पीक उत्पादनवाढीसाठी कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. नत्रासाठी युरिया, स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेट, पालाशसाठी म्युरेट ऑफ पोटॅश या एकेरी खतांचाच शिफारशीप्रमाणे वापर करावा. सिंगल सुपर फॉस्फेटमधून गंधक व कॅल्शिअम या अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असल्याने, गंधक, कॅल्शिअम या दुय्यम अन्नद्रव्यांसाठी वेगळी खते टाकण्याची गरज नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोहासाठी फेरस सल्फेट, जस्तासाठी झिंक सल्फेट, मॅंगेनिजसाठी मॅंगेनिज सल्फेट, तांब्यासाठी कॉपर सल्फेट आणि बोरॉनसाठी बोरॅक्स या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा माती परीक्षणानुसार जमिनीतून किंवा फवारणीद्वारे वापर करावा; तसेच रासायनिक खतांबरोबरच उपलब्धतेनुसार शेणखत / कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची पिके इ. सेंद्रिय स्रोतांचाही आवर्जून उपयोग करावा.
खत मात्रा ः
सेंद्रिय खते - शेणखत दहा किलो प्रति झाड किंवा गांडूळ खत पाच किलो प्रति झाड जैविक - ऍझोस्पिरीलम - 25 ग्रॅम प्रति झाड व पीएसबी - 25 ग्रॅम प्रति झाड लागवडीच्या वेळी द्यावे. केळीच्या प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा ..............कोली घेऊन खते द्यावीत.
रासायनिक खते ग्रॅम प्रति झाड
खत मात्रा देण्याची वेळ-------------युरिया-----------सिंगल सुपर फॉस्फेट-----म्युरेट ऑफ पोटॅश
लागवडीनंतर 30 दिवसांच्या आत---82--------------250-------------------83
लागवडीनंतर 75 दिवसांनी---------82-------------- -- ------------------- ---
लागवडीनंतर 120 दिवसांनी--------82-------------- --- ------------------- ---
लागवडीनंतर 165 दिवसांनी--------82-------------- -- -------------------- 83
लागवडीनंतर 210 दिवसांनी--------36-------------- -- -------------------- ---
लागवडीनंतर 255 दिवसांनी--------36-------------- ---------------------- 83
लागवडीनंतर 300 दिवसांनी--------36 ------------- --- -------------------83
एकूण --------------------------435--------------250------------------332
टीप ः तक्त्यातील खतमात्रेत माती परीक्षणानुसार योग्य ते बदल करावेत.
केळी पिकासाठी द्यावयाच्या रासायनिक खतांविषयी मार्गदर्शन
5:55 AM |
Labels:
केळी पिकासाठी
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment