Welcome You All

RSS
Showing posts with label Farming. Show all posts
Showing posts with label Farming. Show all posts

केळी


  1. ठिबक सिंचनाखाली अधिक उत्पादनासाठी केळी लागवड नेहमीचा पध्दतीने 1.5 मिटर * 1.5 मिटर अंतरावर करुन प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी 1 तोटी ठेवावी. रासायनिक खताची मात्रा ( 100..40..200) ग्रॅम नत्र - स्फुरद - पालाश प्रत्येक झाडास प्रचलीत खताद्वारे द्यावी. यापैकी एकुण नत्राचा 15 टक्के मात्रा लागवडीपासून 8 आठवडे 40 टक्के 9 ते 16 आठवडे, 35 टक्के 17 ते 24 आठवडे 20 टक्के 25 ते 32 आठवडे अशा 32 हप्त्यात आठवड्याचा अंतराने ठीबक वाटे द्यावी.
  2. केळीवरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागणीपुर्वी केळीचे फनवे एकसंध तासून नंतर मोनोक्रोटोफॉस 36 एस.एल. 05 टक्के तीव्रतेचा द्रावणात 60 मिनीटे बुडवून लागवड करुन 45 दिवसांनी ( बियाणे 10 कि।हे ) किंवा ताग ( बियाणे 10 कि।हे ) हि आंतरपिके घेऊन ते लागवडीनंतर 90 दिवसांनी जमिनीत गाडावीत.
   3.        केळीचे मुनवे ४५० ते ७५० ग्रँम वजनाचे असावेत. मध्यम आकाराचे त्रिकोणाकृती कमीत कमी मुनवे फुटलेले कंद किंवा           मध्यम आकाराचे उभट नसलेले परंतू सरळ कंद ज्याला मध्यम प्रमाणामध्ये मुनवे फुटलेले आहेत असे कंद                      लागवडीसाठी निवडावेत.(म.फु.कृ.वि.राहुरी)
   4.         लागवडीच्या सर्वात चांगला हंगाम म्हणजे मृग बाग (जून लागवड). त्याचप्रमाणे ऑक्टोबर लागवड म्हणजेच कांदे बाग            हा सर्वात चांगला हंगाम आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
 5.          अशी शिफारस आहेकी केळीची बसराई ही जात १.२ मिटर X १.५ मिटर किंवा १ मिटर X १.२ मिटर X मिटर ह्या                अंतरावर ठिबक सिंचनाने लावल्यास जास्तीत जास्त उत्पादन प्रती हेक्टरी मिळून जास्तीत जास्त नफा मिळेल                    (म.फु.कृ.वि.राहुरी)
 6.        निरनिराळ्या लागवड पध्दतीमध्ये उदा. नेहमीच्या पध्दतीत १.५ X १.५ मिटर, चौरस पध्दत (०.९ मिटर X ०.९ मिटर) X       २.१ मिटर आणि आयताकृती पध्दतीत (१.५ मिटर X ०.९ मिटर) X २.१ मिटर ठिबक सिंचनाने नेहमीची व आयताकृती            पध्दत चौरसाकृती पध्दतीतपेक्षा चांगली आढळली, परंतू कमी पाण्याच्या उपलब्धतेत आयताकृती पध्दत चांगली                        आढळली. ठिबक सिंचनाची नळी आणी ड्रीपरची संख्या आयताकृती पध्दतीत नेहमीच्या पध्दतीपेक्षा ५० टक्क्याने कमी        लागली. (म.कृ.वि. परभणी)
7.              मराठवाडा विभागातील कमी पावसाच्या ठिकाणी तसेच भारी जमिनीत केळीची लागवड ठिबक सिंचनाखाली                           यशस्वीरीत्या १.५ मिटर X १.५ मिटर अंतरावर आणि एक उपनळी प्रत्येक ओळीला तसेच एक ड्रीपर एका झाडाला       लावता येतो जर पाणी कमी असेल तर जोडओळ पध्दतीत (०.९ X २.१ X १.५ मिटर) आणि उपनळी प्रत्येक  ओळीस     एक आणि प्रत्येक झाडास एक ड्रीपर लावावा. त्यानंतर दरदिवशी किंवा दिवसाआड पाणी द्यावे. (म.कृ.वि. परभणी)
6.                  निव्वळ नफ्याच्या विचार केल्यास नारळ-सुपारी-केळी किंवा आंबा-काजू मिश्र पिक पध्दतीत दक्षिण कोकणात जास्तीत जास्त नफा मिळतो. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)
8.      प्रती हेक्टरी ९०० किलो नत्र (२०० ग्रँम प्रती झाड) दुस-या चौथ्या आणि सहाव्या महीन्यात एक समान प्रमाणात + ३३५ किलो स्फुरद प्रती हेक्टरी (८० ग्रँम प्रती झाड सारख्या प्रमाणात लागवडीच्या वेळी तसेच त्यानंतर दोन महीन्यांनी + ८९० किलो पालाश प्रती हेक्टर (२०० ग्रँम प्रती झाड लागवडीच्या तसेच त्यानंतर सहा महीन्यांनी समान प्रमाणात विभागून केळीच्या बसराई जातीस I आणि II पर्जन विभागात देण्याची शिफारस केली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
1.                  लागवडीच्या वेळी ५० ते ६० टन शेणखत प्रती हेक्टर केळीच्या चांगल्या वाढीसाठी देणे आवश्यक आहे. १०० ग्रँम नत्र प्रती झाड ३ सारख्या प्रमाणात विभागून म्हणजे लागवडीनंतर ६०, ९०, आणि १२० दिवसांनी तसेच १०० ग्रँम पालाश आणि ४० ग्रँम स्फुरद लागवडीच्या वेळी देणे गरजेचे आहे. स्फुरद व पालाशची पुर्ण मात्रा लागवडीच्या वेळी आणि नत्र तीन सारख्या प्रमाणात ८ ते १० सें.मी. खोलीच्या चर काढून देण्याची शिफारस केली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
2.                  नत्र २०० ग्रँम, स्फुरद ४० ग्रँम, पालाश २०० ग्रँम प्रती झाड द्यावे. स्फुरद पालाशची पुर्ण मात्रा आणि नत्राची २५ टक्के मात्रा लागवडीनंतर एक महीन्याने आणि राहीलेले नत्र दुस-या तिस-या चौथ्या महिन्याने सारख्या प्रमाणात विभागून द्यावे. (पं.कृ.वि.अकोला)
3.                  केळीसाठी बसराई जातीत २०० किलो नत्र ८० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रती हेक्टरी देणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते नत्र लागवडीनंतर २, , आणि ६ महिन्याने विभागून द्यावे. स्फुरद लागवडीनंतर दोन महीन्याने आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर सहा महिन्यांनी समप्रमाणात विभागून द्यावेत. (म.फु.कृ.वि.राहुरी)
4.                  केळीचे जास्तीत उत्पादन मिळवण्यासाठी ग्रँड-९ जातीत २०० ग्रँम नत्र ४० ग्रँम स्फुरद आणि २०० ग्रँम पालाश प्रती झाड देण्याची शिफारस केली आहे. २०० ग्रँम नत्रापैकी २५ टक्के नत्र सेंद्रीय खतातून (१० किलो शेणखत लागवडीच्या वेळी) आणि ७५ टक्के रासायनिक खतातून ४५, ९०, १३५, आणि २१० दिवसांनी समप्रमाणात विभागून द्यावेत. स्फुरद ४० ग्रम प्रती झाड लागवडीच्या वेळी द्यावे आणि २०० ग्रँम पालाश ४ सारख्या प्रमाणात विभागून १६५, २५५, आणि ३०० दिवसांनी द्यावीत. (म.फु.कृ.वि.राहुरी)
5.                  केळीमध्ये ठिबक सिंचनाखाली जास्त उत्पादन मिळण्यासाठी लागवड १.५ मिटर X १.५ मिटर आणि प्रत्येक ओळीस एक उपनळी आणि एक ड्रीपर प्रतीझाड लावावा. प्रती झाड १००:४०:२०० ग्रँम नत्र, स्फुरद पालाश द्यावा. नत्राची मात्रा ठिबक सिंचनामार्फत ३२ आठवड्यानी द्यावी. १५ टक्के नत्र लागवडीनंतर ८ आठवड्यांनी ४० टक्के नत्र ९ ते १६ आठवड्याच्या कालावधीत २० टक्के नत्र १६ ते २४ आठवड्याच्या कालावधीत आणि २५ टक्के नत्र २५ ते ३२ आठवड्याचा कालावधीत देणे आवश्यक आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
6.                  केळीच्या अधीक उत्पादनासाठी बसराई जातीत मैदानी प्रदेशात प्रत्येक झाडास २०० ग्रँम नत्र दुस-या चौथ्या आणि सहाव्या आठवड्यानी लागवडीनंतर, ८० ग्रम स्फुरद लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर दोन महीन्यानी तसेच २०० ग्रँम पालाश दोन सारख्या प्रमाणात लागवडीच्या वेळी तसेच सहा महिन्यांनी द्यावी.
7.                  केळी पिकास ठिबक सिंचनामार्फत पाणी दिल्यास मोकाट सिंचनापेक्षा भरपूर उत्पादन मिळते.( म.कृ.वि.परभणी)
8.                  सिचनाची खोली १.० इ.टी.सी. ठिबक सिंचनामार्फत दिल्यास ०.६ आणि ०.८ इ.टी.सी. पेक्षा चांगले परीणाम मिळतात. एकूण पाण्याची गरज पुर्ण पिक वाढीच्या काळात ठिबक सिंचनामार्फत १९०० मि.मी. असून मोकाट सिंचनात २५४३ मी.मी. आहे. (पर्जन्यमान वगळता) त्यामुळे ठिबक सिचन पध्दतीत २६ टक्के पाण्याची बचत होते. (म.कृ.वि.परभणी)
9.                  ठिबक सिंचन पध्दतीत पाण्याचे वेळापत्रक बाष्पीभवनाच्या प्रमाणात वेगवेगळ्या पिक वाढीच्या अवस्थेनुसार ठरवावे. उन्हाळी हंगामात दररोज किंवा दिवसाआड पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. (म.कृ.वि.परभणी)
10.              गव्हाचे काड आणि केळिचे खुंट आच्छादनासाठी वापरल्यास (१२.५ किलो प्रती झाड) घडाचे वजन वाढते आणि पाण्याची बचत होते. आच्छादनाचा वापर उन्हाळी हंगामाचा सुरूवातीली सूरू करावा (फेब्रुवारी). केओलीन ८ टक्के फवारणी फेब्रुवारीनंतर पाऊस सूरू होईपर्यत १५ दिवसांच्या अंतराने केळीच्या पानांवर करावी. त्यामुळे सुध्दा वरीलप्रमाणेच परीणाम मिळतात (म.फु.कृ.वि.राहुरी)
11.              भारी जमिनीत केळी पिकास ठीबक सिंचनाद्वारे दुस-या आणि चौथ्या दिवशी बाष्पीभवन पात्राचा ६० टक्के पाणी द्यावे. (म.कृ.वि. परभणी)
12.              केळीची बसराई जातीत १.५ मिटर X १.३५ मिटर अंतरावर लागवड केल्यास आणि ठिबक सिंचनामार्फत पाणी दिल्यास दिवसाआड ६० टक्के झिजवल्यास जास्तीत जास्त उत्पादन मिळते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
13.              प्रभावीरीत्या तण नियंत्रणासाठी केळी पिकांत एकात्मिक तण नियंत्रण पध्दत (जमिनीचा चाळणी + खुरपणी + चवळीचे पिक दोनदा घेऊन गाडणे) ही शिफारस करण्यात आली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
14.              जास्त उत्पादनासाठी आणि फायद्यासाठी केळीचे पिक तणमुक्त ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
15.              केळीमध्ये (बसराई) भुईमुगाचे आंतरपिक (फुले प्रगती) खरीप हंगामात घेतल्यास भुईमुगाचे बोनस उत्पादन केळीवर कोणताही विपरीत परीणाम न होता मिळते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
16.              केळीच्या घडातील सातवी किंवा आठवी फण्या नंतरच्या येणा-या फण्या काढल्यास फण्याचे वजन वाढते आणि निर्यात योग्य उत्पादन बसराई जातीत मिळते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
17.              पोटँशियम डायहायड्रोजन फॉस्फेटची फवारणी ०.५ टक्के + युरीया १ टक्का फुलोरा आल्यानंतर १५ दिवसांनी फवारल्यास उत्पादन वाढून काढणी लवकर होते. त्याचप्रमाणे २,४-डी १० पी.पी.एम. फवारल्यास चांगले परीणाम मिळतात. (म.फु.कृ.वि.राहुरी)
18.              कळीचे घड छिद्र असलेल्या पांढ-या पॉलिथीन पिशवीने झाकल्यास (खाली बाजून उघडे असलेल्या) तसेच निंबोळी पेंड १ किलो प्रती झाड दिल्यास उत्पादन वाढून काढणी लवकर होते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
27.              ठिबक सिंचनाखाली अधिक उत्पादनासाठी केळी लागवड नेहमीचा पध्दतीने 1.5 मिटर * 1.5 मिटर अंतरावर करुन प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी 1 तोटी ठेवावी. रासायनिक खताची मात्रा ( 100..40..200) ग्रॅम नत्र - स्फुरद - पालाश प्रत्येक झाडास प्रचलीत खताद्वारे द्यावी. यापैकी एकुण नत्राचा 15 टक्के मात्रा लागवडीपासून 8 आठवडे 40 टक्के 9 ते 16 आठवडे, 35 टक्के 17 ते 24 आठवडे 20 टक्के 25 ते 32 आठवडे अशा 32 हप्त्यात आठवड्याचा अंतराने ठीबक वाटे द्यावी.
28.              केळीवरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागणीपुर्वी केळीचे फनवे एकसंध तासून नंतर मोनोक्रोटोफॉस 36 एस.एल. 05 टक्के तीव्रतेचा द्रावणात 60 मिनीटे बुडवून लागवड करुन 45 दिवसांनी (बियाणे 10 कि।हे) किंवा ताग (बियाणे 10 कि।हे) हि आंतरपिके घेऊन ते लागवडीनंतर 90 दिवसांनी जमिनीत गाडावीत.
29.                केळीच्या कोकण सफेद वेलची या वाणाची मुख्य पीक तसेच नारळ व सुपारी बागेत आंतरपीक म्हणून कोकणात लागवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. . (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ठिबक संच

 लहान शेतकऱ्यांस ठिबक संच बसविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसेल, तर दोन-तीन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकाच विहिरीवर पंपसेट, फिल्टर, प्रेशर गेज, खताची टाकी किंवा व्हेंच्युरी इत्यादी संचामधील भाग सामाईक/ सामुदायिक पद्धतीने खरेदी करून बसवू शकतात. त्यामुळे लहान क्षेत्रावरदेखील संच परवडू शकेल. त्यातून पाण्याची, खताची, मजुरांची, वेळेची, ऊर्जेची आणि पर्यायाने पैशांची बचत होईल.

प्रवाही आणि फवारा सिंचनापेक्षा जास्त कार्यक्षम (९० ते ९८ टक्के कार्यक्षमता) असणारी पद्धत म्हणून या सिंचन पद्धतीचा उल्लेख करावा लागेल. सध्या शेतकऱ्यांनी विहिरींवर बहुतेक तीन ते पाच हॉर्सपॉवर शक्तीचे सेंट्रिफ्युगल पंपसेट बसविलेले आहेत, त्यामधून एक ते दीड कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. दाबाने चार ते सहा लिटर/ सेकंद दराने पाणी उपलब्ध होते; मात्र अशा ठिकाणी फवारा सिंचन (रेनगन) पद्धत वापरावयाची असेल तर अडीच ते पाच कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. दाब निर्माण करणारा पंप त्यासाठी घ्यावा लागेल; परंतु ठिबक सिंचन पद्धत एक ते दीड कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. दाबावरच चालत असल्याने उपलब्ध पंपाचा वापर करता येतो.

ठिबक संच मांडणी -
१) उसाच्या शेताचे क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, चढ-उतार इत्यादी. २) सिंचन पाण्याची उपलब्धता (विहिरीचे ठिकाण, पंपाची माहिती, उपलब्ध हेड, प्रवाह दर आणि उपलब्धता कालावधी). ३) सिंचन पाण्याची प्रत आणि ४) सिंचनाखाली येणाऱ्या शेताचा कंटूर नकाशा.

यानंतर निवडलेल्या लागवड पद्धतीसाठी ठिबक संचाचा आराखडा ठरवावा. त्यानुसार कमीत कमी खर्चाचा, कमी दाबावर व अश्‍वशक्तीवर चालणारा संच बाजारातून निवडावा.

ठिबक संच उभारणी -
संचाची उभारणी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी - १) कंपनीच्या नियमाप्रमाणे सर्व भाग (फिल्टर, पाइप, ठिबक उत्सर्जक) बसविल्याची खात्री करावी. २) संचाचे डिझाईन योग्य झाल्याची खात्री करावी व त्यानुसार मुख्य, उपमुख्य व उपनळीचा व्यास ठरवून प्रत्येक ठिकाणी प्रमाणित पाणी प्रवाह आणि दाब मिळत असल्याची खात्री करून घ्यावी. ३) मुख्य नळीवर उपमुख्य नळी जोडताना व्हॉल्व्ह लावावा, तसेच उपमुख्य नळीवर ग्रोमेट टेक-ऑफ लावून त्यावर उपनळी घट्ट बसवावी. त्यावर ठरविल्याप्रमाणे विशिष्ट अंतरावर ठिबक उत्सर्जक लावावेत. ४) ठिबक संचामधून पाण्याची गळती होत नसल्याची खात्री करून घ्यावी. ५) शेतात फिरणाऱ्या मजूर व जनावरांकडून नुकसान होणार नाही याची खात्री करावी. ६) संचात काडी, कचरा, माती, खडे आत जाणार नाहीत याची खात्री करावी.

ठिबक सिंचन पद्धत वापरताना -
१) गाळण यंत्रणा सक्षम असावी, दोन ते तीन दिवसांनी बॅक फ्लशिंग करावे. २) तोटी पद्धतीत पाण्याचा दाब एक कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. असावा. उपनळीच्या दोन्ही टोकात पाणी दाबात २० टक्‍क्‍यांपेक्षा दाब व्यय ठेवू नये व पाणी प्रवाहात दहा टक्‍क्‍यांपेक्षा फरक असू नये. ३) तोट्या बंद पडू नयेत म्हणून उपनळ्या अधूनमधून फ्लश कराव्यात. ४) तोट्या शक्‍यतो दाब नियमन करणाऱ्या असाव्यात, त्यामुळे सर्वत्र पाणीवाटप समान होते. ५) ऊस पिकासाठी चार लि./ तास प्रवाह असणाऱ्या तोट्या किंवा इनलाईन पद्धती निवडावी. ६) वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत वेगवेगळ्या तोट्यांच्या प्रवाहास जमिनीचे ओलित क्षेत्र किती होते याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण त्यावरून पिकास किती अंतरावर व किती प्रवाहाच्या तोट्या बसवाव्यात याची कल्पना येते. ७) पाण्यातील क्षारांमुळे संच अंशत- बंद झाल्यास त्यास आम्ल प्रक्रिया करावी. जिवाणू किंवा शेवाळांमुळे बंद झाल्यास त्यास क्‍लोरिन प्रक्रिया करावी. ८) नळ्या, पाइप फ्लशिंगच्या वेळेस पाण्याचा दाब दीड कि.ग्रॅ./ चौ. सें.मी.पर्यंत वाढवावा.

ठिबक संच निवड -
जोड ओळ पद्धत - उसाची लागवड जोडओळ अथवा चार ते पाच फूट अंतरावर करून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. जोडओळ पद्धतीत दोन ओळीत एक व ४-५ फूट अंतरावरील लागवडीस एका ओळीस एक उपनळी वापरता येते. इनलाईन व तोट्या असणारी ठिबक सिंचन दोन्ही पद्धतींचा अवलंब करता येतो. दोन तोटीतील अंतर भारी जमिनीसाठी २.५' (एकूण तोट्या एकरी २०००) व मध्यम जमिनीसाठी २' (एकूण तोट्या एकरी २५००) ठेवावे.

ठिबक सिंचन करताना पाण्याची गरज -
पाण्याची उपलब्धता कमी असेल किंवा अति पाण्यामुळे जमिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अत्यंत कार्यक्षम अशा ठिबक सिंचन पद्धतीची निवड केली जाते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना दर दिवशी अथवा दिवसाआड देण्यात येणारे पाणी खालील सूत्राने काढता येते -

यासाठी बाष्पीभवन पात्रातून दररोज होणारे बाष्पीभवन, पीक गुणांक, दोन उपनळ्यांमधील आणि दोन तोट्यांमधील अंतर, अपेक्षित ओलित क्षेत्र इत्यादी माहिती आवश्‍यक आहे.

प्रत्येक तोटीद्वारे द्यावयाचे पाणी (लिटर प्रति दिवसाआड) = दोन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन x ०.७ x पीक गुणांक x दोन तोट्यांमधील अंतर x दोन उपनळ्यांमधील अंतर x ०.६० ÷ ०.९०.

वरील सूत्रामध्ये बाष्पीभवन मि.मी.मध्ये असते, तर ०.७ हा बाष्पीभवन पात्र गुणांक आहे. ०.६ हा अपेक्षित ओलित क्षेत्र गुणांक आहे आणि ०.९० हा समप्रवाह गुणांक आहे.

ऊस लागवड केलेल्या ठिकाणी दररोज किंवा दिवसाआड होणारे बाष्पीभवन माहीत असल्यास वरील सूत्राचा उपयोग करून पाण्याची गरज ठरविता येते.

उदाहरण - समजा सुरू उसासाठी जानेवारी महिन्यात पाण्याची गरज काढताना बाष्पीभवन ६.९ मि.मी. असेल, पीक गुणांक ०.६० असेल, उपनळ्यांमधील अंतर २.७० (जोड ओळ पद्धत) व ठिबक तोट्यांमधील अंतर ०.७५ मीटर असेल, तर दर दिवसाआड लागणारे पाणी खालीलप्रमाणे ठरविता येईल -

दिवसाआड पाण्याची गरज (लिटर/ तोटी) = (६.९x२) x ०.७०x०.६०x०.७५x२.७०x०.६०÷०.९०.

जानेवारी महिन्यातील सुरू उसासाठी दिवसाआड पाण्याची गरज = ७.८२ लिटर/ तोटी म्हणजेच आठ लिटर/ तोटी एक एकर ३' - ६' जोड ओळीच्या क्षेत्रास ८x२००० = १६,००० लिटर पाणी लागेल.

ठिबक पद्धतीने (चार लिटर/ तास ड्रीपर), उन्हाळ्यात दररोज तीन ते साडेतीन तास, हिवाळ्यात दोन ते तीन तास व पावसाळ्यात दोन ते अडीच तास पाणी द्यावे. पाण्याची बचत होऊन २५ ते ३० टक्के उत्पादन वाढते.

संचामधून विद्राव्य खतांचा, तसेच नेहमीच्या खतांपैकी युरिया व पांढऱ्या रंगाचे म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करता येतो. ज्याद्वारे खतांची २५ - ३० टक्के बचत होते. ठिबक उपनळ्या काढून उसाची तोडणी करून घ्यावी आणि त्यानंतर खोडव्याचे व्यवस्थापन योग्य करून पुन्हा उपनळ्या पसरवून खोडव्यात पाण्याचे व खतांचे योग्य तऱ्हेने नियोजन करून उसाचे उत्पादन वाढविणे शक्‍य होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ठिबक सिंचन ठरतंय मिरची पिकांसाठी लाभदायक






नंदुरबार हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिरची पिकासाठी मुबलक पाण्याची गरज असते. तथापि पाणीटंचाईमुळे हे पिक ठिबक सिंचन पध्दतीने घेणे शक्य आहे असा एक अभिनव प्रयोग नंदुरबार तालुक्यातील बामळोद येथील कैलास दशरथ पाटील या तरुण शेतकर्‍याने यशस्वी केला आहे. ठिबक सिंचन पध्दतीतून गेल्या वर्षी त्यांनी तीन एकर शेतीतून एक हजार पाच क्विंटल मिरचीचे भरघोस उत्पादन काढले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच अपुर्‍या पाण्याचा काटकसरीने वापर करुन शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन पध्दत उपयोगी ठरते. आजपर्यंत विविध फळ पिकांसाठी ही पध्दत शेतकर्‍यांनी उपयोगात आणल्याचे लक्षात येते. परंतु मिरची पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सुध्दा ठिबक सिंचन यशस्वी होते हे कैलाश पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच सिध्द करुन दाखविले आहे.

ठिबक सिंचन योजनेसाठी कृषि विभागाच्या केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनेतून त्यांना ५० टक्के अनुदान उपलब्ध झाले आहे. ठिबक सिंचन करण्यासाठी कैलास पाटील यांना एकरी २४ हजार रुपये खर्च आला. यावर्षी त्यांनी चार एकर शेतीतून मिरचीसाठी ठिबक योजना उपयोगात आणली आहे. त्यामध्ये रोशनी आणि व्ही.एन.आर. २७० या सुधारित जातीच्या मिरचीचे वाण लावले आहे. ठिबक सिंचनातून मिरची उत्पादनाचा प्रयोग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरला आहे. दररोज अनेक शेतकरी अभ्यासासाठी या ठिकाणी भेट देत आहेत. राज्याचे फलोत्पादन, वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री डाँ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ठिबक सिंचनातून शेती या प्रयोगास भेट देऊन श्री. कैलास यांचे अभिनंदन केले आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कैलास पाटील यांनी नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा शेतीकडेच लक्ष देऊन कष्ट करण्याचा निर्णय घेतला. मिरचीसाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कैलास यांनी दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे इतर १२ शेतकर्‍यांसह अभ्यास दौरा केला.

बामळोद परिसरातील विहिरींना पाहिजे त्या प्रमाणात पाणी लागत नाही. मिरची सारख्या पिकासाठी हे पाणी पुरेसे नाही. कैलास यांनी शेतीत स्वत:ची विहिर खोदली आहे पण त्यात अपूरे पाणी लागले. गावात त्यांची स्वत:ची बोअरवेल आहे. कृषि विभागाचे मार्गदर्शन घेतल्यानंतर ठिबक सिंचन पध्दत मिरचीसाठी तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतजमीन ट्रक्टरने नांगरुन भुसभुशीत केली. मिरची लागवडीसाठी गादिवाफे तयार करुन त्यात ठिबक सिंचनाचे पाईप आणि नळ्या टाकल्या. भरपूर शेणखत टाकले. तालुक्यातील चौपाळे येथील नर्सरीमधून रोशनी आणि व्हि.एन.आर. २७० या सुधारित जातीच्या मिरची रोपांची तीन एकरामध्ये लागवड केली. गावातील बोअरचे पाणी एका पाईपद्वारे आणून ते विहिरीत सोडले. तेथून ते पाणी ठिबकसाठी वापरले.

ठिबक सिंचन मार्फत पाणी देत असल्याने जमिनीत सतत ओलावा राहिला. मिरची रोपांना अनेक फुटवे फुटले. त्यामुळे झाडाचा पसारा वाढला. बघता बघता मोठ्या प्रमाणात मिरचीची लागण झाली. ठिबक सिंचन पध्दतीतून नुसते पाणीच दिले जात नाही तर रासायनिक खते सुध्दा या पध्दतीतून देण्यात येतात. यातून धो-धो वाहणार्‍या पाण्याची बचत झाली आणि अपेक्षेप्रमाणे मिरचीची लागणही वाढली आहे.

आतापर्यंत ६ ते ७ मिरचीच्या तोडण्या झाल्या आहेत. त्यातून एकरी १५० ते २०० क्विंटल मिरची निघाली असून प्रति क्विंटल रुपये १२०० ते १३०० भावाप्रमाणे खर्च वजा जाता रुपये दोन लाखाचे उत्पन्न झाले आहे. काही महिन्यातच मिरचीची खुळणी होणार आहे. मिरची तोडण्यासाठी गावातूनच मजुर मिळतात. वर्षभर रोजगार मिळत असल्याने गावातून मजुरीसाठी त्यांचे स्थलांतर होत नाही. मजुरांना वेळेवर मजुरी दिली जाते. मजुरांना मिरचीसुध्दा दिली जाते.

ठिबक सिंचनातून मिरचीचे भरपूर उत्पादन मिळत असल्याने कैलासचे कुटूंब सुखी झाले आहे. दोन भाऊ व वडील असा त्यांचा परिवार आहे. पूर्वी कपाशी, मक्का या सारखी पिके घेत असत. परंतु त्यांचे मोजके उत्पादन निघत असे. मात्र इतर पिकांप्रमाणेच ठिबक सिंचनातून मिरचीचे भरघोस उत्पादन होत असल्याने नंदुरबारमध्ये आता एक वेगळा प्रघात पडला आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ठिबक सिंचन

ठिबक संचातील ड्रीपर्स, लॅटरल, उपमुख्य नळी व फिल्टर यांची नियमित पाहणी करावी. सिंचनासाठी वापरात असलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. गरजेनुसार व नियमित पाहणी करून उपाययोजना करावी.

संच सुरू असताना घ्यावयाची काळजी :
1) ठिबक सिंचन संच सुरू असतानाही संचाची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये पाण्यातील अशुद्धता काढण्यासाठीचे भौतिक व रासायनिक उपाय यांचा समावेश होतो.
2) ठिबक संचातील ड्रीपर्स, लॅटरल, उपमुख्य नळी व फिल्टर यांची नियमित पाहणी करावी.
3) प्रत्येक झाडास व्यवस्थित पाणी मिळेल, याची खात्री करून घ्यावी.
4) वेळोवेळी होणारी गळती थांबवावी.
5) पाण्यातील अशुद्धतेनुसार फिल्टर, लॅटरल, ड्रीपर्स व उपमुख्य नळी स्वच्छ करावी.
6) संच नेहमीच 1.0 कि. ग्रॅ. / वर्ग सें.मी. किंवा विहित दाबावर चालेल, अशी खात्री करून घ्यावी.
7) आंतरमशागत किंवा बागेतील इतर कामे केल्यानंतर संचातील लॅटरल पूर्ववत करून घ्याव्यात.
8) लॅटरलच्या शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या ड्रीपर्समधून योग्य पाण्याचा प्रवाह पडतो आहे, याची खात्री करून घ्यावी.
9) बागेतील संचास बसविलेल्या तोट्यांतील दर तासी प्रवाह किती आहे, याची माहिती असावी. पाण्याच्या दररोजच्या गरजेनुसार ठिबक संच किती वेळा चालवावा लागेल हे काढावे, त्यानुसारच संच चालवावा.
10) सिंचनासाठी वापरात असलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. गरजेनुसार व नियमित पाहणी करून वरील भौतिक उपाय करावेत.
11) पाण्याच्या गुणवत्तेनुसार व पाहणीनंतर योग्य वेळी आम्ल किंवा क्‍लोरिन प्रक्रिया करावी.

संच बंद करताना घ्यावयाची काळजी :
1) उपमुख्य नळीवरील प्लश व्हॉल्व व लॅटरलची शेवटची टोके उघडून पाणी प्रवाहित करावे, यामुळे संचातील गाळ, कचरा, माती, विरघळलेले क्षार निघून जातात.
2) जाळीचे व वाळूचे गाळण यंत्र स्वच्छ करावे. जाळी, वाळूचा थर, गास्फेट व रिंग तपासून घ्यावे.
3) खताची टाकी व व्हेंच्युरी स्वच्छ पाणी प्रवाहित करून स्वच्छ करावी.
4) संचातील लॅटरलचा गोल गुंडाळा करावा. झाडांच्या ओळीप्रमाणे लॅटरलवर खुणा करून सारख्या लांबीच्या लॅटरल एका ठिकाणी ठेवाव्या. लॅटरल गुंडाळताना त्यांना पीळ बसवून बारीक छिद्रे किंवा भेगा पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
5) संचातील नादुरुस्त सुटे भाग / घटक दुरुस्त करून घ्यावेत.
6) संच बंद करण्यापूर्वी आम्ल / क्‍लोरिन प्रक्रिया यापूर्वी सांगितल्याप्रमाणे करून घ्यावी.
7) मोटार व पंप यांची गरज नसल्यास विद्युत प्रवाह खंडित करून विद्युत मोटार झाकून ठेवावी व पंप व फूट स्वच्छ करून ठेवावे.
8) जमा केलेल्या लॅटरल शेतामध्येच सबमेनच्या रेषेत उभे खांब रोवून अडकवून ठेवाव्यात किंवा उंदीर व घुशींपासून संरक्षण होईल अशा ठिकाणी ठेवाव्यात.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

तूर

म ध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही, तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या ग्रंथीची वाढ योग्य होत नसल्याने रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट होते. तुरीची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी करून वरवरच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. पिकाच्या चांगल्या उगवणीसाठी आणि अनुकूल वाढीसाठी चांगली पूर्वमशागत आवश्‍यक असते.

पेरणी आणि बियाण्यांचे प्रमाण ः
मॉन्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्‍यक असते. त्यासाठी प्रति हेक्‍टर बियाण्याचे पुरेसे प्रमाण ठेवावे.

बीजप्रक्रिया आणि जिवाणूसंवर्धन :
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डेझीम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

खतांची मात्रा ः
सुधारित वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाच्या सुरवातीच्या काळात नत्राची गरज भागविण्यासाठी तूर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजे 125 किलो डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरला द्यावे. प्रति हेक्‍टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.

आंतरमशागत :
पीक सुरवातीपासूनच तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे. कोळप्याच्या साहाय्याने पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्यायोगे पीकवाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी. तूर पीक पहिले 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजुरांअभावी खुरपणी करणे शक्‍य नसल्यास पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा, त्यासाठी प्रति हेक्‍टरला पेंडीमेथिलीन हे तणनाशक तीन लिटर प्रति 500 ते 700 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारून वखर पाळी घालावी म्हणजे ते जमिनीत चांगले मिसळले जाऊन तणनियंत्रण अधिक प्रभावी होते.

पाणी व्यवस्थापन :
तूर हे कडधान्य पीक बहुतांश पावसाच्या पाण्यावर येते, परंतु पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम, उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहात नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणावर फूलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा फार कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे. अवर्षणप्रवण भागात लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पावसाची शक्‍यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. पाऊस नसेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या अगोदरच प्रमाणात पाणी द्यावे.
ः 02426 - 233447
(लेखक कडधान्य सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत.)

आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धती
पारंपरिक शेतीमध्ये कोरडवाहू क्षेत्रात तूर हे मिश्र किंवा आंतरपीक म्हणून घेतले जाते. कपाशीच्या सहा किंवा आठ ओळींनंतर एक ओळ तुरीची अशी पद्धत विदर्भामध्ये प्रचलित आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भामध्ये खरीप ज्वारीचे पीक घेण्याची पद्धत आहे. अशा क्षेत्रामध्ये 45 सें.मी. अंतरावर ज्वारीच्या दोन ओळी आणि त्यानंतर 30 सें.मी. अंतरावर तुरीची एक ओळ अशी पद्धत प्रचलित आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बाजरीमध्ये तुरीचे आंतरपीक घेण्याची पद्धत आहे, यासाठी 45 सें.मी. अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पद्धतीने पेरणी केल्यास बाजरीचे पीक सप्टेंबरपर्यंत निघून जाते आणि पुढे पडणाऱ्या हस्ताच्या पावसावर तुरीचे चांगले पीक हाती येते. अलीकडे भुईमूग, सूर्यफूल व सोयाबीन या पिकांमध्ये सुद्धा तुरीचे आंतरपीक घेणे शक्‍य आहे .
भुईमूग किंवा सोयाबीनच्या तीन ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी आणि दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. यासाठी तुरीचे विपुला, बीएसएमआर- 853, एकेटी- 8811 हे वाण उपयुक्त आहेत. मूग, उडीद किंवा चवळी यांसारख्या अतिशय लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरवात होण्यापूर्वी मूग/ उडीद/ चवळीचे पीक हाती येते आणि त्यापासून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पन्न मिळते, मुख्य पीक तुरीपासून 12 ते 15 क्विंटल/ हेक्‍टर उत्पन्न मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

फळझाड

फळझाडांच्या लागवडीपूर्वी शेताचा नकाशा एका कागदावर तयार करावा. शिफारशीत अंतरानुसारच फळझाडांतील लागवडीचे अंतर ठेवून खड्ड्यांचा खोदाईचा आराखडा तयार करावा. जेणे करून योग्य आकाराचे खड्डे वेळेवर खोदता येईल. पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्यातील मातीचा प्रकार, खड्ड्यांचे आकारमान आणि शेणखत व इतर खते, वेळोवेळी केलेली निगा, यावर पीक उत्पादन अवलंबून असते. खड्डा खोदताना घेतलेली काळजी भविष्यातील उत्कृष्ट यशस्वी फळबागा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. जमीन चढ- उताराची असल्यास कंटूर अथवा उताराच्या समपातळी रेषेवर फळझाड लागवडीची आखणी करावी.
जमीन कोणत्या फळपिकाकरिता योग्य आहे, याचा निर्णय माती परीक्षणानुसार घ्यावा. लिंबू वर्गीय फळ पिकांसाठी अल्कधर्मीय चुनखडीयुक्त जमिनी योग्य नसतात. त्यामुळे अशा जमिनीमध्ये आवळा, चिंच या फळपपिकांची लागवड करणे योग्य ठरते. चुनखडी जास्त असलेल्या जमिनीत आंबा व लिंबू वर्गीय पिकांची लागवड करू नये.
खड्डे भरताना छोटे दगड, धोंडे काढून टाकावेत. खड्ड्यामध्ये कुजलेले शेणखत 50 टक्के आणि माती 50 टक्के हे मिश्रण अतिशय योग्य असते. खड्डा भरताना तळाशी शिफारशीत कीटकनाशकाची भुकटी टाकावी, तसेच प्रति खड्डा दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट खतमाती मिश्रणात मिसळून घ्यावे. त्यानंतर कलमे किंवा रोपांची लागवड करावी. जमिनीत ओघळी असल्यास किंवा जमीन उताराची असल्यास अशा ठिकाणी पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी बांध किंवा सलग समपातळी चर खोदावेत. जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेतचर काढावेत.
फळझाड लागवडीच्या सुरवातीच्या काळात भाजीपाला, भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या कमी उंचीच्या व द्विदल धान्य प्रकारातील आंतरपिकाची लागवड करून जादा उत्पन्न घेण्याचे नियोजन करावे. आंतरपिकांना वेगळी खताची मात्रा द्यावी. जेणेकरून मुख्य फळपिकावर आंतरपिकांचा परिणाम होणार नाही.

लागवडीसाठी रोपांची,कलमांची निवड
शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठातूनच खात्रीलायक रोपे , कलमे खरेदी करावीत. फळझाडे जातिवंत, चांगल्या व विषाणूविरहित मातृवृक्षांपासून तयार केलेली असावीत. निवडलेली रोपे जास्त लहान नसावीत, तसेच जास्त जून नसावीत. रोपे,कलमे एक वर्ष वयाची, मध्यम वाढीची आणि 60 ते 75 सें.मी. उंच असावीत. कलम केलेल्या रोपांमध्ये खुंट व कलम काडीची जाडी सारखी असावी. फळझाडांचे कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून 20 सें.मी.च्या वर नसावेत. कलमांना व छाट्यांना भरपूर मुळ्या असाव्यात. कलमांच्या फांद्या, पानांची वाढ समतोल व निरोगी असावी. योग्य त्या अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेल्या रोपवाटिकेतून किंवा शासकीय रोपवाटिकेतूनच रोपे, कलमे खरेदी केलेली असावीत. लागवडीसाठी आवश्‍यक असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा 15 टक्के जास्त रोपे खरेदी करावीत. पावसाळी हंगामात दोन ते तीन पाऊस पडल्यानंतरच रोपांची लागवड करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

तणांचा प्रादुर्भाव

तूर हे जास्त कालावधीचे पीक आहे, तसेच सुरवातीला पिकाची वाढ हळू होत असते, त्यामुळे सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. तूर पिकासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणजे अशा कालावधीत जास्त तणनियं त्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. हा कालावधी सुरवातीचे 20 ते 60 दिवस असतो. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 50 ते 55 टक्के घट येऊ शकते.
तुरीतील तणनियंत्रणाकरिता पेरणी नंतर तीन, सहा व नऊ आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी. सध्या मजुरांची अनुपलब्धता व वाढते मजुरी दर यामुळे पूर्णतः कोळपणी व खुरपणीद्वारे तणनियंत्रण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे मशागतीय उपचारांच्या जोडीला तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण केल्यास ते अधिक प्रभावी व आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरेल.
तूर पिकातील तणनियंत्रण : पेरणी नंतर, परंतु उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) तणनाशक 2.5 ते 3.3 लिटर (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक) प्रति हेक्‍टरी किंवा पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी मेटोलॅक्‍लोर (50 ई.सी.) दोन किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या पीक उगवणीपूर्वी तणनाशकाच्या जोडीला पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी जेणेकरून एकात्मिकरीत्या तणनियंत्रण साधले जाईल.
सोयाबीनमधील तणनियंत्रण
पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 45 दिवस एवढा असतो. या कालावधीत पीक तणमुक्त ठेवणे आवश्‍यक असते. अनियंत्रित तणां च्या वाढीमुळे पीक उत्पादनात 40-53 टक्के एवढी घट येऊ शकते. सोयाबीन मधील तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर, परंतु पीक उगवणीपूर्वी ऍलॅक्‍लोर (50 ई.सी.) चार लि. प्रति हेक्‍टरी (दोन किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी (40 मि.लि. प्रती 10 लिटर पाणी) त्याबरोबर पीक पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.
किंवा
पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लि. प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (0.75 ते एक किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी. सोयाबीनमधील रुंद पानांच्या तणाच्या नियं त्रणाकरिता पीक पेरणीनंतर 15-20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये इमॅझीथॅपायर (10 ई.सी.) 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्‍टरी (75 ते 100 मि.लि. क्रियाशील घटक प्र ति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुईमुगातील तणनियंत्रण
भुईमुगासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरचे 15-45 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 4045 टक्के एवढी घट येते. भुईमुगातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (0.75 ते 1.00 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी. भुईमुगा मधील रुंद पानांच्या तणाच्या नियंत्रणाकरिता पीक पेरणीनंतर 15-20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये इमॅझीथॅपायर (10 ई.सी.) 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

सूर्यफुलातील तणनियंत्रण
या पिकासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पीक पेरणीनंतर 15-45 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणामुळे उत्पादनात 30-33 टक्के एवढी घट येऊ शकते. सूर्यफुलातील तणनियंत्रणाकरिता पीक उगवणीपूर्वी ऑक्‍सिफ्लोरफेन (23.5 ई.सी.) 425 मि.लि. प्रति हेक्‍टरी (दहा मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (4.25 मि.लि. प्रति दहा लिटर पाणी) व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.
किंवा
पीक उगवणीपूर्वी पॅन्डीमिथॅलीन (30 ई.सी. )2.5 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (0.75 लिटर क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व पेरणीनंतर सहा आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

तीळ पिकातील तणनियंत्रण
तिळातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी ऍलॅक्‍लोर (50 ई.सी.) चार लिटर प्रति हेक्‍टरी (दोन लिटर क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.

उडदामधील तणनियंत्रण
या पिकाचा पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 30 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 25-30 टक्के घट येऊ शकते. पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी ऑक्‍सिप्लोरफेन (23.5 ई.सी.) 425 मि. लि. प्रति हेक्‍टरी 450 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच पाच आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

मुगातील तणनियंत्रण
मुगासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 30 दिवस एवढा असून, अनियंत्रित तणाच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 25-30 टक्के घट येऊ शकते. मुगातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सूर्यफूल लागवड

सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 बैलगाड्या (10 ते 12 टन) चांगले कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळावे. पेरणी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये करावी. मध्यम ते खोल जमिनीमध्ये 45 ु 30 सें.मी., भारी जमिनीत 60 ु 30 सें.मी. आणि संकरित वाणांची 60 ु 30 सें.मी. अंतराने पेरणी करावी.
पेरणी पद्धत : कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे पाच सें.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी-वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी. पेरणीसाठी सुधारित वाणाचे पाच ते दहा किलो, तर संकरित वाणाचे पाच ते सहा किलो बियाणे प्रति हेक्‍टरी वापरावे.
बीजप्रक्रिया : मर रोगाच्या प्रतिबंधासाठी दोन ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग नियंत्रणासाठी / टाळण्यासाठी सहा ग्रॅम ऍप्रॉन (35 एस.डी.) प्रति किलो बियाण्यास चोळावे, तसेच विषाणूजन्य (नेक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्‍लोप्रिड (70 डब्लू.पी.) पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर हे जिवाणू खत 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
आंतरपीक : आंतरपीक पद्धतीत सूर्यफूल + तूर (2:1 किंवा 2:2) आणि भुईमूग + सूर्यफूल (6:2 किंवा 3:1) या प्रमाणात ओळीने पेरावे.
रासायनिक खते : कोरडवाहू पिकास प्रति हेक्‍टरी 2.5 टन शेणखत, 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्‍टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे. यापैकी 30 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेली 30 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्‍टरी 20 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.
सुधारित वाण ः एस.एस. 56, मॉर्डन, ई.सी. 68414, भानू
संकरित वाण ः के.बी.एस.एच.-1, एल.डी.एम.आर.एस.एच-1, एल.डी.एम.आर.एस.एच-3, एम.एस.एफ.एच.-17, के.बी.एस.एच.-44, फुले रविराज

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

नारळ लागवड

ना रळ लागवड करताना दोन माडांत योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल, तसेच ठेंगू जातीसाठीदेखील 20 फूट अंतर चालू शकते. जमिनीच्या प्रकारानुसार पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर 1 ु 1 ु 1 मीटर खड्डे खोदणे आवश्‍यक असते. नारळाच्या बाणवली, प्रताप; तर संकरित जातींमध्ये टी ु डी आणि डी ु टी या जाती चांगल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध होतात.

रोपवाटिकेत लवकर रुजलेली नऊ ते बारा महिने वयाची रोपे निवडावी. त्यांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्षे वयाच्या रोपांना चार ते सहा पाने असावीत. रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.

खत व्यवस्थापन ः नारळाच्या जातीप्रमाणे साधारणतः पाचव्या ते सातव्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. फलधारणा झाल्यापासून सात ते 12 महिन्यांत नारळ काढण्यास तयार होतो. चांगली फळधारणा होण्यासाठी खते वेळेवर देणे खूप महत्त्वाचे असते. माडाला पाण्याबरोबर पुरेशा प्रमाणात खते दिल्यास माड लवकर फुलोऱ्यात येऊन नियमित उत्पन्न मिळते. माडाच्या झाडाला पाचव्या वर्षापासून पाच घमेली शेणखत, 2.250 किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट व दोन किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. लहान माडांना त्यांच्या वयानुसार खतांचे प्रमाण कमी करावे. पहिल्या वर्षी बुंध्यापासून 30 सें.मी. अंतरावर सभोवार खते पसरून द्यावीत व विळ्याने अथवा कुदळीने मातीत पसरावीत. नंतर प्रत्येक वर्षी 30 सें.मी. अंतर वाढवून पाच ते सहा वर्षांनी खते माडाभोवती 1.5 ते 1.80 मी. अंतरावर टाकून मातीत मिसळावीत. शेणखत व स्फुरद इतर खतांबरोबर जून महिन्यात एकाच हप्त्यात द्यावे. नत्र व पालाश ही खते जून, सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात असे तीन समान हप्त्यांत द्यावीत. खते दिल्यानंतर लगेच माडांना पाणी द्यावे. नारळापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात नारळाच्या झावळ्या व बागेतील इतर वनस्पतींपासून तयार केलेले 50 किलो गांडूळ खत आळे पद्धतीने द्यावे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मत्स्यसंवर्धन

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान-मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जमिनीची निवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते.
जर सपाट जमिनीवर मत्स्यतळे बांधले, तर तळाच्या बुडामध्ये उतार देणे महत्त्वाचे असते. या उतारामध्ये पाणी बाहेर काढता येते. तळ्याचा विस्तार 0.1 हेक्‍टर ते एक हेक्‍टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते. सुरवातीला 0.1 हेक्‍टर जलक्षेत्र तयार करून मत्स्यपालन सुरू करावे.
संवर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील परिवर्तनास तोंड देऊन प्रमाणित वनस्पतिजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी माशांच्या जातींची निवड फायदेशीर ठरते. तसेच पाण्यातील विविध थरांत उपलब्ध नैसर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कार्प जातीच्या माशाची एकत्रित किंवा मिश्रशेती करता येते. भारतीय प्रमुख कार्प जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामधील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कार्प वाढविल्यास या अन्नावर उपजीविका करून भारतीय प्रमुख कार्पबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्‍य होते. या माशांना चांगली मागणी आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

बटाट्याची लागवड

ख रीप हंगामात बटाट्याची लागवड जून - जुलै महिन्यात करतात. लागवडीसाठी 45 ु 30 सें.मी. सरी-वरंबे तयार करावे. कुफ्री लवकर, कुफ्री सिंदुरी, कुफ्री चं द्रमुखी, कुफ्री ज्योती या जाती चांगल्या आहेत. हेक्‍टरी 800 ते 1500 किलो बियाणे वापरावे. लागवडीसाठी बटाट्याच्या फोडी करते वेळी कोयता ब्लायटॉ क्‍सच्या (0.3 टक्के) द्रावणात बुडवून घ्यावा.
लागवडीपूर्वी बियाणे कॅप्टन 30 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून लागवड करावी. लागवडीपूर्वी ज मिनीत चांगले शेणखत मिसळून माती परीक्षणानुसार 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 120 किलो पालाश रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पैकी लागवडी वेळी 50 किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्याने उर्वरित नत्राची 50 किलो प्रति हेक्‍टर मात्रा देऊन पिकाला मातीची भर द्यावी. मगदुरानुसार व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. बटाटा पीक 90 ते 110 दिवस झाल्यानंतर काढणीस येते. हेक्‍टरी सरासरी 20 ते 30 टन उत्पादन मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll