महाराष्ट्र्रात जलसिंचनाचे पुढील प्रकार प्रचलित आहेत.
(१) विहीर जलसिंचन (२) तलाव जलसिंचन (३) उपसा जलसिंचन (४) ठिंबक सिंचन (५) तुषार सिंचन (६) कालवे
विहीर जलसिंचन :
महाराष्ट्र्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे १० लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून २,५४,७१० हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता ३२१८१० हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्र्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठयाचा अंदाज पाहता आणखी ११ लाख ८२ हजार विहिरी खोदता येतील.
तलाव जलसिंचन :
महाराष्ट्र्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण १५ टक्के आहे. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणार्या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे.
पाझर तलाव :
महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात १९७२ साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे १४०० आहे, तर १८०० पाझर तलावंाची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी ३००० पाझर तलाव तयार होतील.
उपसा जलसिंचन :
विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करुन द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्र्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी ८टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दक्षिण महाराष्ट्र्रात विशेषत: कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्नागिरी व संधिुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.
ठिबक सिंचन :
जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरुप, बाष्पीभवनाचे प्रमाण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन पिकांच्या मुळाशी त्यांच्या गरजेपुरते पॉलिथिनच्या नळयांचे जाळे पसरुन तोटीच्या किंवा सूक्ष्म नळीद्वारे थंेबाथेंबाने किंवा बारीक धारेने पाणी देण्याच्या आधुनिक पध्दतीला ठिबक सिंचन म्हणतात.
मानवास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की, प्राप्त परिस्थितीत पर्याय शोधले जातात. १९८६ मध्ये द्राक्षे पिकविणार्या नाशिक जिल्हयास अवर्षणाचा तडाखा बसला तेव्हा त्यांनी द्राक्षाच्या बागा वाचविण्यासाठी ठिबक सिंचनाचा आधार घेतला आणि आता महाराष्ट्र्रात सिंचन पध्दतीत नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. महाराष्ट्र्राने सूक्ष्मलक्षी जलसिंचन तंत्रज्ञान, उच्च उत्पादकता व सुधारित दर्जा या बाबतीत देशात पाया घातला आहे. संपूर्ण देशातील ६०टक्के ठिबक सिंचन एकटया महाराष्ट्र्रात आहेत. फळे, पालेभाज्या, फुले इत्यादींसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. महाराष्ट्र्र शासनाने ऊस पिकासाठी देखील ठिबक सिंचनाचा प्रसार करण्यासाठी योजना हाती घेतली आहे.
तुषार सिंचन :
या पध्दतीमध्ये पंपाच्या साहाय्याने पाण्याचा आवश्यक तो दाब देऊन लहान लहान छिद्रावाटे फवार्याने पिकाला पाणी दिले जाते. तुषार सिंचन पध्दतीने पावसाप्रमाणे जमिनीवर पाणी पडते व त्याचे समान वितरण होते. या पध्दतीमुळे पारंपरिक जलसिंचन पध्दतीच्या तुलनेने ३० टक्के ते ३५ टक्के पाण्याची बचत होते, तर उत्पन्नात १० टक्के ते १५ टक्के वाढ होते. या पध्दतीमुळे पाण्याच्या फवार्याने पिकांची पाने सतत धुतली जातात. साहजिकच रोगराई आणि किडीचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये पाण्याचा साठा होत नाही व जमीन खारी बनत नाही हा एक मोठा फायदा आहे.
कालवे
महाराष्ट्र्रात जलसिंचन प्रकारात विहिरीच्या खालोखाल कालव्याद्वांरे सुमारे २३ टक्के क्षेत्र अमलात आणले जाते. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दख्खनच्या पठारावर कृष्णा, गोदावरी, भीमा आणि त्यांच्या उपनद्यांच्या क्षेत्रात पाटबंधारे योजना अमलात आणून कालव्याद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे योजनेमध्ये मोठी, मध्यम आणि लघुपाटबंधारे असे उपप्रकार पाडले आहेत. या सर्व योजना शासनामार्फत राबविल्या जातात.
0 comments:
Post a Comment