शासकीय फळरोपवाटीका व्यवस्थापन
फलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी ओळखतात. विविध फळ पिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात त्या विभागात त्या त्या फळपिकांच्या रोपवाटीकांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या राज्यात १ राज्यस्तरीय, २९ जिल्हास्तरीय, १०४ तालुकास्तरीय आणि २ पश्चिमघाट विकास अंतर्गत अशा एकूण १३६ फळ रोपवाटिका कार्यरत आहेत. राज्यात सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आवश्यक कलमा / रोपाची उपलब्धता राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठ व पंजीकृत खाजगी रोपवाटीकांवरून करण्यात येत आहे. आज राज्यात १३६ शासकीय फळरोपवाटीकांबरोबरच कृषी विद्यापीठांच्या ४२ तर १३०० पंजीकृत खाजगी रोपवाटीका स्थापन झालेल्या आहेत. या सर्व रोपवाटीकांवर सध्या सुमारे २.५ ते ३.०० कोटी कलमे व रोपे उपलब्ध होतात.
सन २००७-०८ या वर्षात शासनाने रोहयो अंतर्गत व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवडीसाठी ७८,००० हेक्टरचे लक्षांक ठरविले असून त्यासाठी २.९४ कोटी कलमे / रोपे आवश्यक आहेत. या सर्व फलोत्पादन विकास कार्यक्रमांसाठी तसेच रोख विक्रींसाठी शासनाने कलमा / रोपांचे विक्रीवर निश्चित केलेले आहेत. सदरच्या विक्रीदराचा तपशील शेतकरी मासिकाच्या माहे ऑगस्ट-२००७ च्या अंकात पृष्ठ क्रमांक ४१ वर दिलेला आहे.
0 comments:
Post a Comment