Welcome You All

RSS
Showing posts with label Irrigation. Show all posts
Showing posts with label Irrigation. Show all posts

ठिबक सिंचन पद्धतीची निवड

झाडांची पाण्याची गरज जमिनीचा प्रकार, झाडाचे वय, पीकवाढीची अवस्था व मुळांचा विस्तार यानुसार बदलते. भारी जमिनीत पाण्याचा ओलावा आडव्या दिशेने जास्त पसरतो, तर उभ्या दिशेने कमी पसरतो. याउलट हलत्या जमिनीत पाण्याचा ओलावा उभ्या दिशेने लवकर व जास्त पसरतो, तर आडव्या दिशेने कमी पसरतो. या सर्व बाबींवर ड्रीपर्सची संख्या, त्यांचा प्रवाह, ड्रीपर्समधील अंतर इत्यादी अवलंबून असते.
ठिबक संचामध्ये एका लॅटरलद्वारे किती पाण्याचा प्रवाह वाहून न्यायचा आहे, त्यानुसार लॅटरलची लांबी ठरविली जाते. जास्त लांबीच्या लॅटरल ठेवल्यास पाण्याचे वाटप समान होत नाही, तसेच लॅटरलची लांबी वाढल्यामुळे संचाचा खर्चही वाढतो. याउलट कमी लांबीच्या लॅटरल ठेवल्यास उपमुख्य नळीची लांबी वाढते, त्यामुळे झाडांची भविष्यातील (पूर्ण वाढ झाल्यानंतर) पाण्याची गरज व पंपातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन उपमुख्य नळीची मांडणी करावी.त्यानुसार मोठ्या बागेस विविध भागांत विभाजन करून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र व्हॉल्वची रचना करावी.यासाठी संचास लागणारा खर्च लक्षात घेऊन पाणी देण्यासाठी सोपा असलेला पर्याय निवडावा. आंतरमशागतीत कमीत कमी अडथळा होईल अशी मांडणी करावी.
झाडाची दररोजची पाण्याची गरज माहिती असल्यास ड्रीपर्सची संख्या, त्यांचा दर ताशी प्रवाह इ. ठरविता येतो. साधारणतः पहिल्या वर्षी एका ड्रीपरने पाणी दिल्यास पाणी पुरेसे होईल. दुसऱ्या वर्षी दोन ड्रीपर्स, तर तिसऱ्या व चौथ्या वर्षी तीन ड्रीपर्सने पाणी द्यावे. झाडाचा विस्तार पाचव्या वर्षी वाढल्यास एकाच लॅ टरलवर चार ड्रीपर्स लावू नयेत. साधारणतः झाडाचे वय पाच वर्षे झाल्यास एका ओळीसाठी दोन लॅटरल लावून ड्रीपर्सची संख्या वाढवावी. ठिबक सिंचन संच बसविताना संपूर्ण वाढलेल्या झाडांची पाण्याची गरज विचारात घेऊनच लॅटरल व ड्रीपर्सची संख्या, उपमुख्य नळीची आखणी इत्यादी करणे आवश्‍यक आहे.

ठिबक सिंचन पद्धतीची निवड :
अगदी सुरवातीच्या काळात फळझाडांना एका लॅटरलवर अनेक मायक्रोट्यूब (सूक्ष्म नलिका) लावून झाडाची पाण्याची गरज भागविली जात असे. कमी खर्चासाठी व सहज करता येण्यासारख्या या पद्धतीत मायक्रोट्यूबची लांबी कमी - जास्त होणे, मायक्रोट्यूब लॅटरलमधून निघून जाणे, त्यांना पीळ बसणे यामुळे पाण्याचे समसमान वाटप होत नाही, त्यामुळे शक्‍यतोवर मायक्रोट्यूब वापरणे टाळावे.

ठिबक सिंचन संचाची निगा :
ठिबक सिंचनाचे तंत्र वापरणे अत्यंत सोपे आहे; मात्र त्यासाठी संचाचे भाग, त्याचा वापर व निगा याबाबतीतील किमान माहिती घेणे आवश्‍यक आहे. ठिबक स ंचाची योग्य निगा व देखभाल न झाल्यास त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. पावसाळ्यानंतर किंवा ताण संपल्यानंतर संच सुरू करताना योग्य काळजी न घेतल्यास ठिबक तोट्या, लॅटरल बंद पडतात व पाणी प्रवाह बंद होतो. त्याचप्रमाणे खताच्या टाकीस छिद्रे पडणे, गाळ - कचरा साचणे अशा प्रकारचे प्रश्‍न नि र्माण होतात. अशा वेळी संच बंद करताना किंवा सुरू करताना काही काळजी घेणे आवश्‍यक आहे.

संच सुरू करताना घ्यावयाची काळजी :
1) संचासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत मोटारीची सर्व जोडणी तपासून पाहावी. मोटारीच्या वाइंडिंगला वॉर्निश देऊन दोन-चार दिवस उन्हात ठेवावी.
2) पंप व फूट व्हॉल्व स्वच्छ करून पंपास ग्रीसिंग करावे.
3) सिंगल फेज प्रोटेक्‍टर (एक फेज कार्य करीत नसल्यास विद्युतपुरवठा आपोआप खंडित करणारे उपकरण) बसविले असल्यास त्याची कार्यतत्परता तपासून पाहावी.
4) संचातील सर्व व्हॉल्व, प्रेशरगेज (दाबमापक), पाणीमापक (वॉटर मीटर) तपासून योग्य पद्धतीने कार्य करतात, याची खात्री करावी.
5) मुख्य पाइप, उपमुख्य पाइप, टेकअप, लॅटरल इ. भागांतील सर्व प्रकारची पाण्याची गळती थांबवावी.
6) खते देण्याची टाकी स्वच्छ करून जाळी फाटल्यास बदलून घ्यावी. वाळूच्या गाळण यंत्रणेतील वाळूची पातळी तपासून त्यात आवश्‍यकतेनुसार वाळू टाकावी.
7) सर्व लॅटरल व ठिबक तोट्या संबंधित झाडापर्यंत पसरवून घ्याव्यात. लॅटरल टेक ऑफ ग्रोमेटशी जोडून घ्याव्या. काही ठिकाणी गरजेनुसार ज्वाइनर लावून लॅटरलची लांबी वाढविता येते.
8) ड्रीपर्स तपासून घ्यावे. बंद असलेले ऑनलाइन ड्रीपर स्वच्छ करून घ्यावेत.
9) सर्व लॅटरल व ड्रीपर्स झाडांच्या मुळांच्या कक्षेत असल्याची खात्री करून घ्यावी व गरजेनुसार ड्रीपर बदलून घ्यावे. आवश्‍यकतेनुसार ड्रीपरची संख्या वाढवावी. नको असलेले ड्रीपरचे छिद्र गुफ प्लगद्वारे बंद करून घ्यावे.
10) सर्व लॅटरलचे शेवटचे टोक उघडून (एन्ड कॅप) संच सुरू असताना पाणी प्रवाहित करून घ्यावे.
11) काही लॅटरलमधून किंवा ड्रीपर्समधून पाणी कमी येत असल्यास संच सुरू झाल्यानंतर आम्ल / क्‍लोरिन प्रक्रिया करावी. यासाठी आम्ल किंवा क्‍लोरिन स ंचात सोडून संच 24 तास बंद ठेवावा. दुसऱ्या दिवशी संच सुरू करून संचाची सुरवातीपासून शेवटपर्यंत तपासणी करावी.
12) आम्ल / क्‍लोरिन प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा लॅटरलची शेवटची टोके, उपमुख्य नळीवरील प्लश व्हॉल्व उघडून पाणी प्रवाहित करावे. यामुळे संचातील गाळ, कचरा, विरघळलेले, क्षार संचाबाहेर काढण्यास मदत होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

महाराष्ट्र्रात जलसिंचनाचे प्रकार

महाराष्ट्र्रात जलसिंचनाचे पुढील प्रकार प्रचलित आहेत.
(१) विहीर जलसिंचन (२) तलाव जलसिंचन (३) उपसा जलसिंचन (४) ठिंबक सिंचन (५) तुषार सिंचन (६) कालवे

विहीर जलसिंचन :

महाराष्ट्र्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे १० लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून २,५४,७१० हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता ३२१८१० हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्र्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठयाचा अंदाज पाहता आणखी ११ लाख ८२ हजार विहिरी खोदता येतील.

तलाव जलसिंचन :

महाराष्ट्र्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण १५ टक्के आहे. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे.

पाझर तलाव :

महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात १९७२ साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे १४०० आहे, तर १८०० पाझर तलावंाची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी ३००० पाझर तलाव तयार होतील.

उपसा जलसिंचन :

विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करुन द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्र्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी ८टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दक्षिण महाराष्ट्र्रात विशेषत: कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्नागिरी व संधिुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.

ठिबक सिंचन :

जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरुप, बाष्पीभवनाचे प्रमाण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन पिकांच्या मुळाशी त्यांच्या गरजेपुरते पॉलिथिनच्या नळयांचे जाळे पसरुन तोटीच्या किंवा सूक्ष्म नळीद्वारे थंेबाथेंबाने किंवा बारीक धारेने पाणी देण्याच्या आधुनिक पध्दतीला ठिबक सिंचन म्हणतात.
मानवास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की, प्राप्त परिस्थितीत पर्याय शोधले जातात. १९८६ मध्ये द्राक्षे पिकविणार्‍या नाशिक जिल्हयास अवर्षणाचा तडाखा बसला तेव्हा त्यांनी द्राक्षाच्या बागा वाचविण्यासाठी ठिबक सिंचनाचा आधार घेतला आणि आता महाराष्ट्र्रात सिंचन पध्दतीत नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. महाराष्ट्र्राने सूक्ष्मलक्षी जलसिंचन तंत्रज्ञान, उच्च उत्पादकता व सुधारित दर्जा या बाबतीत देशात पाया घातला आहे. संपूर्ण देशातील ६०टक्के ठिबक सिंचन एकटया महाराष्ट्र्रात आहेत. फळे, पालेभाज्या, फुले इत्यादींसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. महाराष्ट्र्र शासनाने ऊस पिकासाठी देखील ठिबक सिंचनाचा प्रसार करण्यासाठी योजना हाती घेतली आहे.

तुषार सिंचन :

या पध्दतीमध्ये पंपाच्या साहाय्याने पाण्याचा आवश्यक तो दाब देऊन लहान लहान छिद्रावाटे फवार्‍याने पिकाला पाणी दिले जाते. तुषार सिंचन पध्दतीने पावसाप्रमाणे जमिनीवर पाणी पडते व त्याचे समान वितरण होते. या पध्दतीमुळे पारंपरिक जलसिंचन पध्दतीच्या तुलनेने ३० टक्के ते ३५ टक्के पाण्याची बचत होते, तर उत्पन्नात १० टक्के ते १५ टक्के वाढ होते. या पध्दतीमुळे पाण्याच्या फवार्‍याने पिकांची पाने सतत धुतली जातात. साहजिकच रोगराई आणि किडीचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये पाण्याचा साठा होत नाही व जमीन खारी बनत नाही हा एक मोठा फायदा आहे.

कालवे

महाराष्ट्र्रात जलसिंचन प्रकारात विहिरीच्या खालोखाल कालव्याद्वांरे सुमारे २३ टक्के क्षेत्र अमलात आणले जाते. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दख्खनच्या पठारावर कृष्णा, गोदावरी, भीमा आणि त्यांच्या उपनद्यांच्या क्षेत्रात पाटबंधारे योजना अमलात आणून कालव्याद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे योजनेमध्ये मोठी, मध्यम आणि लघुपाटबंधारे असे उपप्रकार पाडले आहेत. या सर्व योजना शासनामार्फत राबविल्या जातात.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामूहिक ठिबक सिंचन करणार गांव

सांगली जिल्ह्यातलं गोटखिंडी असं या गावाचं नाव आहे. या गावात ६०८ एकरात सामूहिक ठिबक लावण्याचं काम सध्या सुरु आहे, ठिबकची ही प्रणाली संपूर्ण संगणकीकृत असणार आहे. महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पुढाकारानं हा प्रकल्प पूर्णत्वास आलाय. आपलं पाणी आणि माती वाचवण्यासाठी या संस्थेनं हा निर्णय घेतलाय.
thibak
thibak
सांगली जिल्ह्यातलं गोटखिंडी हे गाव. १९८७ च्या आधी या गावाची स्थिती फारसी चांगली नव्हती. शेतीला पुरेसं पाणी मिळत नव्हतं आणि शेतीही फारसी पिकत नव्हती. ४ फेब्रुवारी १९८७ साली या गोटखिंडी या गावात महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना झाली. आणि गावचं चित्र बदलायला लागलं. या संस्थेचे ३०८ सभासद आहेत आणि ६०८ एकर लाभक्षेत्र आहे. संस्थेनं लिफ्ट इरिगेशनद्वारे गावापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या कृष्णा नदीचं पाणी गावात आणलं. आता शेतीला पाणी मिळालं होतं. शेती पिकायला लागली होती... पण गेल्या चार-पाच वर्षांपासून वीज आणि पाण्याचा लपनडाव सुरु झाला. पाण्याचा फेर परत कधी येईल याची शास्वती नव्हती. त्यामुळे शेतकरी ऊसाला भरमसाठ पाणी देऊ लागले. यातून क्षारपड जमिनीची समस्य़ा निर्माण झाली. उत्पादन घटू लागलं. शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली. यातून मार्ग काढण्यासाठी संस्थेच्या सभासदांचे प्रयत्न सुरु झाले. बैठका झाल्या, चर्चा झाली. शेवटी ३ मे २०१० ला संपर्ण क्षेत्रावर संगणकीकृत ठिबक सिंचन प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाला.

संगणकीकृत ठिंबक सिंचन प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार झाला. आता चिंता होती पैशाची, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही सभासदांची ही चिंताही मिटवली. बँकेकडून सभासदानां एकरी 30 हजार रूपये कर्ज मिळालं. 1 कोटी 80 लाख रूपये मंजूर झालं. या गोटखिंडी गावाचं 1600 हेक्टर क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्राला हक्काचा पाणी मिळण्याच्या कामाला वेग आला.

पाण्याच्या अनियमिततेमुळे ऊस, सोयाबीन, द्राक्ष, ज्वारी यासारख्या पिकांचं अर्थशास्त्र बिघडलं होतं. ठिबक सिंचनानं ही समस्या सुटेल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसला. ठिबक सिंचन प्रकल्पातून सभासदांना आता पिकनीहाय पाणी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचंही मार्गदर्शन मिळालं.

 संगणकीकृत ठिबक सिंचनासाठी 608 एकर क्षेत्राची चार भागात विभागणी केरण्यात आलीय.त्यातल्या वीस एकरला एक या प्रमाणं उपभाग तयार करण्यात आलेत. नदीवरून आणलेलं  पाणी 10 लाख लिटरच्या स्टोरेज टँकमध्ये साठवलं जाणार आहे. याच ठिकाणी संपूर्ण पाण्याची

कंन्ट्रोल रूमही राहणार आहे. याच रुममधून संगणकाद्वारे पाणी आणि खत सोडण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा उभारणीचं काम सध्या सूरू आहे.

याआधी पाटपाण्यानं दिवसाला 76 लाख लिटर पाण्यात 10 एकरचंही क्षेत्र भिजत नव्हतं. आता मात्र मोजून मापून पाणी मिळणार आहे. एकरी अडीच तासात साडेबारा हजार (१२,५००)लिटर पाणी दिलं जाणार आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात सात फूटाला एका लॅटरलचं नियोजन करण्यात आलंय.

याआधी गोटखिंडी गावात फारसं क्षेत्रं ठिबकखाली नव्हतं. पण आता शेतकऱ्यांना ठिबकचं महत्त्व कळलंय. संगणकीकृत ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांना पिकानुसार पाणी मिळणार आहे. शिवाय या शेतकऱ्यांना ऊसाव्यतिरीक्त इतर पिकांचेही पर्याय आता खुले झालेय.

महादेव पुरवठा संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना या सिस्टिमसाठी एकरी 58,366 रूपये खर्च येणार आहे. त्यात एकरी 15,000 रूपये अनुदान सोय आहे. संपूर्णत: संगणीकृत यंत्रणेमुळे मजुर, खत, पाणी आणि वेळेची बचत होणार आहे, शिवाय पिकांना पुरेसं पाणी मिळाल्यानं उत्पादनातही वाढ होणार हे नक्की. हे झालं गोटखिंडी या गावचं आणि महादेव पाणीपुरवठा संस्थेचं पाणी नियोजन. पण आजही अशी अनेक गावं आणि अनेक संस्था आजही अवाजवी पाण्याचा वापर करत आहे. या गावांना आणि संस्थांना आपली जमिनी वाचवण्यासाठी आतातरी ठिबक सिंचनाकडं वळाय़लाच हवं.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ठिबक सिंचनाचा वापर

जमीन वाफसा स्थितीत असतानाच झाडांची मुळे पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण अधिक कार्यक्षमतेने करू शकतात, त्यामुळे पाण्याच्या ताणाचा काळ वगळता जमीन वाफसा परिस्थितीत अधिक काळ राहील, अशाप्रकारे पाणी देणे आवश्‍यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमुळे पाण्याचे अनियमित वितरण होते, अन्नद्रव्यांचा जास्त प्रमाणात निचरा होतो. लोहासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडणे, बुरशीजन्य रोगांचा (डिंक्‍या, मूळकूज इ.) प्रसार होतो. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
जा स्तीचे पाणी किंवा पाण्याचा जास्त ताण या दोन्ही बाबींसाठी फळझाडे संवेदनशील असतात. यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते व झाडाचे आयुष्य कमी होते. भरपूर पाणी आहे म्हणून झाडांना जास्त पाणी द्यायचे, पर्यायाने झाडांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादन मिळेल, असा गैरसमज अजूनही काही शेतकऱ्यांचा आहे. जास्त पाण्यामुळे झाडाच्या मुळांना प्राणवायूचा पुरवठा होत नाही, झाडाची मुळे कुजतात व सडतात आणि अन्नद्रव्यांचा झाडास पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडतात. याउलट पाण्याचा जास्त ताण पडल्यास लहान फळांची गळ जास्त प्रमाणात होते,फळांची प्रत बिघडते, पाने कोमेजून हळूहळू वाळतात. नंतर झाडांची वाढ खुंटून त्यांचा ऱ्हास होतो.
मुळांना पाणी व पाण्याद्वारे अन्नद्रव्य शोषण करण्याच्या प्रक्रियेसाठी जमिनीत पुरेशी हवा (प्राणवायू) उपलब्ध असणे आवश्‍यक असते. मातीचा थर सिंचनाद्वारे संपृक्त झाला म्हणजे मुळांना पाणी व अन्नद्रव्ये मिळाली व झाडांची वाढ होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. जमीन वाफसा स्थितीत असतानाच झाडांची मुळे पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण अधिक कार्यक्षमतेने करू शकतात, त्यामुळे पाण्याच्या ताणाचा काळ वगळता जमीन वाफसा परिस्थितीत अधिक काळ राहील, अशाप्रकारे पाणी देणे आवश्‍यक आहे.
प्रवाही सिंचन पद्धतीमुळे पाण्याचे अनियमित वितरण होते, अन्नद्रव्यांचा जास्त प्रमाणात निचरा होतो. लोहासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडणे, बुरशीजन्य रोगाचा (डिंक्‍या, मूळकूज इ.) प्रसार होतो. हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
ठिबक सिंचन संच
ठिबक सिंचन संचाचे पंपसेट, मुख्य पाइप (मेन), उपमुख्य पाइप (सबमेन) व उपनळी (लॅटरल) हे मुख्य भाग असतात.

ठिबक तोटी किंवा ड्रीपर्स
ओळीतील प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक तोटीचा वापर केला जातो. ठिबक तोट्या दोन प्रकारच्या असतात, इनलाईन व ऑनलाइन. इनलाईन तोट्या या लॅटरलच्या आत लॅटरल तयार करतानाच टाकलेल्या असतात. लॅटरलच्या पृष्ठभागावर या तोट्यांची छिद्रे फक्त दिसतात. लॅटरलवर 10 ते 75 सें.मी. इतक्‍या अंतरावर या तोट्या बसविलेल्या असतात. ऑनलाइन तोट्या या साध्या लॅटरलवर छिद्रे करून बाहेरून बसविल्या जातात, त्यामुळे या तोट्या लॅटरलवर बाहेरून बसविलेल्या दिसतात.

गाळण यंत्रणा (फिल्टर)
गाळण यंत्रणा (फिल्टर) हा ठिबक सिंचन संचाचा गाभा (मुख्य घटक) आहे. उपलब्ध पाणी योग्य रीतीने गाळून ते संचास पुरविण्याचे महत्त्वाचे काम फिल्टर करते, त्यामुळे सिंचनाचे पाणी तपासल्यानंतर पाण्याच्या गुणवत्तेनुसार योग्य फिल्टरची निवड करावी.
पाणी वाहते; परंतु गढूळ असेल, कचऱ्याचे प्रमाण कमी असेल, विहीर किंवा बोअरचे पाणी असेल तर जाळीचा (स्क्रीन) फिल्टर वापरावा. साधारण: हा फिल्टर सर्वच संचांसोबत वापरला जातो; परंतु पाण्याच्या प्रतीनुसार इतर फिल्टर वापरावेत. पाण्यामध्ये शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व तरंगणारा कचरा असेल किंवा साठलेले पाणी वापरावयाचे असेल, तर वाळूचे (सॅंड) फिल्टर वापरावे. या फिल्टरच्या टाकीमध्ये 3/4 भाग वाळूने भरलेला असतो. पाणी या वाळूतून बाहेर पडते, त्यामुळे शेवाळ, सेंद्रिय तसेच तरंगणारे पदार्थ वाळूमध्ये अडवून बसतात व स्वच्छ पाणी संचास पुरविले जाते. पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतील; परंतु विरघळलेले क्षार जास्त प्रमाणात असतील तर डिस्क (चकत्यांचे) फिल्टर वापरावे. नदी किंवा विहिरींच्या पाण्यामध्ये वाळूचे कण येत असतील, तर हायड्रोसॉयक्‍लीन (शंकू आकाराचा) फिल्टर वापरतात. बोअरचे पाणी कमी झाल्यास शेवटी बोअरच्या पाण्यासोबतच वाळूचे कणसुद्धा येतात. अशा वेळी हायड्रोसायक्‍लॉन फिल्टरद्वारे हे वाळूचे कण पाण्यातून बाहेर काढता येतात.
ठिबक सिंचन संचासोबत स्क्रीन फिल्टर हा आवश्‍यकच असतो; मात्र पाण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन एकत्रितपणे दोन फिल्टरचा वापर केल्यास उत्तम ठरते.

ठिबक संचाचे घटक
यामध्ये प्रामुख्याने प्रेशर गेज, व्हॉल्व, बायपास असेंब्ली यांचा समावेश असतो. प्रत्येक शेतकऱ्याने संचासोबत प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्‍यक आहे. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंच्युरीद्वारे खतमिश्रित पाणी किती सोडायचे या सर्व बाबींसाठी फिल्टर व व्हेंच्युरी यांच्या इनलेट व आऊटलेट पाइपवर प्रेशर गेज (दाबमापक) बसवावे.
पंपाच्या डिलिव्हरीजवळ किंवा संचाच्या मुख्य पाइपवर प्रेशर गेज बसवून संच किती दाबावर चालू आहे, हे माहिती होते. ठिबक संच साधारणतः 1.0 कि.ग्रॅ. / वर्ग सें.मी. या दाबावर चालविला जातो. दाब कमी झाल्यास काही व्हॉल्व बंद करून संच 1.0 कि.ग्रॅ. / वर्ग सें.मी. एवढ्या दाबावरच चालवावा. दाब जास्त झाल्यास मुख्य पाइपला इनवर असलेल्या बायपास असेंब्लीद्वारे पाणी परत मागे मुख्य स्रोतात (विहिरीत) सोडता येते. पाण्याचे सर्व झाडांना योग्य प्रमाणात वितरण होण्यासाठी संच विहित दाबावरच चालविणे आवश्‍यक असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll