ह्या देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर औद्योगिक कामकऱ्यांची गरज आहे. देशातील ६०% हून अधिक लोक शेतात काम करतात (आणि त्यातही ४०% लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळते!). हे सगळे हात देशाच्या आर्थिक समृद्धिला हातभार लावायला असमर्थ आहेत कारण रोजगार निर्माण करण्याच्या नावाखाली शेतजमिनीच्यामालकांना सरकार वाटेल त्या सवलती देते, पण ह्या सवलती घेउनही शेताचे उत्पादन वाढत नाही. अणि कसे वाढणार उत्पादन? देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षात दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही. शिवाय काम करणाऱ्यांपेक्षा काम मागणारे अधिक असल्यामुळे त्यांचे शोषण चालू आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त २% लोक शेतात काम करतात, आणि तरीही अमेरिकेचे धान्य उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे. ह्याचे कारण असे की जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जर शेती केली तर ती किफायती ठरत नाही. धान्याबरोबरच ह्या देशाला इतर साधनसामुग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडे नसल्यानेह्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर जर औद्योगिक कामाकडे वळवले तर देशाची परिस्थिती सुधारेल. औद्योगिक क्षेत्रात देशातले १२% लोक काम करतात आणि देशाचे जवळजवळ ३०% उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) काढतात. ह्याउलट, शेतकी व्यवसायात देशातले ६०% हून अधिक लोक काम करतात आणि केवळ १७% उत्पन्न काढतात. यावरून हे दिसून येईल की शेतावर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा, औद्योगिक मजुरांची उत्पादन क्षमता काही पटींनी अधिक आहे. सोपा हिशेब आहे: देशातल्या ४०% शेत कामकऱ्यांना जर औद्योगिक क्षेत्राकडे वळवले तर देशाचे उत्पन्न ३ पटींनी वाढेल. अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही, पण गेल्या ६० वर्षात नक्कीच करता आले असते. पण गांधीजींच्या भोंगळ कल्पनांमध्ये गुंतून देशाने आपले नुकसान करून घेतले आहे. शिवाय औद्योगिकीकरणामुळे शोषणही कमी होते, कारण औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग संघटीत आहे (लेबर युनियन्स), पण शेतमजुरांचे असे संघटन फार कमी प्रमाणावर बघायला मिळते.
0 comments:
Post a Comment