Welcome You All

RSS

शेतकर्‍याला गाय

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला  नकोच.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकरी आणि आत्महत्या

मराटवाड्यातील सगळ्यात मागसलेला जिल्हा म्हणुन बीड जिल्हाची ओळख होते तिथे ना रेल्वे , ना कोनतच उद्योग , बहुसन्खय लोकांचा शेती किंवा उसतोड मजुर म्हणुन पश्च्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर उस तोडनी चि कामे करने , शेतातील पीक प्रामुख्याने बाजरी , ज्वारी , करडी , पाणी आसेल तर उस कींवा कापुस . माझे वय २८ , पण मला जसे कळायला लागले तसा एखदाही दुश्काळ पडलेला नाही . पण पाण्यासाटी वनवन हि आहेच ,शेतकरी हा प्रामुख्याने आपल्याच शेतात काम करतो शक्य तो दुसर्या च्या शेतात किंवा ईतर जागेवर काम करन्यास जात नाही कींवा टाळतो , याचे मुख्य कारन म्हनजे त्याची गावात आसलेली पत . कींवा पुर्वी पासुन आसलेली परंपरा मग शेतात आसे किती रुपयांचे पिक येते व त्यावर त्याचे कुटंब चालते का नाही ?
शेतकरी हा ज्यावेळस शेतात काम नसते त्या वेळेस दुसरी कामे का करत नाहीत .शेतात पेरणी केल्या नतंर , १ ते २ महिने मशागत करावी लागते , त्याच्या नतंर ४ ते ५ महीने शेतकरी घरीच बसुन असतात या वेळी घरातिल लग्न समारंभ किंवा ईतर कार्यक्रम करतात , शेतकर्याच्या घरात जर लग्न आसेल तर , ही शेतकरी आपल्या मुलिला हुन्डा म्हणुन , १००००० रु वा या पेक्षा जास्ती जास्त देतात किंवा मुलासाठी घेतात .
वरति सोने , घरात लागनार्या वस्तु , ईतर काही , किंवा बाईक वगरे .
याचे कारन म्हण्जे शेतकर्या च्या गावातली परंपरा , लग्ना च्या वेळी सगळ्या गावात चुल बन्द आमन्त्रन आसते गावची लोकस्न्ख्या कमीत कमी १००० किवा जास्ती जास्त किती ही , परत मुलाकडची मन्डळी ट्र्कनेच लग्नासाटी येतात , कमीत कमी २ ट्र्क किवा जास्ती जास्त किती हि, हे सारे कर्ताना शेतकरी शक्यतो गावातिल एका मोट्या शेतकर्या कडुन व्याजाने रुपये घेतो ,
मग व्याज व मुद्दल त्याच्याकडुन फेडले जात नाही , तो व्यतित होतो व व्यसानाच्या आहारी जातो , व्यसानाच्या आहारी गेल्या नन्तर काही दिवसानी त्याच्या आसे लक्षात येते कि आपली दुसरी मुलगी कींवा मुलगा लग्नाच्या वयात आला आहे , मग तो शेती विकुन लग्न कर्तो ,राहिलेल्या शेती वर त्याची उपजिवीका होत नाहि व शेतकरी बाहेर हि कामाला जात नाही ....?
आता अनुदानाची गोष्ट सागतो , भहुसन्ख शेतकर्या अनुदान मिळते च मग शेतकरी हि आनेक प्रकरने सरकारी कर्याल्यात खोटिच दाखवतो ,आती वॄष्टि झालि यांना अनुदान , कमी पाउस यांना अनुदान , पिकावर रोग पडला यांना अनुदान, सारकारी आधिकारी ही थोडे फार पैसे घेउन फाइल मन्जुर करतात .
विविध बॅन्केचे काढलेल कर्ज हि तो फेडत नाही .अनुदाने , कर्ज , काढुन तो पैसे स्त्कार्याला लावत नाही ,
त्या पैस्यातुन तो मुला करीता बाईक घेतो , पत्ते खेळतो दारु पितो , देवाच्या वारया करतो , व ईतर ही गोष्टी करतो .
शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुरच काम करतात , मि ज्या वेळी गावाकडे जातो त्या वेळेस शेतकर्या चि ही मुले आपल्या गाडीवर फिरत आसतात .
शेतकरी हि शेतापेक्षा ईतर जागेवच जास्त वेळ घालवतात , आज हि मी सांगु शकतो कि शेतकर्या च्या शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुर च काम करतात , तिसरे कारन शेत मजुर एक वेळेस उपाशी राहिन पण आपल्या मुलाला शिक्षण देइल , शेतकर्या चे तसे नाही मुलगा शिकला तर शिकला नाही तर आहे आपली शेती आहेच , माझेच उद्दा देतो माझ्या गावात माझ्या वयाची १६० मुले आसतिल पण त्यातिल फक्त मी गावाच्या बाहेर शक्षिण घेतले जवळ पुरेसे पैसे नसतांना हि लोकांच्या मदतिवर ,मग हि मुले शिक्षण का घेत नाहित , याचे मुख्य कारन शेति कींवा त्यांचा पुर्वि पासुन आसलेला समज कि आपल्याला काय कमी आहे . शेत मजुराचे तसे नाही त्यांच्या कडे उपजिवीके चे साधन नसते त्या मुळे ते आपल्या मुलाला शिक्षण देतात आणि ति मुले आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज हि करतात , आसो.......
ज्या शेतकर्या कडे सुरवातिला ५ एकर जमिन होती आता त्यांच्याकडे १ एकर हि राहिलि नाही , कारन कुटंबाचा केलेला विस्तार , शेतकर्याला कमित कमी २ आणि जास्तीत जास्त ५ ते ६ मुले आसतात , एकत्र कुटुंब पध्दत आता खेडयात ही राहिली नाही , त्या मुळे त्याच्याकडे आसनार्या शेताची विभागनी होते ,
मग १ एकरात आसे किती पिक येनार , त्यात त्याचे घरही चालत नाही व तो दुसरी कडे कामाला जात नाही . आसे होत आसतांनाच त्या शेतकर्या च्या घरचे एखादे लग्न कींवा एखादा समारंभ निघतो व तो पुन्हा कर्जा ने पैसे काढतो व ते फेडता नाही आले कि आपली आहे ति शेती विकुन टाकतो मग पुढे काय ....
आजकाल तर शेतकरी कोणत्याही बँकचे कर्ज हि फेडत नाही उलट कर्ज माफीची वाट पाह्तो , कींवा सरकारी अनुदाने लाटत आसतो , खोटी कागद पत्रे सादर करुन .
तुम्हाला जर हे खोटे वाटत आसेल तर तुम्ही प्रत्यक्ष कधितरी मराटवाडयातील एखादया खेडे गावात जाउन यावे .
सरकार भरपुर अनुदान देते उदा : गाई , मह्से, शेळी , कोबडी , मत्सपालन , वुर्क्ष रोपन , यावर सरकार अनुदान देते , पन शेतकरी काय करतात ज्यावेळेस बँकेचे कींवा सरकारी आधिकारी चोकशी साठी येतात त्या वेळेस शेतकरी दुसरयाचिच , गाय , शेळी दाखवुन बँके चा पैसा उचलतात सरकारी आधिकारी ही थोडेफार पैसे घेउन फाइल मंजुर करतात.
मग शेतकरी घेतलेल्या कर्जतुन ना शेतीला पुरक व्यावसाय करतो , ना बॅंकेचे कर्ज फेडतो यातच तो कर्जबाजारी होतो मग पुढे काय ......
पण माझ्या गावात आसेही काहि शेतकरी आहेत की ज्यांना ना अनुदान मिळते ना कोनत्या बँकेचे कर्ज मिळते
बिचारे ६ महिने शेतात काम करुन उरलेले ६ महिने उसतोडनी साठी जातात आणी त्यातुन आलेल्या पैसे तुन आपल्या मुला मुलीचे लग्न करतात.
बरे शेतकर्याने आत्महत्या केली तर त्याचि खरी कारने शोधली जात नाहित
उदा :
१ ) शेतकर्याने का आत्मह्त्या केली ?
२ ) त्याने कोणत्या बँकेचे कर्ज काढले होते , व ते कशासाटी काढले , ज्याच्यासाठी काढले त्याचा त्याने त्याच कारना साठी उपयोग केला होता का ?
३ ) त्याने कर्ज कधी काढले , बँकेचे हाफ्ते भरले होते का ?
४ ) कर्ज काढल्या पासुन त्याने शेतात कोणकोणती पिके घेतली होती , व ति पिके वाया गेली होति का ?
५ ) शेतकरयाला कोणते व्यसन होते का ?
६ ) शेतकर्या च्या कुटुंबात कीती व्यक्ति आहेत , व ति कोणती कामे करतात , कि घरीच बसुन आसतात ?
७ ) शेतकर्या चे घरातील काही प्रोबलेम होते का ?
८ ) शेतकर्या ने नेमके कशासाटी कर्ज काढले होते ?
९ ) शेतकर्याने या आधि जमिन विकली होती का व का विकली कारने दया ?
१० ) शेतकर्याच्या घरात एखादे लग्न , कींवा एखादे मोटा समारंभ झाला आहे का ?
वरिल कारना चा विचार न करता शेतकर्या ने आत्मह्त्या केली , ति कशामुळे , का , याचा शोध न घेता लगेच त्याने कर्जा मुले आत्मह्त्या केलि आसे म्हणुन विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष त्यावर राजकारण करतात .
बरे शेतकर्याने शेतिसाठी कर्ज काढले तर ते कोनत्या कारना साठी
उदा :
१ ) बि बियाने , खते , किटक नाशके ,
२ ) नागरनी , फवारनी
३ ) मशागत , शेतमजुरी
४ ) विद्दुत पंप , कींवा शेतात पाइप लाईन
५ ) विद्दुत जोडनी
६ ) बैल , गाय , शेळी, म्हैस , कोबडया , मत्स पालन , इत्यादी साठी .
७ ) विहीर कींवा बोअर घेने
८ ) ट्रक्टर , बैलगाडी , व इतर आवजरे
याची पण पडताळनी व्हायला पाहिजे ............
आसो मि हे सर्व काही शेतकर्या चा विरोधक म्हणुन नाही लिहले हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत
आमच्या कडे ५ एकर शेती होती ति कोनत्या कारना साठी विकली तर , माझ्या बहिनी चे व चुलत बहिनी चे लग्न , शेती विकुन माझे आई वडिल आता दुसर्या च्या शेतात शेतजुर म्हणुन जातात कींवा उसतोड मजुर म्हणुन साखर कारखान्यावर जातात .
खरोखरीच शेतकरी का आत्मह्त्या करतो , याची खरी कारने शोधली पाहिजेत कर्ज माफी कींवा अनुदाने हा त्या वर चा उपाय नव्हे आपय आहे ?
काही खरी माहिती ..
१ ) शेतकर्याच्या कोनत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही , त्यामुळे दलाल शेतकर्या कडुन शेतिमाल कमी भावाने विकत घेउन शहरा च्या ठीकाणी कित्तीतरी आधिक भावाने विकतात .
२ ) शेतमालाची बाजारपेठ शेतकर्या च्या हातात नाही तिथे मारवाडी कींवा ईतर लोक आसतात .
३ ) जसे भारतात कोनत्याही वस्तुची फिक्स कींमत आहे तर मग शेतीमालाचिच का नाही .
उदा : कांदे १० रुपये किलो आहेत तर संपुर्ण भारतात १० रुपये किलो ने विकली गेली पाहिजेत आज कसे होते शेतकर्या कडुन ३ रुपये किलो ने कांदे घेउन ति १५ रुपये कीलो ने विकली जातात महण्जे फायदा कोनाचा ?
मि पुण्यात राह्तो ज्या वेळेस मी गावाकडे जातो त्या वेळेस वांगी , कांदे , भेंडी , टॅमाटो , ईतर भाजिपाला खुप झालेतर , ५ रुपये कीलो मिळतो कधी कधी तर २ कींवा ३ रुपये कीलो ने मिळतो मग शहरा च्या ठीकानीच का १५ ते ५० रुपये कीलो ने मिळतो महण्जे फायदा कोनाचा ,
आशी खुप कारने आहेत पण एक मत्र खरे , शेतकर्याने कष्ट करुन शेतीत माल पिकवला तरी तो त्या शेतमालाची व त्याच्य कष्टाची किंमत टरवु शकत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल, ति कींमत सरकरी आधिकारी , दलाल कींवा तुम्ही आम्ही ठरवतो .
४) साखरकारखाने ही उसाचे राजकारण करतात , एक कारखाना उसाला १५०० रुपये भाव देतो तर दुसरा कारखाना उसाला ६०० कींवा ७०० रुपये भाव देतो , मग मला प्रश्न्न पडतो की १५०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर पांढरी आसते आणी ६०० कींवा ७०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर काळी आसते का ?
कधीकधी तर ही साखरकारखाने शेतकर्या चा उस शेतातच राहुन देतात कारन काय तर तो आमुक तमुक पार्टीचा माणुस आहे , गरीब शेतकर्यांचे तर हाल विचर्याला नको .
५ ) महाराष्ट्रातील साखरकारखाने , कॄषीउत्तपंन्न बाजार समीती , भु विकास बँक , जिल्हा सहकारी बँक ,
या संस्थाशी शेतकर्या जास्त सबंध येतो पण या संस्था कोनत्या कोनत्या राजकीय पुढारयाच्या ताब्यात आसतात , म बँक , कारखाना तोट्यात चालतो आहे आसे दाखवुन त्यावर सरकारी पॅकेज मीळवायचे , ते पॅकेज स्वता: कडेच ठेवायचे शेतकर्याचे काय तो त्याचा काही करेल
मुळात महाराष्ट्रातील कोणतीच सह्कारी संस्था तोट्यात चालत नसावी पण सह्कार खात्याला लागलेली भ्रष्टाचारी नेत्याची धुळ ....
दिंनाक : ८/०९/०९ रोजी , लोकमत या र्वतमान पत्रात शेतकर्यांच्या आत्मह्त्या संबधी आलेली माहीती देत आहे .
सहा वर्षात बीड जिल्हायातील ३८२ शेतकर्याच्या आत्मह्त्या .
बीड , दि. ७ बीड जिल्हात गेल्या सहा वर्षात ३८२ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यातील ११९ शेतकर्यांच्या आत्मह्त्या या कर्जबाजारीला कंटाळुन झाल्याचे सिध्द झाले आहे . १११ जणांच्या वारसांना शासनाची एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर आट जणांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु आहे .
जिल्हाधिकारी भारत सासने यांच्या उपस्थितीत सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या आत्मह्त्या संदर्भात बैटक झाली. यात उर्वरित प्रकरणांवर चर्चा झाली . कायमस्वरुपी दुष्काळी हे बिरुद चिटकलेल्या बीड जिल्हात शेतकर्यांच्या आत्मह्त्येचे लोण पसरले आहे गेल्या सहा वर्षात ३७८ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यात २००४ सली ११ जणांच्या आत्मह्त्या केल्या. त्या पैकी एक ही आत्मह्त्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे . तर २००६ या एकट्या वर्षात जिल्हात १२४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या झाल्या आहेत . या पैकी फक्त २३ आत्महत्या प्रशासकीय मदती साटी पात्र ठरल्या तर १०१ प्रकरणात कर्जबाजारीपणामुळे नसल्याचा शेरा प्रशासनाने मारला.
२००७ यावर्षात आत्मह्त्येचा सिलसिला कायम राहीला .याही वर्षी एकुण ९५ जणांनी आत्मह्त्या केल्या . पैकी ३९ प्रकरणात वारसांना शासकीय मदत मिळाली तर ५६ प्रकरणे नाकारण्यात आली . २००८ यावर्षी ८६ जणांनी आत्मह्त्या केल्या त्यातील ४४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या मदती साठीग्राह्य धरुन उरलल्या ४२ प्रकरणात आत्मह्त्याचे कारण कर्ज बाजारीपणा नसल्याचे नमुद केले . २००९ वर्षात ५४ जणांच्या आत्मह्त्या झाल्या . यातील १४ जणांच्या वारसांना मदत मिळाली तर ३२ प्रकणे आपात्र टरविण्यात आहेत ४ शेतकर्यांचे अहवाल अद्दाप नाहीत
२००९ या चालु वर्षात आत्मह्त्या केलेल्या ४ प्रकणांचा अहवाल अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही . या बाबत पोलिस आणि प्रशासन चोकशी करीत असुन अहवाल मिळाल्यानंतर ती प्रकरणे चर्चेसाटी येणार आहेत .
वरील माहीती जशासतशी मी दिली आहे ,
म्हण्जे सहा वर्षा कर्जबाजारीपणा मुळे फक्त ११९ शेतकर्यांने आत्मह्त्या केल्या बाकीच्या शेतकर्याची २६३ शेतकर्याची आत्मह्त्येची कारणे कोनती ? आणी ते कोनशोधनार ..
आसो माझी ही माहिती सर्व शेतकर्या चि आहे आसे नाही , काही शेतकरी आपल्या कष्टा ने आगदी खडक माळावर ही पीके घेतात . काही बीच्यारे शेती आसुन ही उपाशी राह्तात , काहीच्या शेतात तर काहीच पीकत फक्त नावाला शेती .
मायबोली वर पहीलाच प्रयत्न

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आधुनिक शेतकरी

आधुनिक शेतकरी आपल्या देशाची प्रगती झाली आहे. मोठमोठ्या परदेशी कंपन्यांनी आपला उत्कर्ष व भरभराट पाहून त्यांचा संसार इथेच थाटलाय. मोठ्या इमारती, मोठे पगार, मोठ्या गाड्या, सर्वकाही मोठ्या प्रमाणात होत आहे. माणसाला सुखसोयी, चांगली राहणी आणि खूप काही मिळत आहे. पण आज त्याच माणसाकडे थोडासाही वेळ उरला नाही.

शहरात राहत असलेल्यांना गावची ओढ नाही आणि ओढ असली तरी तिथे जायला वेळ नाही. त्यामुळे नव्या पिढीला गावचे घर, शेती, गोठे, गावाकडचे जेवण, प्रथा काहीच माहीत नाहीत. हिंदी सिनेमात हीरो-हिरॉईन शेतात नाचतात एवढाच संबंध या शहरातल्या मुलांचा शेताशी राहिला आहे. गंमत म्हणजे टी.व्ही.वरील एका कार्यक्रमात एका छोट्या मुलीला विचारले, ‘‘आपल्याला भात कुठून मिळतो?’’ तर तिने म्हटले बिग बाझार किंवा अपना बाझारमधून. त्यावर तिला हेही विचारले गेले की, त्या बाजारात कुठून येतो तर तिचे उत्तर होते ‘तिथेच बनवतात बहुतेक!’ पण यात या पिढीचा फारसा दोष नाही. जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे. अन्न वाया घालवू नका असे सर्व पालक आपल्या मुलांना सांगतात, पण ते अन्न तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात किती क लागतात हे ज्यांना माहीतच नाही त्यांना अन्नाचे मोल कळेल तरी कसे. आणि मग यांनीच पुढे जाऊन शेतकर्‍यांची दु:खं समजावी अशी अपेक्षा करणे चुकीचेच नाही का? आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीमुळेच आपल्या देशाला मंदीचा जास्त फटका बसला नाही. त्यामुळे या पिढीच्या अज्ञानाकडे दुर्लक्षित करून चालणारच नाही. ‘‘पण मग काय करता येईल?’’ असा प्रश्‍न जर तुम्हाला पडला असेल तर एक फार आनंदाची गो सांगते, ‘‘ज्यांना गाव किंवा गावचे घर नाही, ज्यांना कांदा झाडाला लागतो की जमिनीतून येतो हे माहीत नाही, ज्यांना ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम का दाखवला जातो असा प्रश्‍न सतत पडतो, ज्यांना शेतकरी आत्महत्या का करतात माहीत नाही, ज्यांना शेतातल्या ताज्या भाज्या, शेतकरी किंवा शेतीशी काही संबंध नाही, त्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे वळवण्याचे काम करत आहेत पांडुरंग तावरे. त्यांचे कार्य ऐकून तर पांडुरंगाने पंढरपुरातून बारामतीला ‘ट्रान्सफर’ घेतली असावी असेच मला वाटले.
पांडुरंग तावरे हे बारामतीचे रहिवासी व बी.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स)चे पदवीधर. त्यांची व त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी कृषिविषयक पदवी मिळवावी, पण कमी मार्क पडल्यामुळे तसे जमले नाही. शिक्षण झाल्यावर डेटा एण्ट्रीच्या कामाशिवाय दुसरे कोणतेही काम मिळत नव्हते. रु. ६०० दर महिना मिळकत. थोडा काळ गेल्यावर त्यांनी युरेका फोर्ब्समध्ये सेल्समनचे काम स्वीकारले. घरोघरी व्हॅक्युम क्लिनर व कूलर विकले. जवळजवळ तीन वर्षें सतत हीच रुपये ९५० ची नोकरी करून त्यांचे मन लागत नव्हते. २१ व्या वर्षी लग्न केले व स्टर्लिंग रिसॉर्टचे काम हाती घेतले. चार वर्षे तेथे काम केले. टूरिझमचा चांगला अनुभव इथूनच सुरू झाला. त्यानंतर क्लब महिंद्रामध्ये नोकरी केली. पुण्यातील वासेकॉन इंजिनीयर्समधील त्यांची शेवटची नोकरी. शेती करण्याचा जुना विचार सारखा मनात फिरत असतानाच नोकरी सोडायचे त्यांनी ठरवले. प्रागतिक शेतकरी होणे हे त्यांचे जुने स्वप्न होते. टूरिझमचा अनुभव आणि शेतीत अडकलेला जीव या दोन्हींचे मीलन कसे करावे या विचारात गुरफटलेले असतानाच त्यांना एक संकल्पना सुचली. त्या संकल्पनेचे नाव आहे ‘ऍग्री टूरिझम’. आपण सुट्ट्यांसाठी कश्मीर, केरळ, महाबळेश्‍वर, माथेरान किंवा परदेशात युरोप, अमेरिकेला जातोच. पर्यटन संस्था जे पॅकेज देतात त्यातले एखादे निवडतो. मग आपण गावाकडे त्याच सर्व सुविधा दिल्या व गावची माहिती दिली, जेवण, खेळ व नवीन अनुभव दिला तर यालाही पर्यटनच म्हणता येईल. असा जन्म झाला पांडुरंग तावरे यांच्या कृषी व ग्रामीण पर्यटनाचा. तावरे म्हणतात, ‘‘मातीची नाळ कधी तुटत नाही. मी याच मातीशी नव्याने ओळख करून देतो.’’ संकल्पनेचा संपूर्ण अभ्यास करून तावरेंनी शरद पवारांची भेट घेतली व त्यांची संकल्पना समजावत पवारांनी त्यांना विचारले, ‘‘इथे लोक गावचे जीवन बघायला येतील का?’’ त्यावर तावरेंनी ‘माझ्यावर विश्‍वास ठेवा’ एवढे म्हणून काम सुरू केले.
बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या ११० एकर जागेवर या संकल्पना ऑक्टोबर २००५ मध्ये अमलात आणली. महिनाभर तयार्‍या, चाचण्या सर्व करून १ नोव्हेंबर २००५ मध्ये जाहीर केले. पुण्यात छान सजवलेल्या बैलगाड्यांवर बसून नटूनथटून मुलांनी व मुलींनी या संकल्पनेची माहिती देणारी पत्रके वाटली. तो देखावा पाहून उत्सुकता आधीच वाढली होती. लोकांची व त्यातून पत्रकातील माहिती वाचून तर सर्वच खूश झाले होते. संकल्पना अशी आहे की गावच्या शेतांवरील थोडा भाग वेगळा काढून चांगल्या खोल्या बांधल्या जातात. स्वच्छ राहण्याची सोय, गावाकडची चव व प्रेम जिभेला लावणारे जेवण, शेतात फिरण्याची संधी, शेती व अनेक प्रकारच्या उत्पन्नाची माहिती, गावचे खेळ बैलगाडीवर फेरफटका हे सर्व काही आपल्याला करता येते.
तावरेंनी मला विचारले, ‘‘तुम्ही कधी शेतात राहिला आहात का? पळून कोंबड्या पकडल्या आहेत का? भवरा खेळला आहात का? नाही ना मग सहकुटुंब या आणि हे अनुभव घ्या.’’ गावोगावी फिरून अनेक शेतकर्‍यांपर्यंत आज ही संकल्पना तावरेंनी पोहोचवली आहे. शेतीतून फारसे पैसे मिळत नसलेल्या शेतकर्‍यांसाठी हे कमाईचे दुसरे साधन ठरले आहे. एका वर्षात ४० हजार पर्यटक मालेगावमधील या कृषी पर्यटन स्थळाला भेट देऊन गेले. ‘‘शेतकरी म्हटले की अडाणी, बिनडोक असे आजही समजले जाते’’ असे ते सांगतात. शेतकर्‍यांच्या मुलांना लग्नाला मुली कुणी सहज देत नाही. पावसावर निर्भर राहणार्‍यांशी लग्न नको म्हणणार्‍यांनी ग्रामीण पर्यटन पाहून मत बदलले आहे. शेतकर्‍यांची मुले जी शहराकडे पळून जात होती ती आज शेतावर राहून ‘ऍग्रो टूरिझम’ करून घर चालवतात. प्रत्येक पर्यटकाचे पारंपरिक स्वागत केले जाते व त्यांना आपल्याच घरी आल्यासारखा अनुभव मिळतो. इथून गेलेला कुणीही भाजी मार्केटमध्ये कांदा-टोमॅटोचा भाव करणार नाही.

१५० शेतकर्‍यांना तावरेंनी हा उपक्रम सुरू करून दिला आहे. सोलापूरचे राजू असो किंवा मोरगावचे सुनील भोसले यांचे आयुष्य पांडुरंगाच्या कृपेनेच बदलले असे ते समजतात. पारंपरिक शेतीला कृषी व ग्रामीण पर्यटनाची जोड देऊन ग्रामीण विकासाला चालना देतानाच शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची संधी पांडुरंग तावरेंच्या कृषी पर्यटन विकास संस्थेमुळे काही वर्षांपासून मिळवून दिली. तावरेंना याच नावीन्यपूर्ण पर्यटन संकल्पनेसाठी रा्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आला. याच वर्षी हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी ‘१६ मे’ हा दिवस कृषी पर्यटन दिवस म्हणून जाहीर केला व त्यांनी दखल घेतल्यामुळे UNWT या संघटनेने या दिवसाला जागतिक मान्यता दिली आहे व जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून जाहीर केले आहे. लहान मुलांचे व मोठ्यांचे कॅम्पवर आल्यावरचे प्रश्‍न ऐकून व त्याची उत्तरे त्यांना सविस्तरपणे देऊन त्यांनी ही संकल्पना सार्थकी लागल्यासारखी वाटते. देशातील ६५ कोटी पर्यटक आहेत व ३५ कोटी महारा्रातील आहेत असे सर्वेक्षण सांगते. या ३५ कोटींनी पहिला महारा्र पाहावा अशी तावरेंची इच्छा आहे. पांडुरंगभाऊ आपल्याला या कार्यात खूप यश मिळो. मुळात ही संकल्पना एवढी चित्तवेधक आहे की सर्वांना एकदा तरी हा अनुभव घ्यावा अशी इच्छा असेलच. या संकल्पनेची संपूर्ण माहिती आपल्याला तावरेजींच्या संकेतस्थळावर मिळेल.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll