ना रळ लागवड करताना दोन माडांत योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल, तसेच ठेंगू जातीसाठीदेखील 20 फूट अंतर चालू शकते. जमिनीच्या प्रकारानुसार पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर 1 ु 1 ु 1 मीटर खड्डे खोदणे आवश्यक असते. नारळाच्या बाणवली, प्रताप; तर संकरित जातींमध्ये टी ु डी आणि डी ु टी या जाती चांगल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध होतात.
रोपवाटिकेत लवकर रुजलेली नऊ ते बारा महिने वयाची रोपे निवडावी. त्यांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्षे वयाच्या रोपांना चार ते सहा पाने असावीत. रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.
खत व्यवस्थापन ः नारळाच्या जातीप्रमाणे साधारणतः पाचव्या ते सातव्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. फलधारणा झाल्यापासून सात ते 12 महिन्यांत नारळ काढण्यास तयार होतो. चांगली फळधारणा होण्यासाठी खते वेळेवर देणे खूप महत्त्वाचे असते. माडाला पाण्याबरोबर पुरेशा प्रमाणात खते दिल्यास माड लवकर फुलोऱ्यात येऊन नियमित उत्पन्न मिळते. माडाच्या झाडाला पाचव्या वर्षापासून पाच घमेली शेणखत, 2.250 किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट व दोन किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. लहान माडांना त्यांच्या वयानुसार खतांचे प्रमाण कमी करावे. पहिल्या वर्षी बुंध्यापासून 30 सें.मी. अंतरावर सभोवार खते पसरून द्यावीत व विळ्याने अथवा कुदळीने मातीत पसरावीत. नंतर प्रत्येक वर्षी 30 सें.मी. अंतर वाढवून पाच ते सहा वर्षांनी खते माडाभोवती 1.5 ते 1.80 मी. अंतरावर टाकून मातीत मिसळावीत. शेणखत व स्फुरद इतर खतांबरोबर जून महिन्यात एकाच हप्त्यात द्यावे. नत्र व पालाश ही खते जून, सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात असे तीन समान हप्त्यांत द्यावीत. खते दिल्यानंतर लगेच माडांना पाणी द्यावे. नारळापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात नारळाच्या झावळ्या व बागेतील इतर वनस्पतींपासून तयार केलेले 50 किलो गांडूळ खत आळे पद्धतीने द्यावे.

0 comments:
Post a Comment