो.
मुळांना पाणी व पाण्याद्वारे अन्नद्रव्य शोषण करण्याच्या प्रक्रियेसाठी जमिनीत पुरेशी हवा (प्राणवायू) उपलब्ध असणे आवश्‍यक असते. मातीचा थर सिंचनाद्वारे संपृक्त झाला म्हणजे मुळांना पाणी व अन्नद्रव्ये मिळाली व झाडांची वाढ होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. जमीन वाफसा स्थितीत असतानाच झाडांची मुळे पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण अधिक कार्यक्षमतेने करू शकतात, त्यामुळे पाण्याच्या ताणाचा काळ वगळता जमीन वाफसा परिस्थितीत अधिक काळ राहील, अशाप्रकारे पाणी देणे आवश्‍यक आहे.
प्रवाही सिंचन पद्धतीमुळे पाण्याचे अनियमित वितरण होते, अन्नद्रव्यांचा जास्त प्रमाणात निचरा होतो. लोहासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडणे, बुरशीजन्य रोगाचा (डिंक्‍या, मूळकूज इ.) प्रसार होतो. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
ठिबक सिंचन संच
ठिबक सिंचन संचाचे पंपसेट, मुख्य पाइप (मेन), उपमुख्य पाइप (सबमेन) व उपनळी (लॅटरल) हे मुख्य भाग असतात.

ठिबक तोटी किंवा ड्रीपर्स
ओळीतील प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक तोटीचा वापर केला जातो. ठिबक तोट्या दोन प्रकारच्या असतात, इनलाईन व ऑनलाइन. इनलाईन तोट्या या लॅटरलच्या आत लॅटरल तयार करतानाच टाकलेल्या असतात. लॅटरलच्या पृष्ठभागावर या तोट्यांची छिद्रे फक्त दिसतात. लॅटरलवर 10 ते 75 सें.मी. इतक्‍या अंतरावर या तोट्या बसविलेल्या असतात. ऑनलाइन तोट्या या साध्या लॅटरलवर छिद्रे करून बाहेरून बसविल्या जातात, त्यामुळे या तोट्या लॅटरलवर बाहेरून बसविलेल्या दिसतात.

गाळण यंत्रणा (फिल्टर)
गाळण यंत्रणा (फिल्टर) हा ठिबक सिंचन संचाचा गाभा (मुख्य घटक) आहे. उपलब्ध पाणी योग्य रीतीने गाळून ते संचास पुरविण्याचे महत्त्वाचे काम फिल्टर करते, त्यामुळे सिंचनाचे पाणी तपासल्यानंतर पाण्याच्या गुणवत्तेनुसार योग्य फिल्टरची निवड करावी.
पाणी वाहते; परंतु गढूळ असेल, कचऱ्याचे प्रमाण कमी असेल, विहीर किंवा बोअरचे पाणी असेल तर जाळीचा (स्क्रीन) फिल्टर वापरावा. साधारण: हा फिल्टर सर्वच संचांसोबत वापरला जातो; परंतु पाण्याच्या प्रतीनुसार इतर फिल्टर वापरावेत. पाण्यामध्ये शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व तरंगणारा कचरा असेल किंवा साठलेले पाणी वापरावयाचे असेल, तर वाळूचे (सॅंड) फिल्टर वापरावे. या फिल्टरच्या टाकीमध्ये 3/4 भाग वाळूने भरलेला असतो. पाणी या वाळूतून बाहेर पडते, त्यामुळे शेवाळ, सेंद्रिय तसेच तरंगणारे पदार्थ वाळूमध्ये अडवून बसतात व स्वच्छ पाणी संचास पुरविले जाते. पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतील; परंतु विरघळलेले क्षार जास्त प्रमाणात असतील तर डिस्क (चकत्यांचे) फिल्टर वापरावे. नदी किंवा विहिरींच्या पाण्यामध्ये वाळूचे कण येत असतील, तर हायड्रोसॉयक्‍लीन (शंकू आकाराचा) फिल्टर वापरतात. बोअरचे पाणी कमी झाल्यास शेवटी बोअरच्या पाण्यासोबतच वाळूचे कणसुद्धा येतात. अशा वेळी हायड्रोसायक्‍लॉन फिल्टरद्वारे हे वाळूचे कण पाण्यातून बाहेर काढता येतात.
ठिबक सिंचन संचासोबत स्क्रीन फिल्टर हा आवश्‍यकच असतो; मात्र पाण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन एकत्रितपणे दोन फिल्टरचा वापर केल्यास उत्तम ठरते.

ठिबक संचाचे घटक
यामध्ये प्रामुख्याने प्रेशर गेज, व्हॉल्व, बायपास असेंब्ली यांचा समावेश असतो. प्रत्येक शेतकऱ्याने संचासोबत प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्‍यक आहे. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंच्युरीद्वारे खतमिश्रित पाणी किती सोडायचे या सर्व बाबींसाठी फिल्टर व व्हेंच्युरी यांच्या इनलेट व आऊटलेट पाइपवर प्रेशर गेज (दाबमापक) बसवावे.
पंपाच्या डिलिव्हरीजवळ किंवा संचाच्या मुख्य पाइपवर प्रेशर गेज बसवून संच किती दाबावर चालू आहे, हे माहिती होते. ठिबक संच साधारणतः 1.0 कि.ग्रॅ. / वर्ग सें.मी. या दाबावर चालविला जातो. दाब कमी झाल्यास काही व्हॉल्व बंद करून संच 1.0 कि.ग्रॅ. / वर्ग सें.मी. एवढ्या दाबावरच चालवावा. दाब जास्त झाल्यास मुख्य पाइपला इनवर असलेल्या बायपास असेंब्लीद्वारे पाणी परत मागे मुख्य स्रोतात (विहिरीत) सोडता येते. पाण्याचे सर्व झाडांना योग्य प्रमाणात वितरण होण्यासाठी संच विहित दाबावरच चालविणे आवश्‍यक असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll