Welcome You All

RSS

एकाधिकार कापूस खरेदी योजना

कापुस उत्पादनाबाबत काही वैशिष्टये

१) महाराष्ट्र्र हे भारतातील कापुस उत्पादक राज्यापैकी एक प्रमुख राज्य आहे.
२) जगाच्या तुलनात्मकदृष्टया भारतात कापूस लागवडीखालील क्षेत्र भारताच्या तुलनात्मकदृष्टया ३० टक्के आहे.
३) जगाच्या तुलनात्मकदृष्टया भारतातील कापूस उत्पादन १५ टक्के आहे. तर महाराष्ट्र्रातील कापूस उत्पादकता भारताच्या सरासरी कापूस उत्पादकतेच्या ५० टक्के एवढी आहे.
४) जगाच्या तुलनात्मदृष्टया भारतातील कापूस उत्पादकता प्र. हे. ५० टक्के आहे मात्र महाराष्ट्र्रातील कापूस उत्पादकता भारताच्या सरासरी कापूस उत्पादकतेच्या ५० टक्के एवढी आहे.
१) महाराष्ट्र्र शासनाने ऑगस्ट १९७२ पासून राज्यामध्ये एकाधिकार कापूस खरेदी योजना कार्यान्वित केली. केंद्र शासनाच्या मान्यतेने वेळोवेळी योजनेस मुदतवाढ देण्यात आली.
२) २००१ पासून पुढील पाच वर्षासाठी या योजनेस मुदत वाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ हा शासनाचा प्रमुख अभिकर्ता म्हणून योजनेचे काम करीत आहे.

योजनेची ठळक वैशिष्टे :

१) राज्यातील कापूस उत्पादकांना रास्त व किफायतशीर भाव मिळवून देणे.
२) कापूस दलालांना दुर करुन किफायतशीर भावाचा पूर्ण फायदा कापूस उत्पादकांना मिळवून देणे.
३) कापूस उत्पांदकाना स्थिर उत्पन्न प्राप्त करुन देणे व त्यायोगे राज्यातील कापूस उत्पादनात वाढ करुन स्थैर्य निर्माण करणे.
४) ग्राहक गिरण्यांना (च्ेन्स्ुम्एर म्ल्ल्स्)ि शास्त्रशुध्द रीतीने प्रतवारी केलेला कापूस पुरविणे.
५) कापूस खरेदी, प्रक्रिया व विक्री या कामी सहाकारी संस्थांना पुर्णपणे गूतवून एकंदर सहकारी संस्थांना बळकटी आणणे.
६) विक्री व सहकारी कर्ज वसुली यामध्ये परिणामकारकरित्या सांगड घालणे.
७) कापसाच्या वेगवेगळया प्रक्रिया म्हणजे जिनिग व प्रेसिग, सरकीचे गाळण, सूत कताई व विणाई इ. ची सांगड घालुन ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे. जेणेकरुन वाढीव उत्पादनाचा लाभ गिरणी कामगार व कापूस उत्पादक या दोघांनाही मिळू शकेल.

हंगाम १९७२-७३ ते २००२-०३ काळातील योजना

१) एकुण कापूस खरेदी २४२२.६२ लाख किंटल/बांधलेल्या गाठी ४९५.०७ लाख.
२) कापूस उत्पादकाना अदा केलेले सुमारे रुपये २८२७३ कोटी.
३) कापूस उत्पादकांची संख्या ३५ लाख.
४) एकुण सहकारी कर्ज वसुली रुपये २३३५ कोटी.

रोजगाराच्या संधी उपलब्ध

१) कापूस पणन महासंघात कायम स्वरुपी २००० सेवक.
२) योजनेकरीता हगामी सेवक पहारेकरी ५०००,
३) योजनेकरीता मजुर, हमाल, इत्यादी ४००००,
४) या शिवाय खरेदी विक्री संघ, जिल्हा सहकारी बॅका, सहकारी जिनिंग प्रेसिग संस्था यामधील कायम स्वरुपी हंगामी
स्वरुपाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
शासनाने आतापर्यतच्या झालेल्या रु ३६६५ तूटी पोटी आजतागायत रु.१७२४ कोटी योजनेस उपलब्ध करुन दिलेले आहेत. मुक्त बाजारपेठेत एकाधिकार कापूस खरेदी योजना राबविणे हे अत्यंत जिकरीचे आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रथमच या योजनेत बदल करून हंगाम २००२-०३ मध्ये खाजगी जिनिंग प्रेसिंग संस्था सहकारी सूत गिरण्या, सी. सी .आय. इत्यादीचा शासनासोबतच चढाओढीने कापूस खरेदीची परवानगी दिली. राज्य शासनाने हंगाम २००२-०३ अंतर्गत लांब धाग्याच्या कापसाचे भाव रु २३०० व हंगाम २००३-०४ करीता रु. २५००/- प्रती किंव्टल जाहिर केले. पर्यायाने राज्यातील ३५ लाख कापूस उत्पादकांना या मुक्त बाजारपेठेचा फायदा मिळून त्यांना त्यांचा कापूस विकण्यासाठी पर्याय उपलब्ध होऊन कास्तकांरामध्ये संतोष निर्माण झाला. या बदलाचा फायदा राज्य शासनास होऊन ७५ कोटीचा हमी किंमतीवर निव्वळ नफा झाला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विदर्भातला शेतकरी कापसावर अवलंबून आहे

गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भातला शेतकरी कापसावर अवलंबून आहे. कापसानंतर इथल्या शेतकऱ्यांना आधार आहे तो सोयाबीनचा. पण कोरडवाहू कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता ही हक्काची पिकं तोट्याची पिकं ठरत आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही.
कापूस

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे तुषार टापरे गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाची लागवड करतात. कापूस हाच त्यांच्या जगण्याचा आधार. त्यांच्या परिसरातला कापूस लाँग स्टेपलचा असल्याने या कापसाची निर्यातही केली जाते. पण यंदा त्यांची परिस्थिती बिकट आहे. दरवर्षी एकरी सहा क्विंटल कापसाचं उत्पादन ते घ्यायचे, पण यंदा त्यांना एकरी तीन क्विंटलही उत्पादन मिळण्याची आशा नाही. सध्याच्या चार हजार रुपये क्विंटल दरानुसार त्यांना यातून १२ हजार रुपये मिळणार आहे. आता एक एकर कापसाच्या शेतीसाठी त्यांनी केलेला खर्च पाहूया....

पूर्वमशागत - १३०० रु.
बियाणं     - १५०० रु.
लागवड    - १५०० रु.
खत        - ३००० रु.
फवारणी    - २००० रु.
वेचणी      - २००० रु.

अशाप्रकारे तुषार टापरे यांना एकरी ११ हजार ३०० रुपये खर्च आला आणि सध्याच्या दरानुसार कापसातून त्यांना मिळतायत १२ हजार रुपये. सध्याच्या दरात कापसाची शेती परवडत नाही, त्यामुळे कापसाला किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याचं तोट्याचं गणित आपण पाहिलं. विदर्भातलं दुसरं हक्काचं पीक म्हणजे सोयाबीन, यंदा
सोयाबीन
सोयाबीनचीही  परिस्थिती वेगळी नाही. सोयाबीनचा एकरी उत्पादन खर्च साधारण नऊ हजारांच्या आसपास आहे आणि यंदा सोयाबीनची सरासरी एकरी उत्पादकता आहे पाच ते सहा क्विंटल. सध्या सोयाबीनला १८०० ते २,००० रुपये  क्विंटल दर मिळतोय. यानुसार सोयाबीनचं एकरी उत्पन्न मिळते ते फक्त १० हजारांच्या आसपास. एकरी खर्च नऊ हजार आणि उत्पादन फक्त १० हजार. त्यामुळे सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित तीन हजार रुपये क्विंटल दर मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत.

तोट्याच्या कोरडवाहू कापसामुळे यंदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विदर्भात कोरडवाहू शेतकऱ्यांचं प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर ओलीताच्या शेतीत कापसाची चार बोंड जास्त लागतील अशी आशा होती. पण सततच्या लोडशेडिंगमुळे त्या आशाही मावळत आहेत. आधीच कापसाचं उत्पादन कमी त्यात शासकीय खरेदी सुरु न झाल्यामुळे व्यापाऱ्यांची मनमानी खरेदी सुरुच आहे. 

विदर्भातली दोन हक्काची पिकं कापूस आणि सोयाबीनमधून यंदा उत्पादन खर्चही भरुन निघण्याची स्थिती नाही, मग पुढच्या हंमागात शेतीत पेरायचं काय आणि जगायचं कसं असा गंभीर प्रश्न या कोरडवाहू शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित कापूस आणि सोयाबीनला दर मिळावा अशी एकमुखी मागणी शेतकरी करत आहेत. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

भारत जागतिक कापूस बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे

भारत जागतिक कापूस बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना आधीच्या ऑर्डर पूर्ण करण्यास मुदत मिळेल की नाही, असा प्रश्ान् सध्या निर्माण झाला आहे. 

कापूस निर्यातीसाठी पाठविण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर निश्चित करण्यात आली असून तत्संबंधीची शिपिंग डॉक्युमेन्ट्स वस्त्रोद्योग मंत्रालयास सादर करण्यास तीन आठवड्यांचा अवधी मिळणार आहे. म्हणजे ५ जानेवारीपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. 

कारण यावषीर् कापसाचे नेमके किती पीक हाती येणार, याबाबत अद्याप निश्चित काही सांगता येत नाही. परंतु गतवर्षाच्या तुलनेने नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांतील कापसाची आवक नक्कीच कमी असणार, असा ठाम अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कापसाच्या रोज दोन लाख गासड्या बाजारात येणार असा अंदाज असताना केवळ ६० हजार गासड्याच प्रत्यक्षात बाजारात आणल्या जातील, अशी परिस्थिती आहे. 

गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील कापसाचे पीक लांबलेल्या पावसामुळे खराब झाले. शिवाय हवेतील अती आर्दता, पिवळेपणा आणि कीटकांचा प्रार्दुभाव या सर्वांचा फटका पिकाला बसला. ३ कोटी २० लाख ते ३ कोटी ५० लाख गासड्या पीक येईल, असा आधी व्यक्त करण्यात आलेला अंदाज सध्यातरी चुकीचा ठरलेला आहे. ३ कोटी गासड्या पीक हाती येईल, असा अंदाज आहे. 

या पार्श्वभूमीवर कॉटन अॅडव्हायझरी बोर्डाची पुन्हा एकदा बैठक बोलावून कापसाचा पुरवठा आणि मागणी यांचा आढावा घेणे अगत्याचे बनले आहे, त्याद्वारे अतिरिक्त कापसाचा अंदाज घेता येईल. 

या हंगामात अतिरिक्त कापूस असल्याचे आढळल्यास वस्त्रोद्योग मंत्रालयास निर्यातीसाठी पुन्हा मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या केवळ ५५ लाख गासड्या कापूस निर्यातीची परवानगी आहे. त्यानंतर पुन्हा कापूस परदेशात पाठवायचा की नाही, याबाबत इतर संबंधित खात्यांचीही मंजुरी घ्यावी लागणार आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जानेवारी उजाडेल, असे सांगण्यात आले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll