युगांडा देशातील डेनिस ओचिनो येथील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक जोमो केनयट्टा यांनी केळी पिकात वाढणाऱ्या एका बुरशीवर संशोधन केले आहे. अर्थात, ही बुरशी त्या पिकाला हानिकारक नाही, उलट केळी पिकांची प्रतिकारक्षमता वाढत असून, केळीतील सूत्रकृमींच्या प्रादुर्भावास अटकाव करणे शक्य होत असल्याचे आढळले आहे.
इंडोफाईट बुरशी सर्व वनस्पतींमध्ये आढळतातच, त्यांचा त्या पिकाला संसर्गही होतो; मात्र तशी ठळक लक्षणे पिकावर दिसून येत नाहीत. युगांडा व केनियामध्ये याच बुरशींवर अधिक अभ्यास झाला आहे. तेथील कीड व्यवस्थापन पद्धतींवर आर्थिक व पर्यावरणीय परिणाम झाले आहेत. रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर परिणाम दिसले आहेत. अनेक वेळा ही कीडनाशके महाग असल्याने आफ्रिकेतील शेतकऱ्यांना ती परवडतही नाहीत. रासायनिक उपायांचा वापर कमी करताना एखादे पीक एखाद्या किडी वा रोगासाठी प्रतिकारक करणे हा पर्याय आहे; मात्र ही तशी सोपी गोष्ट नाही. मात्र, इंडोफाईट बुरशीचा आधार घेऊन पिकात एखाद्या किडीविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित करण्याचा पर्याय शास्त्रज्ञांनी हाताळला आहे. या बुरशीमुळे सूत्रकृमींसारख्या किडींविरुद्ध झाडात प्रतिकारक्षमता विकसित करणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या दिशेने केळी पिकात हे प्रयोग झाले आहेत.
मात्र, हे संशोधन नेदरलॅंड येथील वॅगनिनजन विद्यापीठातील डॉ. थॉमस डुबॉइस व अरनॉल्ड व्हॅन हुस यांनी केलेल्या संशोधनाला छेद देणारे असल्याने यावर आणखी अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या संशोधनामुळे महागड्या कीडनाशकांवरील खर्च बऱ्याच अंशी कमी होणार आहे. युगांडात उतिसंवर्धित केळींवरही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. तेथील शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होत असल्याचे आढळले आहे.
कृषी व तंत्रज्ञान
शेतकऱ्यांच्या 'मसिहा'चा गौरव
बिहारमधील चंपारण या जिल्ह्यात दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका भात शेतीला बसतो, त्यामुळे भात शेतीचे नुकसान हे ठरलेले; परंतु या भागातील शेतकऱ्यांना भात लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे शेतकरी पुराच्या पाण्यात तग धरून राहील अशा जातीच्या शोधात होते. गेल्यावर्षी पुसा येथील (बिहार) राजेंद्र कृषी विद्यापीठाने चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "स्वर्ण-सब-1' ही जात लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. चंपारण जिल्ह्यात दरवर्षी किमान आठ ते 12 दिवस पुराचे पाणी शेतामध्ये थांबून राहते, त्यामुळे भात रोपे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; परंतु गेल्यावर्षापासून शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीची लागवड पूरग्रस्त भागात सुरू केली. ही जात पुराच्या पाण्यात तग धरून राहिली, तसेच पूर ओसरल्यानंतर रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांना या जातीपासून प्रति हेक्टरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. या जातीच्या तांदळाचा दर्जा चांगला आहे, त्याचबरोबरीने भातही लवकर शिजतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे "स्वर्ण-सब-1' ही जात शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या जातीच्या संशोधकाला भेटण्याची शेतकऱ्यांची इच्छा हाती, ती यंदाच्या एप्रिल महिन्यात पूर्णही झाली.
एप्रिल महिन्यात डॉ. मॅकील हे भारतातील संशोधन केंद्रांच्या दौऱ्यावर होते. हे शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जे. पी. सिंग यांच्या माध्यमातून भेटीचे आमंत्रणही दिले. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत डॉ. मॅकील 8 एप्रिल रोजी समौता गावात दाखलही झाले.
या वेळी चंपारण जिल्ह्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत खास समारंभात डॉ. मॅकील यांचा "शेतकऱ्यांचा मसिहा' म्हणून गौरव केला. या वेळी शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीच्या लागवडीचे अनुभव, तसेच भात शेतीमधील अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाताच्या जातींच्या निर्मितीमध्ये तशा पद्धतीने संशोधन सुरू असल्याची ग्वाही डॉ. मॅकील यांनी दिली.
पुरात तग धरणारी "स्वर्ण-सब-1'
आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार डॉ. मॅकील यांनी पुराच्या पाण्यातही तग धरून राहणाऱ्या "स्वर्ण-सब-1' या जातीची निर्मिती केली. ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी आठ ते 10 दिवस साचून राहते, त्या भागात या जातीची लागवड फायदेशीर दिसून आली आहे. जगभरातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीमुळे शाश्वत उत्पादनाची खात्री मिळणार आहे.
हवामानबदल वेलदोडा
हवामानबदल व तापमानवाढीमुळे जगभरात विविध समस्या निर्माण होताना दिसत असल्या तरी वेलदोडा पिकासाठी मात्र हा बदल फायदेशीर ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल नुकताच "हवामान बदल' विषयक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, वेलदोडा लागवड केलेल्या भागातील तापमानवाढीमुळे पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि सेंटर प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट, कयमकुलम (केरळ) येथील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे गेल्या 17 वर्षांपासून यावर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यातील निष्कर्षानुसार हवामानबदल व तापमानवाढीचा वेलदोडा, कॉफी, चहा आणि काळी मिरी या पिकांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळले. रात्रीच्या किमान तापमानात झालेली वाढ आणि दिवसाचे कमाल तापमान वाढल्यामुळे वातावरणात एकप्रकारे ऊब निर्माण होऊन त्याचा फायदा वेलदोड्याच्या उत्पादनवाढीसाठी तसेच काहीसा कॉफीच्या उत्पादनासाठीही होत आहे. याबाबत केरळ येथील वेलदोडा संशोधन केंद्राचे सहायक प्राध्यापक मुथुसामी मुरुगन यांनी सांगितले, की वेलदोड्याच्या उत्पादनात वाढ होण्यास गेल्या शतकापासून सुरवात झाली. 1990 मध्ये प्रति हेक्टरी उत्पादन 84 किलो मिळत होते. 1994 मध्ये त्यात वाढ होऊन प्रति हेक्टरी 136 किलो उत्पादन मिळू लागले. 2007 मध्ये हे उत्पादन प्रति हेक्टरी 300 किलो मिळाले. एनजालानी, पीव्ही-1 या जाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर ठरल्या. चहा आणि काळी मिरीच्या उत्पादनवाढीसाठी अनेक वर्षे काम करूनही त्यावर उपाय मिळत नव्हता, मात्र हवामानबदल व तापमानवाढीमुळे ते शक्य झाले आहे.
पर्लस्पॉट माशाचे बीजोत्पादन
कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. बी. प्रदीप म्हणाले, की कोळंबी बीजोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लागते; परंतु श्री. मनोज यांच्याकडे असलेले शेततळे लक्षात घेऊन आम्ही कोळंबी बीजोत्पादनासाठी लहान टाक्या तयार केल्या. आमच्या सल्ल्यानुसार श्री. मनोज यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोळंबी बीजोत्पादनास सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी कोळंबीच्या 5000 नवजात पिल्लांची विक्री केली.
बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धत
कोळंबी बीजोत्पादनानंतर श्री. मनोज यांनी पर्लस्पॉट जातीच्या बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धतीचा अवलंब केला आहे. हा पिंजरा त्यांनी प्लॅस्टिकच्या जाळीपासून तयार केला आहे. शेततळ्यातील पाण्यात हा पिंजरा तरंगण्यासाठी त्यांना चारही बाजूने पीव्हीसी पाइपचा सांगाडा तयार केला. परंतु पिंजरा तयार करण्यासाठी पीव्हीसी पाइपचा खर्च वाढला. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. बूच लावलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जाळीच्या पिंजऱ्याला वरच्या बाजूला लावल्या. त्यामुळे हा जाळीचा पिंजरा पाण्यात योग्य पद्धतीने तरंगू लागला. जाळीचा हा पिंजरा 3 मीटर ु 1 मीटर ु 1 मीटर आकाराचा आहे. पी.व्ही.सी. पाइपचा वापर करून हा पिंजरा बनविण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु श्री. मनोज यांनी हा जाळीचा पिंजरा एक हजार रुपयांत तयार केला आहे. या पिंजऱ्याचा वापर करून दर हंगामात 20 हजार पर्लस्पॉट बोटुकलींची विक्री परिसरातील शेतकऱ्यांना केली. या कमी खर्चाच्या मत्स्यबीजोत्पादनातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो आहे.
द्राक्षवेलीच्या वाढीकडे लक्ष ठेवा
नवीन बाग :
पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढली आहे. ती आर्द्रता वेलीच्या शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; परंतु हीच आर्द्रता जास्त वाढली असल्यास आणि बागेत जर पाऊस असेल, नवीन फूट वाढत असल्यास अशा वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता राहील. या बागेत पाऊस झाला असल्यास नवीन फुटींवर थोड्याफार प्रमाणात करपा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करपा नियंत्रण फायद्याचे राहील.
ही फूट निघत असताना आपल्याला वाढीचा जोम जास्त दिसेल. या जोमाचा फायदा व्हावा म्हणून आपण ओलांड्यावर पुन्हा दोन ते तीन काड्या मिळतील. या दृष्टीने प्रयत्न करत असतो; परंतु जर वाढीचा जोम जास्त असेल तर वेलीमध्ये जिब्रेलीन्सचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होऊ शकतो. पुन्हा वातावरण जर ढगाळी असेल तर घडनिर्मिती होण्याकरिता बाधा निर्माण होऊ शकते.
वेलीची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आपण नत्र व स्फुरदची पूर्तता करतो, तेव्हा दिलेले अन्नद्रव्य व त्याचसोबत वाढती आर्द्रता यामुळेच बागेत वाढीचा जोम जास्त दिसतो. अशा परिस्थितीमध्ये बागेत नत्रयुक्त खताचा वापर काही काळाकरिता बंद करावा. याचसोबत अपेक्षेप्रमाणे घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने शिफारशीत संजीवकाचा वापर या वेळी महत्त्वाचा राहील.
बऱ्याचशा बागेत या वेळी पानावर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. रिकट घेतल्यानंतर बागेत पहिल्या वर्षी ही समस्या आढळून येते. यामध्ये लोह व मॅग्नेशिअमची कमतरता प्रामुख्याने दिसते. बागेत पाने पिवळी पडणे व पाण्याच्या कडा पिवळ्या पडणे या महत्त्वाच्या समस्या या वेळी बागेत आढळून येतात.
अन्नद्रव्यांच्या या कमतरतेमुळे बागेत वेल अशक्य होत असून, त्यानंतर वातावरणाचा समतोल बिघडला असल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कमी प्रमाणात फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेटची शिफारशीत मात्रेमध्ये दोन ते तीन वेळा फवारणी करावी. त्याचसोबत जमिनीतूनसुद्धा या घटकांचा पुरवठा करावा.
जुनी बाग :
या बागेत काडी परिपक्व होत आहे. काडी तळातून दुधाळ रंगाची होत असताना काडी परिपक्वतेकडे वळली आहे, असे आपण म्हणतो. ही काडी परिपक्व होण्याच्या दृष्टीने तारेवर काड्या बांधून घेणे महत्त्वाचे समजावे. यामुळे कांड्यामध्ये गुंतागुंती होणार नाही, म्हणजेच मोकळी कॅनॉपी असेल तर त्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. कॅनॉपीमध्ये मिळालेले हे वातावरण काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे आर्द्रता कमी झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता कमी राहील.
या वेळी बागेत पावसाळी वातावरणामुळे नवीन फुटींची वाढ जास्त होताना दिसून येईल. ही फूट जास्त वाढल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ शकतो. तेव्हा एकतर पालाशची पूर्तता करून काडी लवकर परिपक्व करून घ्यावी, म्हणजे वाढ थांबेल किंवा फुटी वेळीच काढून टाकाव्यात. यामुळे रोगावर नियंत्रण ठेवता येईल. जुन्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा या रोगावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील.
सेझ आणि शेतकरी
ह्या देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर औद्योगिक कामकऱ्यांची गरज आहे. देशातील ६०% हून अधिक लोक शेतात काम करतात (आणि त्यातही ४०% लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळते!). हे सगळे हात देशाच्या आर्थिक समृद्धिला हातभार लावायला असमर्थ आहेत कारण रोजगार निर्माण करण्याच्या नावाखाली शेतजमिनीच्यामालकांना सरकार वाटेल त्या सवलती देते, पण ह्या सवलती घेउनही शेताचे उत्पादन वाढत नाही. अणि कसे वाढणार उत्पादन? देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षात दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही. शिवाय काम करणाऱ्यांपेक्षा काम मागणारे अधिक असल्यामुळे त्यांचे शोषण चालू आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त २% लोक शेतात काम करतात, आणि तरीही अमेरिकेचे धान्य उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे. ह्याचे कारण असे की जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जर शेती केली तर ती किफायती ठरत नाही. धान्याबरोबरच ह्या देशाला इतर साधनसामुग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडे नसल्यानेह्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर जर औद्योगिक कामाकडे वळवले तर देशाची परिस्थिती सुधारेल. औद्योगिक क्षेत्रात देशातले १२% लोक काम करतात आणि देशाचे जवळजवळ ३०% उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) काढतात. ह्याउलट, शेतकी व्यवसायात देशातले ६०% हून अधिक लोक काम करतात आणि केवळ १७% उत्पन्न काढतात. यावरून हे दिसून येईल की शेतावर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा, औद्योगिक मजुरांची उत्पादन क्षमता काही पटींनी अधिक आहे. सोपा हिशेब आहे: देशातल्या ४०% शेत कामकऱ्यांना जर औद्योगिक क्षेत्राकडे वळवले तर देशाचे उत्पन्न ३ पटींनी वाढेल. अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही, पण गेल्या ६० वर्षात नक्कीच करता आले असते. पण गांधीजींच्या भोंगळ कल्पनांमध्ये गुंतून देशाने आपले नुकसान करून घेतले आहे. शिवाय औद्योगिकीकरणामुळे शोषणही कमी होते, कारण औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग संघटीत आहे (लेबर युनियन्स), पण शेतमजुरांचे असे संघटन फार कमी प्रमाणावर बघायला मिळते.
शेतकर्याला गाय
“कोकणी शेतकर्याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्या दिवशी आणि माझ्या पुर्या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला नकोच.
शेतकरी आणि आत्महत्या
शेतकरी हा ज्यावेळस शेतात काम नसते त्या वेळेस दुसरी कामे का करत नाहीत .शेतात पेरणी केल्या नतंर , १ ते २ महिने मशागत करावी लागते , त्याच्या नतंर ४ ते ५ महीने शेतकरी घरीच बसुन असतात या वेळी घरातिल लग्न समारंभ किंवा ईतर कार्यक्रम करतात , शेतकर्याच्या घरात जर लग्न आसेल तर , ही शेतकरी आपल्या मुलिला हुन्डा म्हणुन , १००००० रु वा या पेक्षा जास्ती जास्त देतात किंवा मुलासाठी घेतात .
वरति सोने , घरात लागनार्या वस्तु , ईतर काही , किंवा बाईक वगरे .
याचे कारन म्हण्जे शेतकर्या च्या गावातली परंपरा , लग्ना च्या वेळी सगळ्या गावात चुल बन्द आमन्त्रन आसते गावची लोकस्न्ख्या कमीत कमी १००० किवा जास्ती जास्त किती ही , परत मुलाकडची मन्डळी ट्र्कनेच लग्नासाटी येतात , कमीत कमी २ ट्र्क किवा जास्ती जास्त किती हि, हे सारे कर्ताना शेतकरी शक्यतो गावातिल एका मोट्या शेतकर्या कडुन व्याजाने रुपये घेतो ,
मग व्याज व मुद्दल त्याच्याकडुन फेडले जात नाही , तो व्यतित होतो व व्यसानाच्या आहारी जातो , व्यसानाच्या आहारी गेल्या नन्तर काही दिवसानी त्याच्या आसे लक्षात येते कि आपली दुसरी मुलगी कींवा मुलगा लग्नाच्या वयात आला आहे , मग तो शेती विकुन लग्न कर्तो ,राहिलेल्या शेती वर त्याची उपजिवीका होत नाहि व शेतकरी बाहेर हि कामाला जात नाही ....?
आता अनुदानाची गोष्ट सागतो , भहुसन्ख शेतकर्या अनुदान मिळते च मग शेतकरी हि आनेक प्रकरने सरकारी कर्याल्यात खोटिच दाखवतो ,आती वॄष्टि झालि यांना अनुदान , कमी पाउस यांना अनुदान , पिकावर रोग पडला यांना अनुदान, सारकारी आधिकारी ही थोडे फार पैसे घेउन फाइल मन्जुर करतात .
विविध बॅन्केचे काढलेल कर्ज हि तो फेडत नाही .अनुदाने , कर्ज , काढुन तो पैसे स्त्कार्याला लावत नाही ,
त्या पैस्यातुन तो मुला करीता बाईक घेतो , पत्ते खेळतो दारु पितो , देवाच्या वारया करतो , व ईतर ही गोष्टी करतो .
शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुरच काम करतात , मि ज्या वेळी गावाकडे जातो त्या वेळेस शेतकर्या चि ही मुले आपल्या गाडीवर फिरत आसतात .
शेतकरी हि शेतापेक्षा ईतर जागेवच जास्त वेळ घालवतात , आज हि मी सांगु शकतो कि शेतकर्या च्या शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुर च काम करतात , तिसरे कारन शेत मजुर एक वेळेस उपाशी राहिन पण आपल्या मुलाला शिक्षण देइल , शेतकर्या चे तसे नाही मुलगा शिकला तर शिकला नाही तर आहे आपली शेती आहेच , माझेच उद्दा देतो माझ्या गावात माझ्या वयाची १६० मुले आसतिल पण त्यातिल फक्त मी गावाच्या बाहेर शक्षिण घेतले जवळ पुरेसे पैसे नसतांना हि लोकांच्या मदतिवर ,मग हि मुले शिक्षण का घेत नाहित , याचे मुख्य कारन शेति कींवा त्यांचा पुर्वि पासुन आसलेला समज कि आपल्याला काय कमी आहे . शेत मजुराचे तसे नाही त्यांच्या कडे उपजिवीके चे साधन नसते त्या मुळे ते आपल्या मुलाला शिक्षण देतात आणि ति मुले आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज हि करतात , आसो.......
ज्या शेतकर्या कडे सुरवातिला ५ एकर जमिन होती आता त्यांच्याकडे १ एकर हि राहिलि नाही , कारन कुटंबाचा केलेला विस्तार , शेतकर्याला कमित कमी २ आणि जास्तीत जास्त ५ ते ६ मुले आसतात , एकत्र कुटुंब पध्दत आता खेडयात ही राहिली नाही , त्या मुळे त्याच्याकडे आसनार्या शेताची विभागनी होते ,
मग १ एकरात आसे किती पिक येनार , त्यात त्याचे घरही चालत नाही व तो दुसरी कडे कामाला जात नाही . आसे होत आसतांनाच त्या शेतकर्या च्या घरचे एखादे लग्न कींवा एखादा समारंभ निघतो व तो पुन्हा कर्जा ने पैसे काढतो व ते फेडता नाही आले कि आपली आहे ति शेती विकुन टाकतो मग पुढे काय ....
आजकाल तर शेतकरी कोणत्याही बँकचे कर्ज हि फेडत नाही उलट कर्ज माफीची वाट पाह्तो , कींवा सरकारी अनुदाने लाटत आसतो , खोटी कागद पत्रे सादर करुन .
तुम्हाला जर हे खोटे वाटत आसेल तर तुम्ही प्रत्यक्ष कधितरी मराटवाडयातील एखादया खेडे गावात जाउन यावे .
सरकार भरपुर अनुदान देते उदा : गाई , मह्से, शेळी , कोबडी , मत्सपालन , वुर्क्ष रोपन , यावर सरकार अनुदान देते , पन शेतकरी काय करतात ज्यावेळेस बँकेचे कींवा सरकारी आधिकारी चोकशी साठी येतात त्या वेळेस शेतकरी दुसरयाचिच , गाय , शेळी दाखवुन बँके चा पैसा उचलतात सरकारी आधिकारी ही थोडेफार पैसे घेउन फाइल मंजुर करतात.
मग शेतकरी घेतलेल्या कर्जतुन ना शेतीला पुरक व्यावसाय करतो , ना बॅंकेचे कर्ज फेडतो यातच तो कर्जबाजारी होतो मग पुढे काय ......
पण माझ्या गावात आसेही काहि शेतकरी आहेत की ज्यांना ना अनुदान मिळते ना कोनत्या बँकेचे कर्ज मिळते
बिचारे ६ महिने शेतात काम करुन उरलेले ६ महिने उसतोडनी साठी जातात आणी त्यातुन आलेल्या पैसे तुन आपल्या मुला मुलीचे लग्न करतात.
बरे शेतकर्याने आत्महत्या केली तर त्याचि खरी कारने शोधली जात नाहित
उदा :
१ ) शेतकर्याने का आत्मह्त्या केली ?
उदा :
१ ) बि बियाने , खते , किटक नाशके ,
२ ) नागरनी , फवारनी
३ ) मशागत , शेतमजुरी
४ ) विद्दुत पंप , कींवा शेतात पाइप लाईन
५ ) विद्दुत जोडनी
६ ) बैल , गाय , शेळी, म्हैस , कोबडया , मत्स पालन , इत्यादी साठी .
७ ) विहीर कींवा बोअर घेने
८ ) ट्रक्टर , बैलगाडी , व इतर आवजरे
आसो मि हे सर्व काही शेतकर्या चा विरोधक म्हणुन नाही लिहले हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत
आमच्या कडे ५ एकर शेती होती ति कोनत्या कारना साठी विकली तर , माझ्या बहिनी चे व चुलत बहिनी चे लग्न , शेती विकुन माझे आई वडिल आता दुसर्या च्या शेतात शेतजुर म्हणुन जातात कींवा उसतोड मजुर म्हणुन साखर कारखान्यावर जातात .
खरोखरीच शेतकरी का आत्मह्त्या करतो , याची खरी कारने शोधली पाहिजेत कर्ज माफी कींवा अनुदाने हा त्या वर चा उपाय नव्हे आपय आहे ?
१ ) शेतकर्याच्या कोनत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही , त्यामुळे दलाल शेतकर्या कडुन शेतिमाल कमी भावाने विकत घेउन शहरा च्या ठीकाणी कित्तीतरी आधिक भावाने विकतात .
२ ) शेतमालाची बाजारपेठ शेतकर्या च्या हातात नाही तिथे मारवाडी कींवा ईतर लोक आसतात .
३ ) जसे भारतात कोनत्याही वस्तुची फिक्स कींमत आहे तर मग शेतीमालाचिच का नाही .
उदा : कांदे १० रुपये किलो आहेत तर संपुर्ण भारतात १० रुपये किलो ने विकली गेली पाहिजेत आज कसे होते शेतकर्या कडुन ३ रुपये किलो ने कांदे घेउन ति १५ रुपये कीलो ने विकली जातात महण्जे फायदा कोनाचा ?
मि पुण्यात राह्तो ज्या वेळेस मी गावाकडे जातो त्या वेळेस वांगी , कांदे , भेंडी , टॅमाटो , ईतर भाजिपाला खुप झालेतर , ५ रुपये कीलो मिळतो कधी कधी तर २ कींवा ३ रुपये कीलो ने मिळतो मग शहरा च्या ठीकानीच का १५ ते ५० रुपये कीलो ने मिळतो महण्जे फायदा कोनाचा ,
आशी खुप कारने आहेत पण एक मत्र खरे , शेतकर्याने कष्ट करुन शेतीत माल पिकवला तरी तो त्या शेतमालाची व त्याच्य कष्टाची किंमत टरवु शकत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल, ति कींमत सरकरी आधिकारी , दलाल कींवा तुम्ही आम्ही ठरवतो .
४) साखरकारखाने ही उसाचे राजकारण करतात , एक कारखाना उसाला १५०० रुपये भाव देतो तर दुसरा कारखाना उसाला ६०० कींवा ७०० रुपये भाव देतो , मग मला प्रश्न्न पडतो की १५०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर पांढरी आसते आणी ६०० कींवा ७०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर काळी आसते का ?
कधीकधी तर ही साखरकारखाने शेतकर्या चा उस शेतातच राहुन देतात कारन काय तर तो आमुक तमुक पार्टीचा माणुस आहे , गरीब शेतकर्यांचे तर हाल विचर्याला नको .
५ ) महाराष्ट्रातील साखरकारखाने , कॄषीउत्तपंन्न बाजार समीती , भु विकास बँक , जिल्हा सहकारी बँक ,
या संस्थाशी शेतकर्या जास्त सबंध येतो पण या संस्था कोनत्या कोनत्या राजकीय पुढारयाच्या ताब्यात आसतात , म बँक , कारखाना तोट्यात चालतो आहे आसे दाखवुन त्यावर सरकारी पॅकेज मीळवायचे , ते पॅकेज स्वता: कडेच ठेवायचे शेतकर्याचे काय तो त्याचा काही करेल
मुळात महाराष्ट्रातील कोणतीच सह्कारी संस्था तोट्यात चालत नसावी पण सह्कार खात्याला लागलेली भ्रष्टाचारी नेत्याची धुळ ....
सहा वर्षात बीड जिल्हायातील ३८२ शेतकर्याच्या आत्मह्त्या .
बीड , दि. ७ बीड जिल्हात गेल्या सहा वर्षात ३८२ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यातील ११९ शेतकर्यांच्या आत्मह्त्या या कर्जबाजारीला कंटाळुन झाल्याचे सिध्द झाले आहे . १११ जणांच्या वारसांना शासनाची एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर आट जणांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु आहे .
जिल्हाधिकारी भारत सासने यांच्या उपस्थितीत सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या आत्मह्त्या संदर्भात बैटक झाली. यात उर्वरित प्रकरणांवर चर्चा झाली . कायमस्वरुपी दुष्काळी हे बिरुद चिटकलेल्या बीड जिल्हात शेतकर्यांच्या आत्मह्त्येचे लोण पसरले आहे गेल्या सहा वर्षात ३७८ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यात २००४ सली ११ जणांच्या आत्मह्त्या केल्या. त्या पैकी एक ही आत्मह्त्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे . तर २००६ या एकट्या वर्षात जिल्हात १२४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या झाल्या आहेत . या पैकी फक्त २३ आत्महत्या प्रशासकीय मदती साटी पात्र ठरल्या तर १०१ प्रकरणात कर्जबाजारीपणामुळे नसल्याचा शेरा प्रशासनाने मारला.
२००७ यावर्षात आत्मह्त्येचा सिलसिला कायम राहीला .याही वर्षी एकुण ९५ जणांनी आत्मह्त्या केल्या . पैकी ३९ प्रकरणात वारसांना शासकीय मदत मिळाली तर ५६ प्रकरणे नाकारण्यात आली . २००८ यावर्षी ८६ जणांनी आत्मह्त्या केल्या त्यातील ४४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या मदती साठीग्राह्य धरुन उरलल्या ४२ प्रकरणात आत्मह्त्याचे कारण कर्ज बाजारीपणा नसल्याचे नमुद केले . २००९ वर्षात ५४ जणांच्या आत्मह्त्या झाल्या . यातील १४ जणांच्या वारसांना मदत मिळाली तर ३२ प्रकणे आपात्र टरविण्यात आहेत ४ शेतकर्यांचे अहवाल अद्दाप नाहीत
२००९ या चालु वर्षात आत्मह्त्या केलेल्या ४ प्रकणांचा अहवाल अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही . या बाबत पोलिस आणि प्रशासन चोकशी करीत असुन अहवाल मिळाल्यानंतर ती प्रकरणे चर्चेसाटी येणार आहेत .
म्हण्जे सहा वर्षा कर्जबाजारीपणा मुळे फक्त ११९ शेतकर्यांने आत्मह्त्या केल्या बाकीच्या शेतकर्याची २६३ शेतकर्याची आत्मह्त्येची कारणे कोनती ? आणी ते कोनशोधनार ..
आधुनिक शेतकरी
आधुनिक शेतकरी आपल्या देशाची प्रगती झाली आहे. मोठमोठ्या परदेशी कंपन्यांनी आपला उत्कर्ष व भरभराट पाहून त्यांचा संसार इथेच थाटलाय. मोठ्या इमारती, मोठे पगार, मोठ्या गाड्या, सर्वकाही मोठ्या प्रमाणात होत आहे. माणसाला सुखसोयी, चांगली राहणी आणि खूप काही मिळत आहे. पण आज त्याच माणसाकडे थोडासाही वेळ उरला नाही.
ख रीप हंगामाच्या पूर्वतयारी
पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाण्याची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या, खतास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/ जातीचे नाव, उगवणक्षमता इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाण्यात काही दोष आढळल्यास बिल, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.
पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करून ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात, मका या एकदल व तृणधान्ये पिकासाठी ऍझोटोबॅक्टर, शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.
पूर्वहंगामी कापूस पिकासाठी उष्ण, कोरडे व कमी आर्द्रतायुक्त हवामान मानवते. या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वहंगामी कापूस पीक 25 ते 30 दिवसांचे होऊन त्यास पाते लागण्यास सुरवात होते. ठिबक सिंचनावर आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड योग्य वेळी करता येते व या पिकास पाण्याचा कोणताही ताण बसत नाही. सर्वसाधारणपणे पाच अश्वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यावर कमीत कमी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ठिबक पद्धतीने करणे शक्य आहे.
जमिनीची निवड ः
मध्यम ते भारी, काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. हलक्या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.
पूर्वमशागत ः
एक खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व काडीकचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ करावे. शेवटाच्या कुळवाच्या पाळीअगोदर 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन संच उभारणी ः
पूर्वमशागत झाल्यावर शेताची पाहणी करून आराखडा तयार करावा. आराखड्याप्रमाणे ठिबक संचाची उभारणी करावी. पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. कापूस पिकासाठी ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास असलेल्या 12 किंवा 16 मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी. इनलाईन नळीच्या दोन ड्रीपरमधील अंतर 60 सें.मी. किंवा 90 सें.मी. असावे. ठिबक सिंचन पद्धतीत जोडओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे प्रति हेक्टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते, तसेच पीक फवारणी, आंतरमशागत व कापूस वेचणी ही कामे सोईस्कर राबविता येतात.
लागवड व्यवस्थापन ः
ठिबक सिंचन आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची निवड करावी. बी.टी. कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व जास्त फळफांद्या असणाऱ्या जातीची निवड करावी. लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, जाती इ. बाबींचा विचार करावा. लागवडीसाठी बियाणे लावण्यापूर्वी (पेरणीपूर्वी) 12 ते 14 तास ठिबक संच चालवून शेतात वाफसा होईपर्यंत ओलावा निर्माण करावा. नंतर शिफारस केलेल्या अंतरावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 60 ते 120 ु 90 सें.मी. किंवा 90 ते 180 ु 105 ते 120 सें.मी. अशा अनेक जोडओळ किंवा पट्टा पद्धतीने ठिबक संचालगत लागवड करावी. लागवड करताना इनलाईन नळीचे ड्रीपर व बियाणे लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी.
वर्धा जिल्हा
तहसिल | एकूण क्षेत्रफळ | जंगल व्याप्त क्षेत्र | ओलीत क्षेत्र | कोरडवाहू क्षेत्र | बिगर शेती वापराखालील जमीन | लागवडी लायक नसलेली जमीन |
आर्वी | 67932.00 | 4337.97 | 2098.68 | 42604.01 | 9931.46 | 8952.53 |
आष्टी | 31570.00 | 3553.43 | 1855.02 | 16456.26 | 2175.89 | 7481.59 |
कारंजा | 55872.00 | 7370.32 | 2554.25 | 35564.06 | 5227.02 | 5138.75 |
सेलू | 58857.00 | 3602.73 | 4449.07 | 36388.75 | 7014.01 | 7244.21 |
वर्धा | 69366.00 | 299.72 | 2773.98 | 47321.19 | 9163.43 | 9379.27 |
देवळी | 59318.00 | 108.79 | 1175.41 | 43761.39 | 7500.74 | 6911.14 |
हिंगणघाट | 80165.00 | 1711.15 | 2484.54 | 61492.52 | 5740.11 | 8606.83 |
समुद्रपुर | 79714.00 | 2709.75 | 3273.20 | 58016.47 | 6148.21 | 9668.95 |
गहू | जवार | बाजरी | हरभरा | तूर | मूग | उडीद | मटकी | ऊस | मिरची | फळे व भाजीपाला | कापूस | भुईमूग | तिळ | सोयाबीन | |
वर्धा | 1029 | 3175 | 24 | 642 | 2209 | 63 | 40 | 19 | 18 | 11767 | 1545 | 11767 | 423 | 42 | 3532 |
सेलु | 2420 | 3661 | 5 | 1549 | 2491 | 168 | 227 | 29 | – | 10685 | 2355 | 10685 | 2227 | 43 | 11353 |
समुद्रपूर | 1179 | 10394 | 15 | 483 | 5649 | 142 | 12 | 20 | 365 | 25295 | 1288 | 25295 | 216 | 64 | 4161 |
हिंगणघाट | 3312 | 5246 | – | 1569 | 4919 | 56 | 11 | 30 | 1577 | 21343 | 1194 | 21343 | 202 | 93 | 8130 |
देवळी | 2704 | 12200 | – | 915 | 6315 | 123 | – | 367 | 623 | 30118 | 1035 | 30118 | 41 | 228 | 3936 |
आर्वी | 79 | 6659 | 43 | 1396 | 7437 | 171 | – | 81 | – | 27048 | 55 | 27048 | 21 | 104 | 6684 |
आष्टी | 402 | 6341 | 13 | 3175 | 8314 | 84 | 16 | 117 | 11 | 36967 | 132 | 36967 | 3 | 384 | 15181 |
करंजा | 2374 | 7321 | – | 7104 | 6153 | 10 | 91 | 79 | 133 | 26718 | 934 | 26718 | – | 243 | 23619 |
तहसिल | कुट्रंबाची संख्या | लोकसंख्या | अनुसुचित जाती | अनुसुचित जमाती | ||||||
एकूण | पुरुष | स्रिया | एकूण | पुरुष | स्रिया | एकूण | पुरुष | स्रिया | ||
आर्वी | 23,361 | 102,923 | 53,073 | 49,850 | 13,469 | 6,919 | 6,550 | 19,855 | 10,194 | 9,661 |
आष्टी | 16,156 | 73,594 | 38,037 | 35,557 | 8,869 | 4,647 | 4,222 | 9,333 | 4,805 | 4,528 |
कारंजा | 19,735 | 88,720 | 45,592 | 43,128 | 7,648 | 3,954 | 3,694 | 13,454 | 6,925 | 6,529 |
सेलू | 26,448 | 120,026 | 61,720 | 58,306 | 12,586 | 6,548 | 6,038 | 20,356 | 10,442 | 9,914 |
वर्धा | 41,927 | 187,865 | 97,174 | 90,691 | 23,777 | 12,221 | 11,556 | 20,846 | 10,880 | 9,966 |
देवळी | 23,263 | 102,814 | 52,977 | 49,837 | 17,981 | 9,271 | 8,710 | 15,315 | 7,813 | 7,502 |
हिंगणघाट | 26,730 | 120,136 | 62,035 | 58,101 | 15,448 | 8,002 | 7,446 | 14,483 | 7,510 | 6,973 |
समुद्रपुर | 25,343 | 115,617 | 60,002 | 55,615 | 12,367 | 6,482 | 5,885 | 19,124 | 9,940 | 9,184 |
महिना | पाऊस (मिमी.) | पीइटी (मिमी.) | एइटी (मिमी.) | डब्ल्यूडी (मिमी.) | डब्ल्यूएस (मिमी.) |
जानेवारी | 18.40 | 810.00 | 19.10 | 790.90 | 0.00 |
फेब्रुवारी | 8.99 | 100.29 | 8.99 | 91.30 | 0.00 |
मार्च | 13.14 | 144.60 | 13.15 | 131.45 | 0.00 |
एप्रिल | 6.09 | 170.90 | 6.09 | 164.81 | 0.00 |
मे | 6.98 | 201.70 | 6.98 | 194.72 | 0.00 |
जून | 185.70 | 169.60 | 169.60 | 0.00 | 0.00 |
जुलै | 222.91 | 110.30 | 110.30 | 0.00 | 0.00 |
ऑगस्ट | 225.88 | 102.10 | 102.10 | 0.00 | 52.49 |
सप्टेंबर | 145.16 | 107.00 | 343.20 | 726.80 | 0.00 |
ऑक्टोबर | 58.11 | 112.20 | 58.57 | 53.63 | 0.00 |
नोव्हेंबर | 10.76 | 86.70 | 11.24 | 75.46 | 0.00 |
डिसेंबर | 0.84 | 73.20 | 1.15 | 72.05 | 0.00 |
एकूण | 902.96 | 2,188.59 | 850.47 | 2,301.12 | 52.49 |
महिना | पाऊस (मिमी.) | पीइटी (मिमी.) | एइटी (मिमी.) | डब्ल्यूडी (मिमी.) | डब्ल्यूएस (मिमी.) |
जानेवारी | 18.40 | 810.00 | 19.10 | 790.90 | 0.00 |
फेब्रुवारी | 8.99 | 100.29 | 8.99 | 91.30 | 0.00 |
मार्च | 13.14 | 144.60 | 13.15 | 131.45 | 0.00 |
एप्रिल | 6.09 | 170.90 | 6.09 | 164.81 | 0.00 |
मे | 6.98 | 201.70 | 6.98 | 194.72 | 0.00 |
जून | 185.70 | 169.60 | 169.60 | 0.00 | 0.00 |
जुलै | 222.91 | 110.30 | 110.30 | 0.00 | 0.00 |
ऑगस्ट | 225.88 | 102.10 | 102.10 | 0.00 | 52.49 |
सप्टेंबर | 145.16 | 107.00 | 343.20 | 726.80 | 0.00 |
ऑक्टोबर | 58.11 | 112.20 | 58.57 | 53.63 | 0.00 |
नोव्हेंबर | 10.76 | 86.70 | 11.24 | 75.46 | 0.00 |
डिसेंबर | 0.84 | 73.20 | 1.15 | 72.05 | 0.00 |
एकूण | 902.96 | 2,188.59 | 850.47 | 2,301.12 | 52.49 |
उझी माशीचा प्रादुर्भाव
भौतिक, रासायनिक व जैविक उपायांनी नियंत्रण करणे शक्य आहे.
भौतिक उपाय – कीटक संगोपनगृह, कोष खरेदीकेंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्र इ. ठिकाणांवरील मॅगट व प्युपा गोळा करून जाळून नष्ट करावा किंवा 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात नष्ट करावा. जमिनींना असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. उझी माशीच्या प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.
रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.
हरळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी
बागेत फवारणी करताना पंपाला हूड लावूनच फवारणी करावी. तणनाशक झाडाच्या जवळपास किंवा हिरव्या भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतात पाणथळ जागा राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. तण हे लुसलुशीत व चार ते पाच पानांवर असावे. तणांच्या प्रादुर्भावानुसार हेक्टरी दोन ते चार लिटर ग्लायफोसेट प्रति 500-600 लिटर पाण्यातून फवारावे. फ्लॅट नोझलचा वापर करावा. फवारणी स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी. ढगाळ वातावरणात करू नये. फवारणीनंतर 21 दिवसांपर्यंत शेताची मशागत करू नये. तणांच्या उगवणीपूर्वी बागेत ऍट्राझीन हे तणनाशक दीड ते तीन लिटर प्रति हेक्टरी फवारल्यास चांगले नियंत्रण मिळते.
उत्पादनासोबत कंपनी एक छोटी घडीपत्रिका किंवा माहितीपत्रिका देते. त्यात हे लेबल क्लेम दिलेले असतात. (तुम्ही लीफलेट उघडून पाहा. त्यात कीडनाशकाचे नाव, सक्रिय घटक, कोणकोणत्या पिकांवर, कोणकोणत्या किडी-रोग वा तणांचे नियंत्रण), वापरण्याची मात्रा व डोस, पाणी याचा एक तक्ता वा कोष्टक दिलेले असते. ही माहिती म्हणजेच लेबल क्लेम.
उदा. कंपनीने या कोष्टकात आपल्या कार्बेन्डॅझीम या उत्पादनाचा (बुरशीनाशक) डोस भुईमुगावरील टिक्का रोगासाठी प्रति हेक्टरी प्रति 600 लिटर पाण्यासाठी 225 ग्रॅम आहे असे जेव्हा लिहिलेले असते त्याचा अर्थ भुईमूग पिकावर टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाचा लेबल क्लेम आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच विविध चाचण्यांतून पार पडल्यानंतर शास्त्रीय कसोटींवर आधारित सिद्ध झालेली किंवा करण्यात आलेली ही अधिकृत शिफारस होय. आता पॅकिंगवर लेबलच्या स्वरूपात जी माहिती कंपनी उपलब्ध करते त्याचे विस्तृत विवरण घडीपत्रिकेत असते. त्याला इंग्रजीत लीफलेट असे म्हणतात. प्रत्येक उत्पादनासोबत प्रत्येक कंपनी हे लिफलेट देते. पॅकिंगवरील माहितीवर कंपनीने असे लिहिलेलेच असते की अधिक माहितीसाठी लिफलेट वाचावे. मात्र अनेकवेळा बाटली एकीकडे, लीफलेट दुसरीकडे अशी विक्री केंद्रावर परिस्थिती असते. कोणत्याही परिस्थितीत बाटली किंवा उत्पादनाचा पुडा यासोबत दोन गोष्टी घेतल्याशिवाय शेतकऱ्याने दुकान सोडू नये. 1)खरेदीची पक्की पावती 2) लीफलेट (लेबलचे माहितीपत्रक वा घडीपत्रक)
लीफलेट घरी जाऊन सविस्तर वाचावे. अनेकवेळा लीफलेटवरील माहिती अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेली असते, त्यामुळे ती डोळ्यांनी सहजासहजी वाचणे कठीण जाते. अशा वेळी चांगल्या दर्जाच्या भिंगाचा वापर करावा. शेतात किडींचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे भिंग असावेच लागते. त्याचा वापर करावा. लीफलेट कायम जपून ठेवावे. आपल्यासोबत अन्य शेतकऱ्यांनाही लेबल क्लेमचे महत्त्व समजावून द्यावे.
लेबल क्लेममुळे काय फायदे होतात?
शेतकऱ्याला त्या उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी कायदेशीर हमी वा संरक्षण मिळते.
देशभरात विविध ठिकाणी (कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था) संबंधित कीडनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासून मगच त्याची अधिकृतरीत्या ती शिफारस असते.
लेबल क्लेमद्वारे संबंधित कीडनाशकाची केवळ मात्रा, वापरण्याची वेळ निश्चित होते असे नाही, तर संबंधित पीक, मानव, पर्यावरण, मित्रकीटक, जनाव, जलाशय,मासे आदी घटकांवर कीडनाशकाच्या होणाऱ्या परिणामांच्या चाचण्या तपासलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी घोषित करण्यात येते.
लेबल क्लेममधून “पीएचआय’ शेतकऱ्यांना समजून येतो. ज्यावरून पुढे “एमआरएल’ मिळवणे शक्य होते.
एखादे कीडनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्याच निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले तर त्याचा त्या पिकावर किंवा पाने, कळ्या, मोहोर, फळांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लेबल क्लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असल्याने तो धोका टळला जाऊ शकतो.
लेबल क्लेममुळे एखाद्या रसायनाची चुकीची शिफारस करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल वा फसवणूक होणे टळू शकते.
सोयाबीन
1) शेतालगतचे बांध स्वच्छ करावे. 2) गोगलगायी दिसताच चिमट्याने अथवा हाताने गोळा करून उकळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. 3) संध्याकाळी शेतामध्ये ठराविक अंतरावर गवताचे ढीग ठेवावेत व सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा, तसेच पिकांच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (100 ते 150च्या पुंजक्यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 5) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ मिसळावा व त्या द्रावणात गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी गोगलगायीग्रस्त शेतात ठराविक अंतरावर पसरावीत. गोगलगायी अशा पसरलेल्या पोत्यांखाली जमा होतात, सकाळ होताच त्यांचा वेचून नाश करावा. 6) सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. 7) जास्त उपद्रव असल्यास शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख पसरून त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना 2ः3 या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा किंवा बांधाच्या शेजारी तंबाखू अगर चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा टाकावा, त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल. पाऊस पडत असल्यास या पद्धतीचा उपयोग होत नाही. मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव असलेल्या शेतात संध्याकाळच्या वेळी पाच किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात शेतात टाकल्यास, त्या खाऊन गोगलगायी मरतात. 9) विषारी आमिष देऊनही गोगलगायी मारता येतात, त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा 50 किलो कोंडा दोन किलो गुळाच्या द्रावणामध्ये 10 ते 12 तास भिजवून ठेवावा. त्यामध्ये 25 ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळून संध्याकाळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्टरी पसरून टाकावे. मिथोमिल हे
विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत आणि नाका-तोंडावर कापड बांधावे. हे आमिष जनावरे व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 10) सामूहिक प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण होते.
कापूस
ठिबक संच शेतात उभारण्यापूर्वी पुढील आवश्यक घटकांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.
पूर्वमशागत ः संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/ आडवी नांगरट व वखराच्या पाळ्याद्वारे जमीन भुसभुशीत करावी. भुसभुशीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्य रीतीने पसरते. कापूस लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करताना तडजोड करू नये. संचामध्ये नळ्यांव्यतिरिक्त फिल्टर व प्रेशर गेज हे महत्त्वाचे घटक जरूर जोडावेत.
फिल्टर अतिशय महत्त्वाचा ः इनलाईन ठिबक नळ्या तयार होत असतानाच त्यांच्या आत ठिबक तोट्या बसविलेल्या असतात, त्यामुळे इनलाईन नळ्या वरून स्वच्छ करता येत नाहीत म्हणून या पद्धतीत फिल्टरची निवड जास्त महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो, मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा. पाण्यामध्ये शेवाळे व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेले पाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरायचे असल्यास वाळूचा फिल्टर असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जाळीचा फिल्टर वारंवार चोक होऊन पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे, रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जाऊन ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याद्वारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसायक्लॉन फिल्टर वापरावा. या फिल्टरद्वारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुळे पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेर भिंतीकडे फेकले जाऊन तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्थ व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात, परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची निवड करावी. या फिल्टरमध्ये प्लॅस्टिकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यांवर बारीक खाचा असतात. फिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यांमधील खाचांतून स्वच्छ होऊन बाहेर पडते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा. ः जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते.
प्रेशर गेज आवश्यक ः
प्रत्येक शेतकऱ्याने प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्यक आहे. संचामध्ये कमीत कमी दोन प्रेशर गेज असावे. एक प्रेशर गेज मुख्य पाइपलाइनवर फिल्टरच्या पूर्वी व दुसरा फिल्टरच्या नंतर बसवावा. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंचुरीद्वारे खत मिश्रित पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे.
इनलाईन नळ्या, ड्रीपर्सची निवड ः
संच योग्य दाबावर (साधारणत: एक कि. ग्रॅ./ वर्ग सें.मी.) सुरू नसल्यास पाण्याचे वितरण समान होत नाही व संच चालविण्याचा कालावधी ठरविल्यास त्यात चुका होऊ शकतात. ठिबक संचातील इनलाईन नळ्यांची निवड काळजीपूर्वक करावी. या नळ्या १२ मि.मी. व १६ मि.मी. मध्ये उपलब्ध आहेत. १२ मि.मी. व्यासाची इनलाईन नळी स्वस्त असते; परंतु तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असते. या नळ्या वापरल्यास सबमेनवरील खर्चात वाढ होते, त्यामुळे शेताच्या आराखड्यानुसार दोन्ही प्रकारच्या (१२/१६ मि.मी.) नळ्यांद्वारे होणाऱ्या खर्चाची तुलना करून व त्याचा समन्वय साधूनच त्यांची निवड करावी. दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, कापसासाठी मध्यम जमिनीत दोन तोट्यांमधील अंतर ६० सें.मी. असते. तोट्यांतून बाहेर पडणारा प्रवाह साधारणत: २.२ ते ४.० लिटर प्रति तास असतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे अधिक प्रवाहाच्या तोट्या उपयुक्त ठरतात, यामुळे संच चालविण्याचा कालावधी कमी होतो.
लक्षात घ्या कापसाची पाण्याची गरज ः
बीटी कापसास पावसाच्या खंडाच्या दरम्यान एक किंवा दोन दिवसाआड ठिबकने पाणी द्यावे. पाणी देताना त्या दोन-तीन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन जितके असेल त्याच्या ५० टक्के इतक्या खोलीचे पाणी द्यावे. प्रत्येक ठिबक तोटीद्वारे किती लिटर पाणी द्यायचे हे काढण्यासाठी त्या तोटीद्वारे किती क्षेत्र भिजवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. लागवडीनंतर सुरवातीच्या काळात झाडाच्या जवळचे क्षेत्रच भिजवायचे असल्यामुळे या वेळी पाण्याची गरज कमी असते.
समजा लागवडीतील अंतर ६० १२० सें.मी. इतके असेल तर प्रत्येक झाडाने व्यापलेले क्षेत्र ०.७२ चौ. मीटर इतके होईल. प्रत्येक झाडास एक तोटी दिलेली असल्यास व एकत्रित बाष्पीभवन आठ मि.मी. असल्यास प्रत्येक झाडास साधारण तीन लिटर पाणी दोन दिवसांनी द्यावे लागेल. ठिबकची तोटी चार लिटर प्रति तास प्रवाहाची असल्यास संच ४५ मिनिटे चालवावा लागेल. याप्रमाणे लागवडीचे अंतर व नळ्याची व ठिबक तोट्यांची मांडणी यानुसार संच चालविण्याचा कालावधी काढून संचाचे नियमन करता येईल. कापूस पिकाला हवामानानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत ८०० ते ९०० मि.मी. पाण्याची गरज असते. कापसाच्या हंगामात या कालावधीत साधारण ४५० ते ५५० मि.मी. उपयुक्त पावसाची नोंद होते. त्यामुळे उरलेले ३०० ते ४०० मि.मी. पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे लागेल. बऱ्याचदा हंगामानंतरही काही बोंडे हिरवी असल्यामुळे पीक राखले जाते. अशावेळी झाडावरील बोंडांची संख्या, त्यापासून मिळणारे उत्पादन, कापूस वेचण्यासाठी मजुरांची उपलब्धता व कापसाचा बाजारभाव इ. बाबींचा विचार करून पीक सांभाळावे. अशावेळी ठिबकद्वारे उर्वरित हंगामासाठीही बोंडे भरण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यास बागायती बीटी कापसाची लागवड मे महिन्यात न करता २० जूनपर्यंत केली तरी फायद्याचे ठरते.
खत व्यवस्थापन :
बीटी कापसाला साधारणपणे १००:५०:५० किलो प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाशचा वापर करावा. पिकाच्या हंगामाचा कालावधी लांबणार असल्यास (१८० दिवसांपेक्षा जास्त) यामध्ये ३० ते ५० टक्के वाढ करावी. याशिवाय हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वरील मात्रेमध्ये गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा. साधारणत: ६० ते ७० दिवसांनंतर मॅग्नेशिअम सल्फेट २५ ते ४० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी द्यायचे असल्यास तक्ता क्र. १ प्रमाणे खतांचे वेळापत्रक ठरवावे.
ठिबकद्वारे खते देण्याचे तंत्र ः
ठिबक संचाद्वारे खते देणेच जास्त योग्य असते. या प्रक्रियेस फर्टिगेशन म्हणतात. खते देण्यासाठी व्हेंचुरीचा वापर जास्त सोयीचा आहे. खतमिश्रित पाण्यात व्हेंचुरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते व मुख्य पाइपवरील व्हॉल्व्हच्या साहाय्याने खतामधील पाणी मुख्य प्रवाहात सोडता येते. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात. यासाठी संचासोबत व्हेंचुरी व बायपास असेंब्ली व्हॉल्व्हसह घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च येतो.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खतांची वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक संचातून द्यावा. ठिबकद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्य नसल्यास, आठवड्यातून / पंधरवड्यातून एकदा द्यावे. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. तक्ता क्र. २ मध्ये विद्राव्य खतांचे कापसासाठीचे वेळापत्रक दिलेले आहे. पिकाची कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यास १३५ दिवसांपर्यंत खते देण्यासाठी खतांच्या मात्रेत २० ते ३० टक्के वाढ करावी.