IECIT

You are most welcome....
RSS

गां डूळ खत

गां डूळ खत तयार करण्यासाठी आयसेनिया फेटिडा, युड्रिलस युजिनी या गांडुळां च्या जाती चांगल्या आहेत. पेंढा, तूस, झाडांचा पालापाचोळा, शेण, कोंबडीची विष्ठा, भाजीपाल्याचे अवशेष, उसाचे पाचट, शेतीतील काडीकचरा यांचा वापर करावा. तीन मीटर लांब, एक मीटर रुंद असे सेंद्रिय पदार्थांचे सावलीत ढीग तयार करावेत.
ढीग करण्यापूर्वी प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस अशा लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा पाच सें.मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेसे शेणमिश्रित पाणी शिंपडावे. या थरावर परत पाच सें.मी. जाडीचा अर्धकुजलेल्या मातीचा थर द्यावा, त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे.
दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मल-मूत्र, धान्याचा कोंडा, फुलोऱ्यातील तण, गिरिपुष्प, शेवरीची पाने, मासळीचे खत, कोंबडीची विष्ठा यांचा थर द्यावा. सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करावेत. संपूर्ण ढिगाची उंची 60 सें. मी.पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. कुजणाऱ्या पदार्थांमध्ये 40 टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी मारावे. साधारणतः दोन ते अडीच महिन्यांत गांडूळ खत तयार होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll