Welcome You All

RSS

तुषार व ठिबक सिंचन

सध्याच्या काळात तुषार व ठिबक सिंचन संचाची देखभाल योग्य प्रकारे करणे आवश्‍यक असते. योग्य देखभालीमुळे या पद्धतीचे संचाचे फक्त आयुष्यच वाढत नाही, तर त्याचबरोबर या सिंचन पद्धतीतून पिकास योग्य प्रकारे पाणीपुरवठा होऊन पिकाचे चांगले उत्पादनही मिळते.

तुषार सिंचन संचाची देखभाल ः
1) तुषार सिंचन संच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना संचाचे सर्व भाग व्यवस्थितरीत्या सुटे करून पुन्हा नवीन ठिकाणी जुळवावेत. तुषार पाइप जोडताना, एका पाइपचे टोक दुसऱ्या पाइपच्या कपलरमध्ये टाकताना त्याला माती किंवा कचरा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कपलरची रिंग खराब होण्याची शक्‍यता असते.
2) सततच्या वापराने कपलरची रबरी रिंग बदलावी लागते. ती बदलताना तिची दिशा योग्य असणे आवश्‍यक असते. यदा-कदाचित ती रिंग उलटी बसली गेली तर दोन पाइपच्या जोडातून पाणी गळत राहते. तुषार संचास पुरवायचे पाणी स्वच्छ नसल्यास सक्‍शन पाइपच्या व्हॉल्व्हला बारीक छिद्राची जाळी गुंडाळावी.
3) एक हंगाम संपून दुसऱ्या हंगामासाठी संच वापरण्यापूर्वी सुरवातीला लॅटरल पाइपचे बूच काढून त्यातून काही वेळासाठी पाणी बाहेर पडू द्यावे, म्हणजे पाइपमधील कचरा किंवा इतर गोष्टी निघून जातील. संच वापरात असताना तो नेहमी जोडलेल्या अवस्थेत ठेवावा, जेणेकरून उंदीर किंवा इतर किडे पाइपात जाऊन तुषार तोटीत अडकणार नाहीत.
4) तुषार तोटीतील वॉशर झिजले अथवा खराब झाले असल्यास ते बदलावे. तोटीच्या स्प्रिंगचा ताण कमी झाल्यास तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा स्प्रिंग थोडी ताणून तिचा ताण वाढवावा किंवा स्प्रिंग बदलावी. संचातील सर्व फिटिंग्जचे नट व बोल्ट्‌स वेळोवेळी घट्ट करावेत.
5) स्प्रिंकलरला कधीही ग्रीस अथवा ऑइल लावू नये. वापरात नसताना तुषार संचाच्या विविध भागांच्या रबरी रिंग कपलरमधून काढून थंड जागेत ठेवाव्यात. त्याचप्रमाणे तुषार तोट्या कोरड्या जागेत ठेवाव्यात.

ठिबक सिंचन संचाची देखभाल ः
1) ज्या पाण्यात लोहाचे प्रमाण तीन ते चार पीपीएम एवढे असते, असे पाणी ठिबक संचातून वापरल्यास तोट्या किंवा सूक्ष्म नलिका बंद पडण्याचा धोका असतो, त्यासाठी असे पाणी शक्‍यतो ठिबक संचातून वापरू नये.
2) तोट्या सूक्ष्म नलिका, तसेच गाळण टाक्‍या, मातीचे किंवा वाळूचे कण, काडीकचरा इ. अडकून बंद पडतात यासाठी वाळूच्या गाळण टाकीत साचलेली घाण पाणी उलट दिशेने वळवून बाहेर काढून टाकावी. धातूच्या गाळण टाकीत असलेल्या स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या चाळण्या बाहेर काढून ब्रशच्या साह्याने स्वच्छ कराव्यात. मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खत देण्याची यंत्रणा व गाळण यंत्रणा नियमित तपासाव्यात.
3) दररोज संच सुरू करण्यापूर्वी वाळूची यंत्रणा, पाण्याची दिशा उलटमार्गे वळवून साफ करावी व धातूच्या गाळण्या किमान आठवड्यातून एकदा ब्रशच्या साह्याने साफ कराव्यात. आठवड्यातून एकदा मुख्य व उपमुख्य नळीच्या शेवटच्या टोकाची थ्रेड कॅप काढून नेहमीपेक्षा सव्वा ते दीडपट जास्त दाबाने पाणी संचात सोडून साफ कराव्यात. याच पद्धतीने उपनळ्यांची शेवटची तोंडे उघडून त्या साफ कराव्यात.
4) पाण्यातील वेगवेगळ्या क्षारांची एकमेकांशी रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यापासून पांढऱ्या, तांबड्या अथवा काळ्या रंगाचे थर ठिबक संचाच्या विविध भागांत तयार होतात, त्यामुळे तोट्या बंद पडतात. रासायनिक प्रक्रियेमुळे ठिबक संच बंद पडल्यास आम्लप्रक्रिया करावी. साधारणपणे सहा महिन्यांच्या अंतराने उपनळ्यांवरील बंद पडलेल्या तोट्या एक टक्के आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात.
5) जैविक कारणांनी ठिबक संच बंद पडल्यास क्‍लोरिन प्रक्रिया करावी. ही प्रक्रिया साधारणपणे सहा महिन्यांच्या अंतराने करावी. आम्ल/क्‍लोरिन प्रक्रियेनंतर संपूर्ण संच पाण्याने स्वच्छ करणे आवश्‍यक असते, दुसऱ्या हंगामासाठी संच उपयोगात आण?य्‌ापूर्वीही आम्ल/क्‍लोरिन प्रक्रिया करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll