Welcome You All

RSS

सूर्यफूल लागवड

सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 बैलगाड्या (10 ते 12 टन) चांगले कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळावे. पेरणी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये करावी. मध्यम ते खोल जमिनीमध्ये 45 ु 30 सें.मी., भारी जमिनीत 60 ु 30 सें.मी. आणि संकरित वाणांची 60 ु 30 सें.मी. अंतराने पेरणी करावी.
पेरणी पद्धत : कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे पाच सें.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी-वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी. पेरणीसाठी सुधारित वाणाचे पाच ते दहा किलो, तर संकरित वाणाचे पाच ते सहा किलो बियाणे प्रति हेक्‍टरी वापरावे.
बीजप्रक्रिया : मर रोगाच्या प्रतिबंधासाठी दोन ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग नियंत्रणासाठी / टाळण्यासाठी सहा ग्रॅम ऍप्रॉन (35 एस.डी.) प्रति किलो बियाण्यास चोळावे, तसेच विषाणूजन्य (नेक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्‍लोप्रिड (70 डब्लू.पी.) पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर हे जिवाणू खत 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
आंतरपीक : आंतरपीक पद्धतीत सूर्यफूल + तूर (2:1 किंवा 2:2) आणि भुईमूग + सूर्यफूल (6:2 किंवा 3:1) या प्रमाणात ओळीने पेरावे.
रासायनिक खते : कोरडवाहू पिकास प्रति हेक्‍टरी 2.5 टन शेणखत, 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्‍टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे. यापैकी 30 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेली 30 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्‍टरी 20 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.
सुधारित वाण ः एस.एस. 56, मॉर्डन, ई.सी. 68414, भानू
संकरित वाण ः के.बी.एस.एच.-1, एल.डी.एम.आर.एस.एच-1, एल.डी.एम.आर.एस.एच-3, एम.एस.एफ.एच.-17, के.बी.एस.एच.-44, फुले रविराज

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll