IECIT

You are most welcome....
RSS

तिळाचे बियाणे

तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. उन्हाळ्यात उभी-आडवी वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी, काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठार फिरवून पेरणी करावी. अर्ध रब्बी हंगामात वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे.
बियाण्याचे हेक्‍टरी प्रमाण -खरीप व अर्ध-रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी दीड ते दोन किलो व उन्हाळी हंगामाकरिता तीन ते चार किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया -पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेन्डाझिम यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची योग्य वेळ -खरिपातील पेरणी जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवडा.
अर्ध-रब्बी -सप्टेंबरचा पहिला पंधरवडा.
उन्हाळी -फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा.
पेरणीची पद्धत -बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू/गाळलेले शेणखत/राख/माती मिसळावी. पाभरीने/तिफणीने 30 सें.मी. वर पेरणी करावी.
आंतरपिके -तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते. आंतरपीक पद्धतीमध्ये तीळ + मूग (3ः3), तीळ + सोयाबीन (2ः1), तीळ + कापूस (3ः1) हे फायदेशीर आढळून आलेले आहे.

रासायनिक खतांची मात्रा देण्याची वेळ 
पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (12.5 कि./हे.) व पूर्ण स्फुरद (25 कि./हे.) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 कि./हे.) द्यावा. एकेटी-64 या वाणाकरिता रासायनिक खतां ची मात्रा 40 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी, तसेच पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर 20 किलो प्रति हेक्‍टर या प्र माणात दिले असता उत्पन्नात वाढ होते.

विरळणी/ खाडे भरणे -
रणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात 10-15 सें.मी. अंतर ठेवावे. म्हणजे शेतात हेक्‍टरी 2.25 ते 2.50 लाख रोपांची संख्या राहील.

आंतरमशागत -
आवश्‍यकतेनुसार दोन ते तीन कोळपण्या/ खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

ओलित व्यवस्थापन -
उन्हाळी पिकास/ अर्ध रब्बी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12-15 दिवसा ंनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

वेळेवर कापणी महत्त्वाची -
तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते, त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. तीन ते चार दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साहाय्याने तीळ झाडावे. काही बोंड्या तडकल्या नसल्यास चार ते पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. तिळाचे हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll