एकेरी लॅटरल पद्धतीत झाडाच्या मुळांच्या विस्तारानुसार व वयानुसार एकाच लॅटरलवर एक ते तीन ड्रीपर्स लावावे; परंतु झाडाचा विस्तार वाढल्यानंतर लॅटरलवर छिद्रे पाडून झाडाच्या खोडापासून दोन्ही बाजूस ड्रीपर्सची आवश्यकता असते. यासाठी सूक्ष्म नलिका लॅटरलमध्ये टाकून त्याच्या दुसऱ्या टोकास ड्रीपर बसवावे. सध्या बाजारात आऊटलेट ड्रीपर्स उपलब्ध आहेत, त्यानुसार एकाच छिद्रातून सूक्ष्म नळ्यांद्वारे झाडाच्या दोन्ही बाजूस पाहिजे त्या अंतरावर ड्रीपर्सची मांडणी करता येते.
श्रदुहेरी समांतर लॅटरल पद्धत : झाडाचा विस्तार जास्त झाल्यास एकेरी लॅटरल पद्धती वापरण्यात अनेक मर्यादा येतात. अशा वेळी दुहेरी समांतर लॅटरल पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. यामध्ये झाडाच्या दोन्ही बाजूंस खोडापासून समान अंतरावर दोन नळ्या समांतर टाकलेल्या असतात. झाडाच्या पाण्याच्या गरजेनुसार प्रत्येक नळीवर ऑनलाइन ड्रीपर्स जोडलेले असतात. या पद्धतीमध्ये झाडाच्या मुळाजवळ ओलाव्याचे प्रमाण एकेरी नळी पद्धतीपेक्षा वाढलेले असते, तसेच झाडाच्या मुळाचा विस्तार व्यापला जातो.
श्ररिंग पद्धत : ऑनलाइन पद्धतीचा वापर झाडाच्या मुळाच्या परिघामध्ये रिंग पद्धतीने केला जातो; मात्र ऑनलाइन ठिबक पद्धतीचा वापर रिंग पद्धतीने केल्यास ठिबक तोट्या लॅटरलमधून निसटून जाऊ शकतात.
श्रऑनलाइन पद्धतीतील दुहेरी समांतर लॅटरल पद्धत सर्वांत योग्य. मात्र, लॅटरल जमा करताना किंवा पसरविताना या पद्धतीतील तोट्या निघून जाऊ शकतात. प्रत्येक आंतरमशागतीच्या वेळी लॅटरल उपमुख्य पाइपपर्यंत गुंडाळून ठेवावे लागते, तसेच बरेचदा मोठ्या झाडाच्या मुळाच्या परिघापर्यंत पाण्याचा ओलावा स मान पसरत नाही.
इनलाइन ठिबक सिंचन पद्धत
श्रअलीकडच्या काळात इनलाइन ठिबकचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो. ओळीतील झाडांचे अंतर कमी असल्यास ही पद्धत वापरली जाते. यामध्ये दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीचा प्रकार किंवा जमिनीत पाणी कसे पसरते, यानुसार 40 ते 75 सें.मी.पर्यंत निवडावे.
श्रइनलाइन ठिबक लॅटरलमध्ये ड्रीपर्स लॅटरलच्या आतमध्ये असल्यामुळे हे ड्रीपर्स निघून पडण्याची शक्यताच नाही; मात्र या पद्धतीमध्ये ड्रीपर्स बंद पडल्यास उघडून स्वच्छ करण्याची सोय नसते, त्यामुळे त्यांना क्लोरिन किंवा आम्ल प्रक्रियेद्वारे स्वच्छ करता येते.
श्रएकेरी किंवा दुहेरी लॅटरल पद्धत : काही शेतकरी ओळींतील अंतर जास्त ठेवून, प्रत्येक ओळीत झाडांतील अंतर कमी ठेवून मोसंबीची लागवड करतात, त्यामुळे अशा लागवडीसाठी इनलाइन ठिबक पद्धतीतील एकेरी किंवा दुहेरी लॅटरल मांडणी योग्य; मात्र सुरवातीच्या काळात जेव्हा झाडांचा विस्तार कमी असतो, त्या वेळी झाडातील रिकाम्या क्षेत्रातसुद्धा पाणी दिले जाते.
श्ररिंग पद्धत : इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर रिंग प्रकारच्या मांडणीमध्ये सर्वांत योग्य असतो. यामध्ये प्रत्येक झाडास त्याच्या मुळांच्या परिघाप्रमाणे इनलाइन लॅटरलची रिंग करून मुळांचा विस्तार व्यापला जातो. एका ओळीतील सर्व झाडांच्या अशा रिंग उपमुख्य नळीपर्यंत साध्या (बिनछिद्राच्या) लॅटरलने जोडल्या जातात. या पद्धतीने पाण्याचा ओलावा समान रीतीने पूर्ण परिघामध्ये पसरला जातो, तसेच लॅटरल गुंडाळताना दोन रिंगमधील जोडणीची नळी तेवढीच काढून झाडाच्या आळ्यामध्ये ठेवता येते. यामुळे लॅटरल गुंडाळताना किंवा पसरविताना होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
0 comments:
Post a Comment