ख रीप हंगामात बटाट्याची लागवड जून - जुलै महिन्यात करतात. लागवडीसाठी 45 ु 30 सें.मी. सरी-वरंबे तयार करावे. कुफ्री लवकर, कुफ्री सिंदुरी, कुफ्री चं द्रमुखी, कुफ्री ज्योती या जाती चांगल्या आहेत. हेक्टरी 800 ते 1500 किलो बियाणे वापरावे. लागवडीसाठी बटाट्याच्या फोडी करते वेळी कोयता ब्लायटॉ क्सच्या (0.3 टक्के) द्रावणात बुडवून घ्यावा.
लागवडीपूर्वी बियाणे कॅप्टन 30 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून लागवड करावी. लागवडीपूर्वी ज मिनीत चांगले शेणखत मिसळून माती परीक्षणानुसार 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 120 किलो पालाश रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पैकी लागवडी वेळी 50 किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्याने उर्वरित नत्राची 50 किलो प्रति हेक्टर मात्रा देऊन पिकाला मातीची भर द्यावी. मगदुरानुसार व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. बटाटा पीक 90 ते 110 दिवस झाल्यानंतर काढणीस येते. हेक्टरी सरासरी 20 ते 30 टन उत्पादन मिळते.

0 comments:
Post a Comment