शेतकरी मासिक योजना
शेतकरी मासिक हे राज्य शासनामार्फत सन १९६५ पासून प्रकाशित करण्यात येत आहे. हे मासिक शेतकय्रांच्या सेवार्थ कृषी आयुक्तालयामार्फत दरमहा प्रसिद्ध केले जाते. कृषी व कृषी सलग्न विषयाशी निगडीत माहितीपर लेख कृषी विद्यापिठांचे तज्ज्ञ, कृषी खात्यांचे अधिकारी, कृषी क्षेत्रात काम करणाय्रा संस्था तसेच अनुभवी शेतकरी यांचेकडून प्राप्त करून घेऊन प्रसिद्ध केले जातात. राज्यातील शेतकय्रांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीविषयक झालेले संशोधन वेळोवेळी या मासिकाच्या माध्यमातून पुरवून महाराष्ट्रातील विविध पिकांची हेक्टरी उत्पादकता वाढविण्याचा उद्देश हे मासिक प्रकाशीत करण्यामागे आहे. या सोबतच शेतकय्रांना आधूनिक शेतीची माहिती देऊन त्याच्या शंका, अडचणी दूर करण्याचे कामही या मासिकाद्वारे करण्यात येते. शेतकय्रांसाठी वेळोवेळी विविध विषयांवरील विशेषांकही प्रसिद्ध करून वर्गणीच्या किंमतीतच वर्गणीदारांना उपलब्ध करून देण्यात येतात. महाराष्ट्र राज्यासोबतच देशातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा इ. राज्यात या मासिकाचे १,३०,००० वर्गणीदार आहेत.
सद्यःस्थितीत या मासिकाची वार्षीक वर्गणी रूपये १००/- व द्वैवार्षीक वर्गणी रूपये २००/- असून प्रति अंकाची किंमत रूपये १०/- एवढी आहे. वर्गणी डीडी अथवा मनिऑर्डरने संपादक, शेतकरी मासिक, कृषीभवन, शिवाजीनगर, पुणे-५ या पत्यावर स्वीकारली जाते. शेतकरी मासिकाचे कोणासही व केव्हाही वर्गणीदार होता येते. कृषी विभागाच्या ग्राम, मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावरील कार्यालयात वर्गणीदार करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
0 comments:
Post a Comment